ॲग्रोवन
अॅग्रोवन | |
---|---|
प्रकार | कृषी |
मालक | सकाळ उद्योग समुह |
प्रकाशक | अभिजित प्रताप पवार |
संपादक | आदिनाथ दत्तात्रय चव्हाण |
मुख्य संपादक | राहुल गडपाले |
वृत्तसंपादक | आनंद गाडे |
पत्रकारवर्ग | रमेश जाधव आकाश देशमुख हृषीकेश काळंगे महेश गायकवाड |
स्थापना | २० एप्रिल २००५ |
भाषा | मराठी |
किंमत | ३ रुपये |
मुख्यालय | ५९५, बुधवार पेठ, पुणे |
भगिनी वृत्तपत्रे | सकाळ टाईम्स (इंग्रजी), सकाळ (वृत्तपत्र), गोमंतक (गोवा), गोमंतक टाईम्स (गोवा) |
| |
संकेतस्थळ: https://www.agrowon.com/ |
ॲग्रोवन हे सकाळ माध्यम समूहाचे कृषी प्रकाशन आहे. एप्रिल, 2005 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. सध्या ॲग्रोवन हे कृषी क्षेत्रातील एक विश्वासार्ह ब्रँड नाव आहे. ॲग्रोवन हे शेतीवरील जगातील पहिले दैनिक आहे.[१]
सध्या ॲग्रोवन महाराष्ट्रात 8 आवृत्त्यांसह 16 पानांचे टॅब्लॉइड स्वरूपात शेतकऱ्यांना योग्य माहिती आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्यांना जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनवण्यासाठी मदत करते.
ॲग्रोवनच्या माध्यमातून शेतीच्या सर्व पैलूंशी संबंधित माहितीसाठी अधिकृत माध्यम आहे. नवीन ट्रेंड, चांगल्या पद्धती आणि भविष्यातील तांत्रिक अनुप्रयोग स्पष्टपणे सादर केले जातात. शेतीसोबत दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन इत्यादी सारख्या कृषी आधारित उपक्रमांवर देखील प्रकाश टाकला जातो.[२]
पुरस्कार
वसंतराव नाईक प्रतिष्ठान, पुसद, अफाक, LIMCA यांनी कृषी माहिती प्रसारात अग्रगण्य कार्य केल्याबद्दल ॲग्रोवनला प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला.[३]
अॅग्रोवनच्या आवृत्या
- अकोला
- छत्रपतीसंभाजी नगर
- जळगाव
- कोल्हापूर
- मुंबई
- नागपूर
- नांदेड
- अहमदनगर
- पुणे
- सोलापूर
- सातारा
बाह्य दुवे
संदर्भ
- ^ "Sakal launches Agro Won India's first daily devoted to Agriculure - Exchange4media". Indian Advertising Media & Marketing News – exchange4media (इंग्रजी भाषेत). 2022-02-15 रोजी पाहिले.
- ^ "Success Stories". Agrowon (इंग्रजी भाषेत). 2022-02-15 रोजी पाहिले.
- ^ "About Agrowon". Agrowon (इंग्रजी भाषेत). 2022-02-15 रोजी पाहिले.