२०२४ इंडियन प्रीमियर लीग
२०२४ इंडियन प्रीमियर लीग | |||
---|---|---|---|
चित्र:File:Tata IPL Logo.webp | |||
तारीख | २२ मार्च, २०२४ – २६ मे, २०२४ | ||
व्यवस्थापक | भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) | ||
क्रिकेट प्रकार | टी२० क्रिकेट | ||
स्पर्धा प्रकार | साखळी सामने आणि बाद फेरी | ||
यजमान | भारत | ||
सहभाग | १० | ||
सामने | ७४ | ||
अधिकृत संकेतस्थळ | iplt20 | ||
दिनांक | २२ मार्च – २६ मे, २०२४ | ||
|
२०२४ इंडियन प्रीमियर लीग तथा आयपीएल १७ किंवा टाटा आयपीएल २०२४ ही इंडियन प्रीमियर लीग या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेची १७वी आवृत्ती असेल. [१] या स्पर्धेत दहा संघ २२ मार्च ते २६ मे, २०२४ दरम्यान सहभागी होतील [२]
चेन्नई सुपर किंग्ज हे गतविजेते आहेत. त्यांनी मागील हंगामात गुजरात टायटन्सला हरवून पाचवे विजेतेपद पटकावले होते आणि मुंबई इंडियन्ससह स्पर्धेच्या इतिहासातील संयुक्त-यशस्वी संघ झाले होते. [३]
स्वरूप
या स्पर्धेतील दहा संघ प्रत्येकी पाच संघांच्या दोन गटां (अ आणि ब) मध्ये विभागले गेले आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या गटातील पाचही संघांविरुद्ध दोनदा (होम आणि अवे) आणि स्वतःच्या गटातील चारही संघांविरुद्ध एकदा खेळेल. प्रत्येक संघ सात घरचे आणि सात पाहुणे म्हणून सामने खेळतील. साखळी सामन्यांनंतरएकूण गुणांवरून यशस्वी चार संघ बाद फेरीत जातील. या टप्प्यात चार संघ एकमेकांशी स्पर्धा करतील..
नवीन नियम
- गोलंदाज आता प्रति षटकात दोन बाउन्सर टाकू शकतील. [४]
प्रायोजक
टाटा समूहाने २५ अब्ज रुपये (५५.५ कोटी अमेरिकन डॉलर) देउन २०२४-२८ अशा पाच वर्षांच्या कालावधीसाठी इंडियन प्रीमियर लीगचे प्रायोजकत्व घेतले. स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वाधिक प्रायोजकत्व रक्कम आहे. टाटा समूहाने २०२२ आणि २०२३ मध्ये आयपीएलचे प्रायोजन केले होते. [५]
प्रसारण
या हंगामात स्टार स्पोर्ट्स दूरचित्रवाणीवरून सामन्यांचे प्रसारण करेल तर जिओ सिनेमा डिजिटल प्रसारण करेल.
सहभागी संघ
या हंगामात मागील हंगामाचे सगळे दहा संघ पुन्हा भाग घेतील.
संघनायक बदल
- गुजरात टायटन्स: हार्दिक पंड्या --> शुभमन गिल [६]
- कोलकाता नाईट रायडर्स: श्रेयस अय्यर [७]
- मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा --> हार्दिक पंड्या [८]
- दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नरच्या --> ऋषभ पंत [९]
स्थळे
India | ||||
---|---|---|---|---|
अहमदाबाद | बेंगलुरु | चेन्नई | दिल्ली | हैदराबाद |
गुजरात टायटन्स | रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | चेन्नई सुपर किंग्स | दिल्ली कॅपिटल्स | सनरायझर्स हैदराबाद |
नरेन्द्र मोदी मैदान | एम. चिन्नास्वामी मैदान | एम.ए. चिदंबरम मैदान | अरुण जेटली मैदान | राजीव गांधी मैदानum |
क्षमता: १,३२,००० | क्षमता: ३५,००० | क्षमता: ३९,००० | क्षमता: ३५,२०० | क्षमता: ५५,००० |
जयपूर | कोलकाता | |||
राजस्थान रॉयल्स | कोलकाता नाइट रायडर्स | |||
सवाई मानसिंग मैदान | इडन गार्डन्स | |||
क्षमता: २५,००० | क्षमता: ६८,००० | |||
लखनौ | मोहाली | मुंबई | विशाखापटनम | |
लखनौ सुपर जायंट्स | किंग्स XI पंजाब | मुंबई इंडियन्स | दिल्ली कॅपिटल्स | |
इकाना क्रिकेट मैदान | आय.एस. बिंद्रा मैदान | वानखेडे मैदान | एसीए-व्हीडीसीए क्रिकेट मैदान [a] | |
क्षमता: ५०,००० | क्षमता: २६,००० | क्षमता: ३३,००० | क्षमता: २७,५०० | |
साखळी सामने
गुणफलक
हे सुद्धा पहा
बाह्यदुवे
नोंदी
- ^ ACA-VDCA Cricket Stadium will host the first two home matches of the Delhi Capitals franchise as the Arun Jaitley Stadium will not be ready for IPL immediately after hosting the 2024 WPL.
संदर्भ
- ^ "IPL 2024 auction scheduled for December 19 in Dubai". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत).
- ^ "'IPL most likely to start from...': Chairman Arun Dhumal says BCCI to work with government over fixtures". Times of India (इंग्रजी भाषेत). 2024-02-15 रोजी पाहिले.
- ^ "TATA IPL 2023, Final CSK Vs GT - Match Report". iplt20.com (इंग्रजी भाषेत). 2023-05-31 रोजी पाहिले.
- ^ "IPL to allow two bouncers per over". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2023-12-19 रोजी पाहिले.
- ^ "TATA Group secures title sponsorship rights for IPL 2024-28". iplt20.com. 20 January 2024 रोजी पाहिले.
- ^ "Gujarat Titans Announces Shubman Gill as Captain". Gujarat Titans. 2023-11-27 रोजी पाहिले.
- ^ "Shreyas Iyer returns as Captain of KKR, Nitish Rana Named Vice-Captain". Kolkata Knight Riders (इंग्रजी भाषेत). 2023-12-14 रोजी पाहिले.
- ^ "Hardik Pandya announced as captain for the IPL 2024 season". Mumbai Indians (इंग्रजी भाषेत). 2023-12-15 रोजी पाहिले.
- ^ "Rishabh Pant expected to return for Delhi Capitals in IPL 2024". ESPN Cricinfo (इंग्रजी भाषेत). 2023-12-11 रोजी पाहिले.