Jump to content

ॲक्वा मार्गिका (नागपूर मेट्रो)

ॲक्वा मार्गिका (नागपूर मेट्रो)
Overview
सद्य स्थिती सक्रिय

अ‍ॅक्वा मार्गिका (पूर्व-पश्चिम) ही भारताच्या नागपुरातील नागपूर मेट्रोची या जलद परिवहन प्रणाली मधील एक मार्गिका आहे. यात प्रजापती नगर ते हिंगणा माउंट व्ह्यू पर्यंत 21 मेट्रो स्थानके आहेत आणि या मार्गिकेची एकूण लांबी १९.४०७ आहे. ही पूर्ण मार्गिका उन्नत आहे.

ही मार्गिका प्रजापती नगर येथून उगम पावतो आणि वैष्णोदेवी चौक, आंबेडकर चौक, टेलिफोन एक्सचेंज, चितार ओळी चौक, अगरसेन चौक, दोसार वैश्य स्क्वेअर, नागपूर रेल्वे स्थानक, सीताबर्डी, झाशी राणी चौक, इंस्टीट्यूट ऑफ इंजिनिअर्स, शंकर नगर चौक,एल ए डी चौक, धर्मपेठ विद्यापीठ, सुभाष नगर, रचना (रिंग रोड जंक्शन), वासुदेव नगर, बंसी नगर मार्गे पश्चिमेकडे लोकमान्य नगर ला जाते. ही संपूर्ण मार्गिका उन्नत आहे.

या मार्गिकेची एकूण लांबी १९.४०७ किमी आहे. या मार्गिकेवर २१ स्थानके आहेत. सर्व स्थानके उन्नत आहेत आणि सीताबर्डी हे अदलाबदल स्थानक आहे. सरासरी अंतर-स्थानक अंतर १ किमी आणि रहदारीच्या आवश्यकतेनुसार किमान ०.६५ पासून ते कमाल १.२९ किमी आहे.

डीएमआरसीने नागपूर सुधार प्रन्यास आणि नागपूर महानगरपालिकेला सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालात (डीपीआर) टप्प्यांमध्ये विकासाच्या अगोदरच्या सूचनेचा एकाच वेळी विरोधाभास दर्शवित दोन्ही मार्गांचे बांधकाम सुरू करण्याची सूचना केली आहे.[]

स्थानकांची यादी

या मार्गावरील स्थानकांची यादी खालीलप्रमाणे आहे-

Aqua Line
# स्थानकाचे नाव सद्यस्थिती / उदघाटन तारीख लांबी माप (मीटर) मागील स्थानकापासून अंतर अदलाबदल मांडणी
प्रजापती नगरनिर्माणाधीन ०.० ०.० नाही उन्नत
वैष्णोदेवी चौकनिर्माणाधीन १२२९.३ १२२९.३ नाही उन्नत
आंबेडकर चौकनिर्माणाधीन १९४७.९ ७१८.६ नाही उन्नत
टेलिफोन एक्स्चेंजनिर्माणाधीन ३१३७.४ ११८५.९ नाही उन्नत
चितारओळी चौकनिर्माणाधीन ३९५०.२ ८१२.८ नाही उन्नत
अग्रसेन चौकनिर्माणाधीन ४७५९.८ ८०९६ नाही उन्नत
दोसर वैश्य चौकनिर्माणाधीन ५५९०.४ ८३०.६ नाही उन्नत
नागपूर रेल्वे स्थानकनिर्माणाधीन ६४६४.४ ८७४.० नाही उन्नत
कॉटन मार्केटनिर्माणाधीन नाही उन्नत
१० सीताबर्डी २८ जानेवारी २०२० ७७०७.७ १२४३.३  केशरी मार्गिका उन्नत
११ झाशी राणी चौक२८ जानेवारी २०२० ८३५४.० ६४६.३ नाही उन्नत
१२ इंस्टिट्युट ऑफ इंजिनियर्स २८ जानेवारी २०२० ९११७.२ ७६३.२ नाही उन्नत
१३ शंकर नगर चौक१० डिसेंबर २०२० १००७४.९ ९५७.७ नाही उन्नत
१४ एल ए डी कॉलेज चौक२५ सप्टेंबर २०२० १०८७३.१ ७९८.२ नाही उन्नत
१५ अंबाझरी तलाव निर्माणाधीन १२०२०.७ ११४७.६ नाही उन्नत
१६ सुभाष नगर २८ जानेवारी २०२० १२९४७.१ ९२६.४ नाही उन्नत
१७ रचना रिंग रोड जंक्शन१० डिसेंबर २०२० १४२०१.१ १२५४.० नाही उन्नत
१८ वासुदेव नगर२८ जानेवारी २०२० १५१७३.९ ९७२.८ नाही उन्नत
१९ बंसी नगर२५ सप्टेंबर २०२० १६१३१.६ ९५७.७ नाही उन्नत
२० लोकमान्य नगर २८ जानेवारी २०२० १७७९२.६ १६६१.० नाही उन्नत
२१ हिंगणा माउंट व्ह्यू निर्माणाधीन नाही उन्नत

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Work on two routes to start together". The Times of India. 19 February 2013.