ॲना मे हेस
ब्रिगेडियर जनरल (1920-2018) ॲना व्ही. मे मॅककेब हेस (१६ फेब्रुवारी, १९२०:बफेलो, न्यू यॉर्क, अमेरिका - ) या अमेरिकेच्या सैन्यातील जनरलपदी बढती मिळालेल्या सर्वप्रथम महिला आहेत.
यांनी १९४१मध्ये रुग्णशुश्रुषा विद्येत पदविका मिळवून लष्करात भरती घेतली. १९४२मध्ये त्यांना भारतात पाठविण्यात आले. तेथे त्यांनी दुसऱ्या महायुद्धातील चीन व म्यानमारमधील लढायांत भाग घेतला. युद्ध संपताना त्या अमेरिकेस परतल्या व नंतर कोरियातील युद्धात त्यांनी भाग घेतला.
त्या ११ जून, १९७० रोजी ब्रिगेडियर जनरल झाल्या व ऑगस्ट १९७१ अखेर सैन्यातून निवृत्त झाल्या.
हे सुद्धा पहा
- एलिझाबेथ पी. हॉइझिंग्टन