Jump to content

​आशुतोष भाकरे

आशुतोष भाकरे हा एक मराठी चित्रपट सृष्टीतील नवोदित कलाकार होता. आशुतोष ने भाकर आणि विचार ठरला पक्का या दोन मराठी चित्रपटात काम केले होते. त्याच सोबत जून जुलै या मराठी नाटकाचा तो निर्माता सुद्धा होता. या शिवाय आशुतोष ने अनेक लघुपटात सुद्धा काम केले होते.[]

मराठी चित्रपट अभिनेत्री मयुरी देशमुख ही आशुतोषची पत्नी होती. मानसिक ताण आणि नैराश्य यामुळे आशुतोष ने नांदेड येथे राहत्या घरी दिनांक २९ जुलै २०२० रोजी आत्महत्या केली []

चित्रपटात योग्य कामे मिळत नाहीत म्हणून आशुतोष मानसिक तणावात होता. त्यामुळे मुंबई येथे मानसोपचार तज्ज्ञाकडे आशुतोष वर उपचार सुरू होते. परंतु लॉक डाउनच्या दरम्यान काम न मिळाल्याने तणावात येऊन आशुतोष ने टोकाचे पाऊल उचलले असे मानले जाते.[]

संदर्भ

  1. ^ a b "लॉकडाऊनमुळे मिळाले नाही नवे काम; नैराश्यातून नवोदित कलाकाराने संपवला जीवनप्रवास".
  2. ^ "आशुतोष भाकरे याच्यावर सुरू होते मानसोपचारतज्ज्ञाकडून उपचार".