ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र
ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र United Kingdom of Great Britain and Ireland | ||||
| ||||
| ||||
ब्रीदवाक्य: Dieu et mon droit (फ्रेंच) "देव आणि माझा अधिकार" | ||||
राजधानी | लंडन | |||
अधिकृत भाषा | इंग्लिश | |||
क्षेत्रफळ | ३,१५,०९३ चौरस किमी | |||
लोकसंख्या | ४,२७,६९,१९६ (१९२११) | |||
–घनता | १३५.७ प्रती चौरस किमी |
ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (इंग्लिश: United Kingdom of Great Britain and Ireland) हा उत्तर युरोपातील एक भूतपूर्व देश होता. इ.स. १८०१ साली ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र व आयर्लंडचे राजतंत्र मिळून ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र हा नवीन देश स्थापन करण्यात आला.
विसाव्या शतकात इ.स. १९१९ ते इ.स. १९२२ दरम्यान आयर्लंडच्या स्वातंत्र्ययुद्धानंतर आयर्लंडने युनायटेड किंग्डमामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला व इ.स. १९२२ साली आयर्लंड व युनायटेड किंग्डम हे दोन देश वेगळे झाले. इ.स. १९२२ ते इ.स. १९३७ सालांदरम्यान आयर्लंड देश आयर्लंडचे स्वतंत्र राज्य ह्या नावाने ओळखला जात असे व इ.स. १९३७ साली आयर्लंडचे प्रजासत्ताक (सध्याचे नाव) हा देश निर्माण झाला.
आयर्लंड वेगळा झाल्यानंतर इ.स. १९२७ साली ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र हे नाव बदलून ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (सध्याचे युनायटेड किंग्डम) हे नवीन नाव वापरात आले.
बाह्य दुवे
- ब्रिटिश-हिस्टरी ऑनलाइन (इंग्लिश मजकूर)