Jump to content

ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी

ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील विद्यापीठ आहे. फीनिक्स महानगरात पाच आणि ॲरिझोना राज्यात इतर चार प्रांगणे असलेले हे विद्यापीठ अमेरिकेतील सर्वाधिक विद्यार्थी असलेलेले सार्वजनिक विद्यापीठ आहे. २०१६मध्ये येथे सुमारे ७२,००० विद्यार्थी शिक्षण घेत होते.

या विद्यापीठाची स्थापना १२ मार्च, १८८५ रोजी टेरिटोरियल नॉर्मल स्कूल या नावाने ॲरिझोनातील टेम्पे शहरात झाली. १९५८मध्ये यास सध्याचे नाव दिले गेले.