५ (संख्या)
५ - पाच ही एक संख्या आहे, ती ४ नंतरची आणि ६ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 5 - five .
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | पाच | |||
१, ५ | ||||
V | ||||
௫ | ||||
चीनी लिपीत | 五 | |||
٥ | ||||
ग्रीक उपसर्ग | penta- | |||
बायनरी (द्विमान पद्धती) | १०१२ | |||
ऑक्टल | ५८ | |||
हेक्साडेसिमल | ५१६ | |||
वर्ग | २५ | |||
२.२३६०६७९७७ | ||||
संख्या वैशिष्ट्ये | मूळ संख्या |
गुणधर्म
संख्या (x) | बेरीज व्यस्त (−x) | गुणाकार व्यस्त (१/x) | वर्गमूळ (√x) | वर्ग (x२) | घनमूळ (३√x) | घन (x३) | क्रमगुणित / फॅक्टोरियल (x!) |
---|---|---|---|---|---|---|---|
५ | -५ | ०.२ | २.२३६०६७९७७४९९७९ | २५ | १.७०९०५८८२६०००८५ | १२५ | १२० |
- ५ ही विषम संख्या आहे.
- फिबोनाची संख्या,०, १, १, २, ३, ५, ८, १३, २१, ३४, ५५, ८९, १४४, ...
- ५ ही एक स्व: संख्या आहे.
- फिबोनाची संख्या,०, १, १, २, ३, ५, ८, १३, २१, ३४, ५५, ८९, १४४, ...
- पंचकोनाला पाच बाजू असतात.
- ५nच्या एकक स्थानाला प्रत्येकवेळी ५ येते.n ही नैसर्गिक संख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- ५ हा बोरॉन-Bचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ५
- राष्ट्रीय महामार्ग ५
- ५ चेतना
- पाच बोटे
- स्टारफिशच्या उपांगांची संख्या
- इस्लामचे पाच स्तंभ
- पंचवार्षिक योजना
भारतीय संस्कृतीत
- पंचाक्षरी
- पंचक्रोशीत
- पाच पांडव
- पंचशिल तत्त्वे
- पंचधातू
- पंचमी पाचवी तिथी
- पंचगव्य - (गाईचे) दूध, दही, तूप, शेण, मूत्र यांचे मिश्रण
- पंच तत्त्व- पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश
- पंच देव- शिव, गणेश, विष्णू, सूर्य, दुर्गा
- पंच ज्ञानेंद्रिये- नाक, कान(कर्ण), डोळा, जीभ(रसना), त्वचा
- पंचामृत- दूध, दही, तूप, साखर, मध
- पंच कन्या- अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी
- पंच प्राण- प्राण, अपान, समान, व्यान, उदान
- पंच पुष्पबाण- कमल, अशोक, आम्र, नवमल्लिका, नीलोत्पल
- पंच नद- झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास
- पंच रत्न- सोने, हिरा, नीलम, माणिक, मोती
- पंच पीर- जाहर, नरसिंह, भज्जू ग्वारपहरिया, घोड़ा बालाभंजी, रुहरदलेले
- पंच "ग"कार(वैष्णवांचे)- गंगा, गीता, गाय, गोविंद. गायत्री
- पंच "म"कार(शाक्तांचे)- मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा, मैथुन