मराठी विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विशेष लेख

हंपी किंवा हम्पे हे भारताच्या कर्नाटक राज्यातील पुरातन शहर आहे. मध्य कर्नाटकाच्या पूर्व भागात होस्पेट शहराजवळ असलेले हंपीचे अवशेष युनेस्कोचे भारतातील एक जागतिक वारसा स्थान आहे. अनेक इमारती व मंदिरांचे हे अवशेष ४,१०० हेक्टर (१६ चौ. मैल) विस्तारात पसरलेले आहेत. यांत दक्षिण भारतातील शेवटच्या महान हिंदू साम्राज्यातील १,६००हून अधिक किल्ले, तटबंद्या नदीकाठच्या इमारती, राजवाडे, मंदिरे, मंडप, स्मारके, जल संरचना, इत्यादीचा समावेश आहे. यांचे वर्णन युनेस्कोने कठोर आणि भव्य स्थान असे केले आहे.

हंपी शहर मध्य कर्नाटकच्या पूर्व भागात तुंगभद्रा नदीच्या काठावर आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेजवळ वसलेले आहे. ते बेंगलुरूपासून ३७६ किलोमीटर (२३४ मैल) आणि हुबळीपासून १६५ किलोमीटर (१०३ मैल) अंतरावर आहे. येथून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन होस्पेट, १३ किलोमीटर (८.१ मैल) अंतरावर आहे आणि सर्वात जवळचे विमानतळ तोरणागल्लू येथील जिंदाल विजयनगर विमानतळ, ३२ किलोमीटर (२० मैल) अंतरावर आहे. येथून बेंगलुरूला विमानसेवा उपलब्ध आहे. गोवा आणि बेंगलुरूहुन बस आणि रेल्वेने एका रात्रीत हंपीला पोहोचता येते. बदामी आणि ऐहोल पुरातत्त्व स्थळांच्या आग्नेयेस, हंपी १४० किलोमीटर (८७ मैल) अंतरावर आहे. येथून कोणताही महामार्ग जात नाही.

दख्खनी सुलतानांच्या नंतर १८व्या शतकापर्यंत हंपी आणि आसपासचा प्रदेश स्थानिक सरदार, दरकदार, हैदराबादचा निझाम, मराठा साम्राज्य आणि त्यानंतर हैदरअली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान यांच्या ताब्यात येत-जात राहिला. १७९९मध्ये ब्रिटिश सैन्याने टिपू सुलतानचा पराभव केला आणि वडियार राजांना पुढे करीत या प्रदेशावर ताबा मिळवला.

ब्रिटिश शासनांतर्गत भारताचे पहिले सर्वेक्षक जनरल स्कॉटिश कर्नल कॉलिन मॅकेन्झी यांनी १८०० मध्ये हंपीच्या अवशेषांचे सर्वेक्षण केले होते. मॅकेन्झीने लिहिले की हंपीच्या आसपासचा प्रदेश निर्मनुष्य आहे आणि तेथे फक्त जंगली प्राणी राहतात. मॅकेन्झी आणि त्यांचा कित्ता गिरविणाऱ्या लेखकांनी हंपीच्या विनाशाचे कारण हैदरअली आणि मराठा साम्राज्य असल्याचे ठरवून टाकले.

१९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत हंपी प्रदेश दुर्लक्षितच राहिला. अलेक्झांडर ग्रीनलॉ यांनी १८५६ मध्ये काढलेल्या छायाचित्रांनी याला थोडी प्रसिद्धी मिळाली. त्यांनी १८५६ मध्ये शाबूत असलेली मंदिरे, राजवाडे आणि इतर शाही वास्तूंच्या ६० कॅलोटाइप छायाचित्रांचे संग्रहण तयार केले. ही छायाचित्रे युनायटेड किंग्डममधील एका खाजगी संग्रहात ठेवण्यात आली होती. ही छायाचित्रे १९८० पर्यंत प्रकाशित झाली नव्हती. विद्वानांसाठी ते १९व्या शतकाच्या मध्यावरील हंपी स्मारक राज्याचे सर्वात मौल्यवान स्रोत आहेत.

पुढे वाचा...

मागील अंक: एप्रिल २०२३ - ऑगस्ट २०१९ - जून २०१९ - एप्रिल २०१९ - मार्च २०१९ - जानेवारी २०१९ - नोव्हेंबर २०१८ - मे २०१८ - मार्च २०१८ - महिला दिवस, २०१८ - २०१७ मधील सदर लेख - २०१६ मधील सदर लेख - २०१५ मधील सदर लेख - २०१४ मधील सदर लेख- २०१२ मधील सदर लेख - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक

मोबाईल ?

आजचे छायाचित्र

उदयोन्मुख लेख

फ्रान्सच्या रशियावरील आक्रमणास २४ जून १८१२ रोजी फ्रेंच सम्राट नेपोलियनच्या ग्रान्द आर्मीने रशियन सैन्यावर आक्रमण करण्यासाठी नेमान नदी ओलांडल्यावर प्रारंभ झाला. यातून रशियन सम्राट अलेक्झांडरने आपल्या हस्तकांमार्फत ब्रिटनशी व्यापार करणे थांबवावे, जेणेकरून ब्रिटनला शांततेसाठी तह करणे भाग पडेल अशी नेपोलियनची मनीषा होती. या मोहिमेचे अधिकृत धोरण पोलंडला रशियाच्या धोक्यापासून वाचवणे हे होते. नेपोलियनने पोलंडच्या जनतेकडून पाठिंबा मिळवण्यासाठी या मोहिमेचे 'दुसरे पोलिश युद्ध' असे नामकरण केले. आता मात्र हे युद्ध फ्रान्समध्ये रशियावरील मोहीम (फ्रेंच: Campagne de Russie) व रशियामध्ये १८१२ चेराष्ट्रभक्तिपर युद्ध (रशियन: Отечественная война 1812 года, Otechestvennaya Voyna 1812 Goda) या नावांनी ओळखले जाते.

ग्रान्द आर्मी ही ६,८०,००० सैनिकांची महाकाय फौज होती व त्यात ३,००,००० सैन्य फ्रेंच प्रांतांमधून आलेले होते. सैन्याची मोठी आगेकूच करून नेपोलियनने रशियन सैन्यास सामोरे जाण्यासाठी पश्चिम रशिया पादाक्रांत केला व स्मोलेन्स्क येथील लढाईत तसेच अन्य काही किरकोळ चकमकींत विजय मिळवले. स्मोलेन्स्कनंतर ही मोहीम संपेल अशी नेपोलियनला आशा होती परंतु रशियन सैन्याने शहरास आग लावून पूर्वेकडे पळ काढला. त्यामुळे स्मोलेन्स्क ताब्यात घेण्याचे नेपोलियनचे इरादे संपुष्टात आले व त्याला रशियनांचा ससैन्य पाठलाग करणे भाग पडले.

रशियन सैन्य माघार घेत असताना कॉसॅक लोकांवर गावे, शहरे व शेती जाळून नष्ट करण्याचे कार्य देण्यात आले जेणेकरून आक्रमकांना ताब्यात घेतलेल्या प्रदेशातून अन्नधान्य मिळू नये. या दग्धभू रणनीतीमुळे फ्रेंचांना मोठा धक्का बसला. आपल्याच प्रदेशाचा नाश करून आपल्याच लोकांना त्रास देण्याची रशियनांची मानसिकता त्यांना समजणे कठीण गेले. या कृतींमुळे फ्रेंचांना अन्नपुरवठा प्रणालीवर विसंबून रहावे लागले जी त्यांच्या फार मोठ्या सैन्यास अपुरी पडणारी होती. उपासमार व हलाखीच्या परिस्थितीम्ळे फ्रेंच सैनिक रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडू लागले. अशा सैनिकांना बऱ्याचदा जे त्यांना कैद किंवा ठार करत असत, अशा कॉसॅक टोळ्यांना सामोरे जावे लागे.

रशियन सैन्याने सलग तीन महिने रशियाच्या अंतर्भागात माघार घेतली. या सातत्यपूर्ण माघारीमुळे तसेच आपल्या जमिनी गेल्यामुळे रशियाचा उमराव वर्ग नाराज झाला. त्यांनी सम्राट अलेक्सांद्रला रशियन सैन्याचा सर्वोच्च सेनानी फील्ड मार्शल बार्क्ले याला हटवण्यास भाग पाडले तेव्हा सम्राटाने राजपुत्र मिखाईल कुटुझोव या अनुभवी सेनाधिकाऱ्यास नियुक्त केले. परंतु आपल्या पूर्वाधिकाऱ्याप्रमाणे कुटुझोवनेही आणखी दोन आठवडे माघार घेणे कायम ठेवले.

(पुढे वाचा...)

आणि हे आपणास माहीत आहे का?

  • ...की, दक्षिण आफ्रिकेतील पीटरमारित्झबर्ग शहरातील सिटी ओव्हल क्रिकेट मैदानावर धावांचे शतक करणाऱ्यास आणि एकाच डावात ५ बळी घेणाऱ्या खेळाडूंना मैदानावर एक झाड लावावे लागते?
  • ...की, मराठी २६ जानेवारी, २०२० रोजी मराठी विकिपीडियावर एकूण ८,०२३ चरित्रलेख होते. यांपैकी २,३२६ म्हणजेच २८% लेख स्त्री चरित्रलेख तर उर्वरित पुरुष चरित्रलेख होते? इंग्लिश विकिपीडियावर हे प्रमाण १८% आहे.
  • ...की, २८ जानेवारी, १९६८ ते ६ जुलै, १९६९ या दीड वर्षांत बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर पाच वेळा बदल झाले?
  • ...की, बांगलादेश जगातले तिसरे सर्वात मोठे हिंदू राष्ट्र असून तेथील १,२४,९२,४२७ व्यक्ती हिंदू धर्म पाळतात?
  • ...की, एरबस ए३४०-५०० प्रकारच्या विमानात प्रवास चालू असताना प्रवासी दगावल्यास मृतदेह ठेवण्यासाठी विशेष कपाट असते?
  • ...की इ.स. १९४४ च्या नोव्हेंबरमध्ये पोलंडमधील नाझी राजवटीच्या काळातील ऑश्विझ छळछावणीत विषारी वायूच्या चेंबरमध्ये कोंडून युध्दकैद्यांना ठार करणे थांबवले गेले.
सबॉबा
सबॉबा
सबॉबा
सबॉबा


वरील माहिती मराठी विकिपीडियावर अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून गोळा केलेली आहे.

मागील अंक