ऐहोल
ऐहोल (IPA: [eye-hoḷé]), ऐवल्ली, अहिवोलाल किंवा आर्यपुरा हे कर्नाटक, भारतातील प्राचीन आणि मध्ययुगीन बौद्ध, हिंदू आणि जैन स्मारके असेले ऐतिहासिक ठिकाण आहे. येथील स्मारके व इमारती इ.स.च्या सहाव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंतच्या आहेत
या ठिकाणी शाबूत असलेली बहुतेक स्मारके ७व्या ते १०व्या शतकातील आहेत. बागलकोट जिल्ह्यातील मालाप्रभा नदीच्या खोऱ्यात पसरलेल्या एकशे वीस दगडी आणि गुंफा मंदिरे असलेले ऐहोल हे शेतजमिनी आणि वाळूच्या टेकड्यांनी वेढलेल्या एका नामांकित लहान गावाभोवती वसलेले आहे.