Jump to content

ॲलिघेनी, पेनसिल्व्हेनिया

ॲलिघेनी हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील शहर होते. पिट्सबर्गपासून अगदी जवळ असलेले हे शहर १९०७मध्ये पिट्सबर्गचाच भाग बनले. ॲलिघेनी नदी आणि ओहायो नद्यांच्या संगमावरील आता हा भाग पिट्सबर्गमधील नॉर्थ साइड या नावाने ओळखला जातो. हा भाग १८५०पर्यंत शेतांनी व्यापलेला होता. त्यानंतर मूळचे जर्मन व त्यानंतर क्रोएशियातून आलेल्या लोकांनी येथे घरे बांधण्यास सुरुवात केली. त्यावेळी या भागाला डॉइचटाउन असे नाव होते. १९६० च्या सुमारास ॲलिघेनीमधील बहुतांश मध्यवर्ती भाग पाडून त्याचे नवनिर्माण करण्यात आले. यात ॲलिघेनी सेंटर व त्याच्या आसपासचा जुना भाग वारसा म्हणून तसाच ठेवला गेला.