Jump to content

ॲडमिन बॉक्सची लढाई

ॲडमिन बॉक्सची लढाई
दुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
७ व्या इंडियन डिव्हिजनचे सैनिक शत्रूची टेहळणी करताना
७ व्या इंडियन डिव्हिजनचे सैनिक शत्रूची टेहळणी करताना
दिनांक ५-२३ फेब्रुवारी, इ.स. १९४४
स्थान आराकान, म्यानमार
परिणती दोस्तांचा विजय
युद्धमान पक्ष
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम


भारत ध्वज भारत

जपान ध्वज जपान


* आझाद हिंद फौज

सेनापती
युनायटेड किंग्डम फिलिप क्रिस्टिसन जपान तोकुतारो साकुराइ
सैन्यबळ
सुरुवातीस: २ इन्फंट्री डिव्हिजन, १ चिलखती रेजिमेंट
शेवटी: ४ इन्फंट्री ब्रिगेड, १ चिलखती रेजिमेंट
१ इन्फंट्री डिव्हिजन
बळी आणि नुकसान
३,५०६ सैनिक मृत, ३ लढाऊ विमाने नष्ट ३,१०६ सैनिक मृत, २,२२९ जखमी, ६५ लढाऊ विमाने नष्ट

ॲडमिन बॉक्सची लढाई, न्गाक्येडौकची लढाई किंवा सिंझवेयाची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रे आणि जपानी सैन्यामध्ये झालेली लढाई होती. ५-२३ फेब्रुवारी, १९४४ दरम्यान आराकानजवळ झालेल्या या लढाईत दोस्तांचा विजय झाला.

ही लढाई सध्याच्या बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेजवळ झाली होती. यात जपान्यांची एक डिव्हिजन तर दोस्त राष्ट्रांच्या दोन डिव्हिजन आणि एक रेजिमेंट होत्या. याशिवाय दोस्तांनी अधिक दोन डिव्हिजनांची कुमक पाठवली. यात दोस्त राष्ट्रांचे ३,५०६ सैनिक मृत्यू पावले आणि जपान्यांकडून लढणारे ३,१०६ मृत्यू पावले तसेच २,२२९ सैनिक जखमी झाले. याशिवाय दोस्तांची तीन आणि जपान्यांची ६५ लढाऊ विमाने कामी आली.

या लढाईमध्ये दोन्हीकडून भारतीय सैनिक लढले. दोस्त राष्ट्रांकडून ते ब्रिटिश भारतीय लष्कराचा भाग होते तर जपान्यांकडून आझाद हिंद फौजेच्या ध्वजाखाली ते लढले.