Jump to content

४चान

४चान
प्रकारखाजगी कंपनी
उद्योग क्षेत्रइंटरनेट
संस्थापक ख्रिस्तोफर पोले
मालक हिरोयोकी निशिमुरा
संकेतस्थळwww.4chan.org/

४चान ही एक इंग्रजी सोशल संकेतस्थळ आहे. वापरकर्ते सामान्यतः अनामिकपणे पोस्ट करतात. ४चान स्वतःच्या विशिष्ट सामग्री आणि मार्गदर्शक तत्त्वांसह विविध बोर्डमध्ये विभाजित केलेले आहे. 1 ऑक्टोबर 2003 रोजी सुरू करण्यात आलेली ही साइट जपानी इमेजबोर्डवर, विशेषतः Futaba Channel चॅनलवर आधारित आहे. ही साइट पटकन लोकप्रिय झाली, विस्तारित झाली आणि आता व्हिडिओगेम्स, संगीत, साहित्य, फिटनेस, राजकारण आणि क्रीडा यांसारख्या विविध विषयांवर समर्पित बोर्ड येथे उपलब्ध आहेत.

हे संकेतस्थळ विविध अशा इंटरनेट गटांशी निगडित आहे, विशेषतः Anonymous, the alt-right आणि Project Chanology.[] ४चान वापरकर्त्यांनी बनवलेले अनेक इंटरनेट मेमे जसे की lolcats, Rickrolling, Chocolate Rai, Pedobear फारच लोकप्रिय झाले आहेत.[][][][] "Random" हा या संकेतस्थळावरचा सर्वात प्रथम बनवण्यात आलेला बोर्ड आहे. "/b/" या नावानेही ओळखला जाणारा हा बोर्ड, ४चान वरील सर्वात जास्त भेट दिला जाणारा बोर्ड आहे. नावाप्रमाणेच, Random बोर्डवर पोस्ट केल्या जाणाऱ्या सामग्रीवर फारच कमी बंधने आहेत. म्हणजेच वापरकर्ता यावर संवेदनशील माहितीही पोस्ट करू शकतो. ह्या संकेतस्थळाने अनेक वेळा प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले आहे. त्याचप्रमाणे ४चानला अनेकदा इंटरनेट हल्लेखोरांचाही सामना करावा लागला आहे. उदाहरणार्थ, २०१० मध्ये DOS हल्ल्यांमुळे ४चानसह काही इतर संकेतस्थळेही काही कालावधीसाठी बंद पडली होती.[]

Alexa Ranking मध्ये ४चानचा क्रमांक साधारणता ७०० च्या आसपास असतो, तर 56 हा ४चानचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट क्रमांक आहे. आपली ओळख उघड न करता विचारांची देवाणघेवाण करता येत असल्यामुळे जगभरातील अनेक लोक विविध कारणांनी याचा उपयोग मोठ्या प्रमाणात करत असल्याचे दिसून येते. लोक आपल्या गरजेनुसार आणि आवडीनुसार येथे उपलब्ध असलेल्या विविध समर्पित अशा बोर्डांचा वापर करू शकतात.

४चान वर अन्य संकेतस्थळ्स आणि इंटरनेट वापरकर्त्यांवर होणारे हल्ले समन्वयित करणे, आणि वैयक्तिक आणि सार्वजनिक प्रतिक्रिया उमटविण्यासाठी, हिंसाचाराची धमकी पोस्ट करणे यांसारख्या गंभीर प्रकार घडले आहेत. त्याचमुळे The Guardian या प्रसिद्ध वृत्तसंस्थेने आपल्या एका लेखामध्ये ४चानचा "वेडसर, तरुण ... उत्कृष्ट, हास्यास्पद आणि भयानक" असा उल्लेख केला आहे.[]

४चान ही वेबसाईट 2003 मध्ये न्यू यॉर्क शहरामध्ये राहणाऱ्या 15 वर्षीय ख्रिस्तोफर पोलेने सुरू केली.[] ४चान सुरू करण्याआधी, पोले Something Awful या फोरमवर कार्यरत होता. 'Moot' या नावाने कार्यरत असलेल्या पोलेला 21 जानेवारी 2015 रोजी विविध वादग्रस्त कारणांमुळे पायउतार व्हावे लागले. 21 सप्टेंबर 2015 रोजी Moot ने घोषणा केली की हिरोयोकी निशिमुराने ४चानचे मालकीहक्क विकत घेतले आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये 9 जुलै 2008 रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखामधून पूलेची वास्तविक ओळख सर्वांसमोर आली. त्यापूर्वी तो "Moot" या नावानेच ओळखला जात होता आणि कोणालाच त्याचे खरे नाव व इतर माहिती माहीत नव्हती.

एप्रिल 2009 मध्ये, टाईम नियतकालिकाने केलेल्या 'ओपन इंटरनेट सर्वेक्षण 2008' मध्ये पोलेने बाजी मारून जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून स्थान प्राप्त केले होते.[]

या संकेतस्थळाचा एकूणएक इतिहास पाहता हे संकेतस्थळ अनेकदा विवादित मुद्यांमुळे सतत चर्चेत असल्याचे दिसून येते. बालकांची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफिती प्रसिद्ध करणे,[१०] ख्यातनाम व्यक्तींची खाजगी माहिती प्रसिद्ध करणे,[११] खून,[१२] इंटरनेट हल्ले[१३][१४] असे अनेक गुन्हेगारी प्रकार बऱ्याचदा घडल्यामुळे हे संकेतस्थळ अशा गोष्टींसाठी कुविख्यात झाले आहे. प्रस्तुत करता येणाऱ्या माहितीवर फारसे बंधन नसल्याने अनेकदा लोक याचा चुकीच्या पद्धतीने वापर असे दिसून येते. याचाच फायदा घेऊन अनेक समाजविघातक प्रवृत्ती आपला हेतू साध्य करताना दिसतात, मात्र असे असले तरी यामध्ये असे अनेक बोर्ड आहेत जेथे उपयुक्त अशी चर्चा सतत सुरू असते.

बाह्य दुवे

  1. ^ Dewey, Caitlin (September 25, 2014). "Absolutely everything you need to know to understand 4chan, the Internet's own bogeyman". The Washington Post. October 20, 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "Iz not cats everywhere? Online trend spreads across campus".
  3. ^ "The Biggest Little Internet Hoax on Wheels Hits Mainstream".
  4. ^ "How Boxxy brought the web to its knees".
  5. ^ "'Pedobear' an Olympic mascot?". 2012-09-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  6. ^ "Web attack takes Anonymous activists offline".
  7. ^ Michaels, Sean (March 19, 2008). "Taking the Rick".
  8. ^ Langton, Jerry (September 22, 2007). "Funny how 'stupid' site is addictive".
  9. ^ "The World's Most Influential Person Is." Time. 2013-08-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-16 रोजी पाहिले.
  10. ^ "Another 4chan User Gets Busted By FBI: Student, 19, facing child porn, death threat charges. February 7, 2011".
  11. ^ "Stolen celebrity images prompt policy change at 4Chan".
  12. ^ "4chan Pics Match Slay Scene, Suspect David Kalac on Run: Investigators".
  13. ^ "FOX 11 Investigates: 'Anonymous'".
  14. ^ "Rise and fall of the Googled swastika".