ॲन हॅथवे
अॅन हॅथवे | |
---|---|
जन्म | अॅन जॅकलिन हॅथवे १२ नोव्हेंबर, १९८२ ब्रूकलिन, न्यू यॉर्क शहर |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | १९९९ - चालू |
अॅन जॅकलिन हॅथवे (इंग्लिश: Anne Jacqueline Hathaway; १२ नोव्हेंबर १९८२) ह्या एक अमेरिकन सिने अभिनेत्री आहेत. त्यांना अकादमी पुरस्कार(ऑस्कर), प्राईमटाईम एमी पुरस्कार आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. त्या २०१५ सालच्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्री होत्या. त्यांच्या चित्रपटांनी जगभरातून ६.८ बिलियन यू. एस. डॉलरची कमाई केली आहे. त्या २००९ सालच्या फोर्ब्स सेलिब्रिटी १०० च्या यादीत होत्या.
सुरुवातीचे आयुष्य
ॲन हॅथवे ह्यांचा जन्म न्यू यॉर्क मधील ब्रुकलीन येथे झाला. त्यांची आई, केट ह्या पूर्वीच्या अभिनेत्री होत्या. त्या सहा वर्षाच्या असताना, त्यांचा परिवार मिल्बर्न, न्यू जर्सी येथे स्थलांतरीत झाला. हाथवे ह्यांनी ब्रूकलीन हाईट्स मॉन्टेसरी स्कूल आणि वायोमिंग एलीमेंटरी स्कूल, मिल्बर्न येथे शिक्षण घेतले. त्यांनी मिल्बर्न हायस्कूल मधून पदवी घेतली. तेथे त्या फुटबॉल खेळाडू होत्या. आणि त्यांनी विविध नाटकांमध्ये अभिनय केला होता. त्यापैकी एक आहे, वन्स अपॉन अ मॅट्रेस, ज्यामध्ये त्यांनी विनीफ्रेडची भूमिका साकारली होती. त्यानंतर न्यू जर्सीझ पेपर मिल प्लेहाउस येथे त्यांनी जेन आयर आणि जीजी ह्या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. त्यांनी १९९३ साली, अमेरिकन अकादमी ऑफ ड्रमॅटीक आर्ट्स येथे शिक्षण घेतले. आणि बरो ग्रुप थिएटर कंपनीच्या अभिनय कार्यशाळेत त्या सहभागी झाल्या. त्या असे म्हणतात की जर त्या अभिनय क्षेत्रात नसत्या तर त्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिका किंवा मानसशास्त्रज्ञ असत्या. १९९८ आणि १९९९ मध्ये, कार्नेजी हॉल येथे ऑल ईस्टर्न यू. एस. हायस्कूल ऑनर्स कोरसबरोबर हॅथवे सोप्रनो गायल्या. आणि न्यू जर्सीमधील वेस्ट ऑरेंजमधल्या सेटन हॉल प्रीप्रेटरी स्कूल येथील नाटकांबरोबरदेखील त्या गायल्या. त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला त्यांची अभिनयाची आणि सौंदर्याची तुलना ज्युडी गारलँड ह्यांच्याशी केली जात असे. हॅथवे ह्यांनी मिलबर्न हायस्कूल, न्यू जर्सीमधून पदवी घेतली.
कारकीर्द
शाळेत असताना त्यांनी विविध नाटकांमध्ये भाग घेतला. त्या किशोर वयात टी. व्ही. वरच्या गेट रील या (१९९९-२०००) मालिकेमध्ये होत्या. आणि त्यानंतर लवकरच त्यांचा पहिला चित्रपट, डीझनेचा द प्रिन्सेस डायरीज प्रदर्शित झाला. २००५ पासून त्यांनी हॅवॉक आणि ब्रोकबॅक माऊंटन ह्या सिनेमांनंतर प्रौढ भूमिका साकारायला सुरुवात केली. त्यानंतर द डेव्हिल वेअर्स प्राडा(२००६) ह्या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ठरली. त्यांच्या रेचल गेटिंग मॅरीड(२००८) मधल्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीठी अकादमी पुरस्काराचे पहिल्यांदाच नामांकन मिळाले. त्यानंतरच्या त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी काही आहेत- ब्राईड वॉर्स(२००९), व्हॅलेनटाईन्स डे(२०१०), लव्ह अँड अदर ड्रग्स(२०१०) आणि ॲलीस इन वंडरलँड(२०१०) इ. २००१ साली हॅथवेने हॉलीवूड सिनेसृष्टीत पदार्पण केले. अनेक नाटकांमध्ये कामे केल्यानंतर हॅथवेने १९९९ साली टीव्ही मालिकेमध्ये भूमिका केल्या. सिम्पसन्स ह्या कार्टून मालिकेमध्ये तिने दिलेल्या आवाजासाठी त्यांना एमी पुरस्कार मिळाला होता. २००६ साली हॅथवेला पीपल्स मासिकाच्या जगातील ५० सर्वात सुंदर व्यक्ती ह्या यादीमध्ये स्थान मिळाले होते.२००८ साली प्रदर्शित झालेल्या रेचल गेटिंग मॅरिड ह्या चित्रपटासाठी त्यांना अनेक पुरस्कार व ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या क्रिस्टोफर नोलनच्या द डार्क नाईट राइझेस ह्या सिनेमात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केली आहे.२०१२ साली, हॅथवे ह्यांनी द डार्क नाईट या तीन चित्रपटांच्या मालिकेतील शेवटचा चित्रपट, द डार्क नाईट राईझेस ह्यामध्ये सेलिना काईलची भूमिका साकारली होती. त्याच वर्षी ले मिझराब चित्रपटात त्यांनी फँटीन या एका क्षयरोग झालेल्या स्त्रीची भूमिका केली. त्यासाठी त्यांना पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कार मिळाला. इंटरस्टेलर(२०१४) ह्या विज्ञानपटातील एका शास्त्रज्ञाची भूमिका, द इंटर्नमध्ये एका ऑनलाईन फॅशन साईटच्या मालकिणीची भूमिका, आणि ओशन्स ८ (२०१८) ह्या सिनेमातील त्यांच्या भूमिकांचे कौतुक झाले आहे.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील ॲन हॅथवे चे पान (इंग्लिश मजकूर)