Jump to content

ॲन एम. मार्टिन

ॲन एम. मार्टिन
जन्म नाव ॲन मॅथ्युज मार्टिन
जन्म १२ ऑगस्ट १९५५ (वय ६७ वर्षे)
राष्ट्रीयत्व अमेरिकन
साहित्य प्रकार Children's books
संकेतस्थळwww.scholastic.com/annmartin/

ॲन मॅथ्यूज मार्टिन (जन्म: १२ ऑगस्ट १९५५) या एक अमेरिकन बाल साहित्यकार आहेत.

आई-वडील आणि धाकटी बहीण जेन यांच्यासोबतप्रिन्स्टन, न्यू जर्सी येथे ॲन मार्टिन लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी स्मिथ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. यानंतर, मार्टिन एक शिक्षिका आणि झाल्या आणि पुढे लहान मुलांच्या पुस्तकांचे संपादन करू लागल्या. आता त्या पूर्णवेळ लेखिका म्हणून काम करतात.

वेगवेगळ्या गोष्टी किंवा घटनांमधून मार्टिन यांना पुस्तकांसाठी कल्पना सुचतात. त्यांपैकी काही त्यांनी स्वतः करून पाहिलेल्या गोष्टींवर आधारित आहेत. तर काही बालपणीच्या आठवणी आणि भावना यांवर आधारित आहेत. ॲननी त्यांच्या ‘द बेबी-सिटर्स क्लब’ आणि इतर पुस्तकांमध्ये वापरलेली सर्व पात्रे काल्पनिक आहेत. पण, त्यांची अनेक पात्रे खऱ्याखुऱ्या माणसांवरून प्रेरित असतात. ॲन कधीकधी त्यांच्या पात्रांची नावे ओळखीच्या लोकांच्या नावांवरून ठेवतात, तर कधीकधी त्या त्यांना आवडणारी नावे सुद्धा ठेवतात.[]

१९९० मध्ये त्यांनी ॲन एम. मार्टिन फाउंडेशन नावाची एक संस्था सुरू केली. या संस्थेमार्फत त्या लहान मुले, शैक्षणिक कार्यक्रम, बेघर लोक आणि प्राण्यांना मदत करतात.

पुस्तके

  • बेबी-सिटर्स क्लब मालिका
  • बेबी-सिटर्स लिटल सिस्टर मालिका
  • सुश्री कोलमन्स क्लास मालिकेतील द किड्स
  • कॅलिफोर्निया डायरी मालिका
  • PS लाँग लेटर नंतर पाउला डॅनझिगरसह
  • पॉला डॅनझिगरसह स्नेल मेल नो मोअर
  • लिओ द मॅग्निफिसेंट
  • राहेल पार्कर, बालवाडी शोऑफ
  • टेन किड्स, नो पेट्स
  • अकरा मुले, एक उन्हाळा
  • मा आणि पा ड्रॅकुला
  • तुझी तुर्ली, शर्ली
  • फक्त एक उन्हाळी प्रणय
  • सोमवारपासून बेपत्ता
  • तुझ्यासोबत आणि तुझ्याशिवाय
  • मी आणि केटी (कीटक)
  • रंगमंच धास्ती
  • आतून बाहेर
  • फक्त तु आणि मी
  • बमर उन्हाळा
  • अ डॉग लाइफ: द ऑटोबायोग्राफी ऑफ अ स्ट्रे
  • एव्हरीथिंग फॉर अ डॉग
  • द डॉल पीपल मालिका
  • अ कॉर्नर ऑफ दि युनिव्हर्स
  • बेले टील
  • हियर टुडे
  • मेन स्ट्रीट
  • नीडल अँड थ्रेड
  • दिस दि सीझन
  • वेलकम टू कॅमडेन फॉल्स
  • ऑन ख्रिसमस इव्ह
  • टेन रुल्स फॉर लिव्हिंग वुइथ माय सिस्टर

संदर्भ

  1. ^ "Ann M. Martin | Scholastic.com". 2010-03-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-04-01 रोजी पाहिले.

इतर वेबसाइट्स