Jump to content

२०२४ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना

२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अंतिम सामना
स्पर्धा २०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक
भारत ७ गडी राखून विजयी
दिनांक २९ जून २०२४
मैदानकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस
सामनावीरविराट कोहली (भा)
पंच ख्रिस गॅफने (न्यू)
रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
२०२६ →


२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अंतिम सामना २९ जून २०२४ रोजी ब्रिजटाउन, बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल येथे २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा विजेता निश्चित करण्यासाठी खेळवला गेलेलाआंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट सामना होता.[][] हा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान खेळला गेला. आशियाई संघ आणि आफ्रिकन संघ टी२० विश्वचषक अंतिम सामन्यामध्ये आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ होती.[]

अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा टी२० विश्वचषक जिंकला.[] विराट कोहलीला ५९ चेंडूत ७६ धावा केल्याबद्दल सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले, तर संपूर्ण स्पर्धेत १५ गडी बाद करणाऱ्या जसप्रीत बुमराहला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.[] हा सामना विराट कोहली, भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.[][]

पार्श्वभूमी

२२ सप्टेंबर २०२३ रोजी, आयसीसीने संपूर्ण स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन करणारी ठिकाणे जाहीर केली,[] बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल अंतिम सामन्याचे ठिकाण ठरविण्यात आले.[] ५ जानेवारी २०२४ रोजी, आयसीसीने स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आणि अंतिम सामना २९ जून २०२४ रोजी होणार आहे.[१०]

दक्षिण आफ्रिका टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीसाठी पहिल्यांदाच पात्र ठरला[११], तर भारत २००७ मध्ये चॅम्पियन आणि २०१४ मध्ये उपविजेता ठरल्यानंतर तिसऱ्यांदा अंतिम फेरीसाठी पात्र ठरला[१२]. दोन्ही संघ अपराजित राहून अंतिम फेरीसाठी पात्र ठरले, त्यांनी एकही गट स्टेज गेम किंवा सुपर ८ सामना गमावला नाही.[१३] या सामन्यापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिकेने आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहा वेळा एकमेकांशी सामना केला होता ज्यामध्ये भारताने चार वेळा (२००७, २०१०, २०१२, २०१४) आणि दक्षिण आफ्रिकेने दोन वेळा (२००९ आणि २०२२) विजय मिळवला होता.[१४]

अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास

आढावा

  • स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो[१५]
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिकावि भारतचा ध्वज भारत
प्रतिस्पर्धी दिनांक निकाल गुण सामना प्रतिस्पर्धी दिनांक निकाल गुण
गट ड गट फेरी गट अ
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २ जून २०२४ विजयी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड५ जून २०२४ विजयी
Flag of the Netherlands नेदरलँड्स ८ जून २०२४ विजयी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९ जून २०२४ विजयी
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १० जून २०२४ विजयी Flag of the United States अमेरिका १२ जून २०२४ विजयी
नेपाळचा ध्वज नेपाळ १४ जून २०२४ विजयी कॅनडाचा ध्वज कॅनडा १५ जून २०२४ अनिर्णित
गट २ सुपर ८ गट १
Flag of the United States अमेरिका १९ जून २०२४ विजयी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २० जून २०२४ विजयी
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२१ जून २०२४ विजयी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २२ जून २०२४ विजयी
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २३ जून २०२४ विजयी (ड/लु) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २४ जून २०२४ विजयी
उपांत्य सामना १ बाद फेरी उपांत्य सामना २
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २६ जून २०२४ विजयी उपांत्य सामना इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२७ जून २०२४ विजयी
२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अंतिम सामना

दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेने नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे श्रीलंकेवर विजय मिळवून त्यांच्या टी२० विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली[१६] आणि त्याच ठिकाणी नेदरलँड्स आणि बांगलादेशला पराभूत केले. अर्नोस व्हॅले येथे नेपाळला पराभूत केल्यानंतर, त्यांनी ड गटामध्ये शीर्ष स्थानावर राहत गट फेरी पूर्ण केली.  सुपर ८ टप्प्यात, त्यांनी नॉर्थ साउंड येथे सह-यजमान युनायटेड स्टेट्सचा पराभव केला,  गतविजेत्या इंग्लंडचा ग्रॉस आयलेट येथे पराभव केला आणि नॉर्थ साउंड येथे माजी विजेतेआणि सह-यजमान वेस्ट इंडीज संघाचा पराभव करून गट २ मध्ये अग्रस्थान मिळविले

दक्षिण आफ्रिकेने त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील सॅन फर्नांडो येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये पहिल्या उपांत्य सामन्यात मध्ये अफगाणिस्तानचा पराभव करून प्रथमच टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये स्थान मिळवले. मार्को यान्सिनने ३ गडी बाद केले, त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

भारत

भारताने त्यांच्या टी२० विश्वचषक मोहिमेची सुरुवात न्यू यॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे आयर्लंडवर विजय मिळवून केली आणि त्याच मैदानावर त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि सह-यजमान युनायटेड स्टेट्स यांचा पराभव केला.  फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क येथे मुसळधार पावसामुळे कॅनडा विरुद्धचा सामना रद्द करण्यात आला, अशा प्रकारे भारताने अ गटात पहिले स्थान मिळवून गट फेरी पूर्ण केली. सुपर ८ टप्प्यात, त्यांनी बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे अफगाणिस्तानचा पराभव केला, सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर बांगलादेश आणि सेंट लुसियातील ग्रॉस आयलेट येथील डॅरेन सॅमी क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि गट १ मध्ये पहिले स्थान पटकावले.

भारताने गतविजेत्या इंग्लंडला दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये पराभूत करून गयानामधील जॉर्जटाउन येथील प्रोव्हिडन्स स्टेडियममध्ये तिसऱ्यांदा टी२० विश्वचषक अंतिम फेरीत स्थान मिळवले. १० धावा आणि ३ गाडी बाद घेतल्याबद्दल अक्षर पटेलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

सामना

सामना अधिकारी

२८ जून २०२४ रोजी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) न्यू झीलंडचे ख्रिस गॅफने आणि इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ यांना मैदानावरील पंच म्हणून, इंग्लंडचे रिचर्ड केटलबोरो हे तिसरे पंच, ऑस्ट्रेलियाचे रॉड टकर हे राखीव पंच म्हणून आणि वेस्ट इंडीजचे सामनाधिकारी म्हणून रिची रिचर्डसन यांची नावे जाहीर केली.[१७]

संघ आणि नाणेफेक

दोन्ही संघानी अंतिम सामन्यासाठी आपापल्या उपांत्य फेरीतील सामन्यांतील खेळाडूंना कायम ठेवले. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.[१८]

भारताचा डाव

विराट कोहली (२०१५ मधील छायाचित्र) याने अंतिम सामन्यात भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या (५९ चेंडूत ७६ धावा) आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

विराट कोहलीने मार्को यान्सिनच्या पहिल्याच षटकात तीन चौकार लगावत भारतीय डावाची झटपट सुरुवात केली. त्यानंतर पुढच्याच षटकात केशव महाराजच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा आणि ऋषभ पंत लवकर बाद झाले. यानंतर लगेचच सूर्यकुमार यादवला चौथ्या षटकात कागिसो रबाडाने बाद केल्याने भारताची अवस्था ३ गडी बाद ३४ धावा अशी झाली. यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी डाव स्थिर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केलेल्या ७२ धावांच्या दमदार भागीदारी केली ज्यामुळे भारताचा डाव १४व्या षटकात ४ बाद १०६ असा सावरला गेला. मात्र यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकने झटपट केलेल्या थ्रोमुळे अक्षर पटेल धावबाद झाला. ह्या नंतर कोहलीच्या साथीला मधल्या फळीत शिवम दुबे सामील झाला आणि दोघांनी ३२ चेंडूत ५० धावा केल्या. यान्सिनला फटकावण्याच्या प्रयत्नात कोहलीला रबाडाने झेलबाद केले. ॲनरिक नॉर्त्येने टाकलेल्या शेवटच्या षटकात शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा बाद झाल्याने भारताला फक्त ९ धावा करता आल्या आणि भारताचा डाव ७ गाडी बाद १७६ धावांपर्यंत पोहोचू शकला. कोहली भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता त्याने ५९ चेंडूत ७६ धावा केल्या तर ३ षटकात २३ धावा देऊन २ बळी घेणारा केशव महाराज दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वोत्तम गोलंदाज ठरला.[१९][२०][२१]

दक्षिण आफ्रिकेचा डाव

रीझा हेंड्रिक्स आणि एडन मार्करम लवकर बाद झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेची सुरुवात २ गडी बाद १२ अशी संथ झाली. अक्षर पटेलने स्टब्सला बाद करण्यापूर्वी क्विंटन डी कॉक आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी ३८ चेंडूत ५८ धावांची भागीदारी केली.[१९][२०][२१] १३व्या षटकात क्विंटन डी कॉकला अर्शदीप सिंगने बाद केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या होती ४ गाडी बाद १०६ धावा. हाइनरिक क्लासेनच्या केवळ २७ चेंडूत ५२ धावांच्या तडाखेबंद खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या १५० च्या पार गेली, ज्यामध्ये अक्षर पटेलच्या एकाच षटकातील २४ धावांचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेला २४ चेंडूमध्ये विजयासाठी २६ धावांची गरज असताना क्लासेनला हार्दिक पंड्याने यष्टींमागे झेलबाद केले जो सामन्याचा एका दृष्टीने टर्निंग पॉइंट ठरला आणि एका दीर्घ अंतरानंतर १५व्या आणि १७व्या षटकात भारताला गडी बाद करण्यात यश मिळाले. लवकरच जसप्रीत बुमराहने १८व्या षटकात मार्को यान्सिनला बाद केले आणि केवळ दोन धावा दिल्या. अर्शदीपने त्याच्या पुढील आणि संघाच्या १९व्या षटकात केवळ ४ धावा काढू दिल्या त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज होती. शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी हार्दिक पांड्यावर होती आणि षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवने डीपमध्ये घेतलेल्या अचूक आणि अप्रतिम झेलमुळे डेव्हिड मिलर बाद झाला. सूर्यकुमार यादवचा झेल अखेरीस "क्रिकेट इतिहासातील सर्वकालीन झेलांपैकी एक" म्हणून क्रिकेटप्रेमी बांधवांनी गौरवला आणि कॉमेंट्री पॅनलमध्ये प्रसारित झालेल्या इयान स्मिथनेही त्याचे "क्रिकेट इतिहासातील सर्वात महान झेलांपैकी एक" असे वर्णन केले.[२२] इयान स्मिथने कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचन करताना म्हणले की, "Oh my god, I believe I've just seen athleticism at its very best".[२३] ह्यानंतर लवकरच रबाडा ही पाचव्या चेंडूवर बाद झाला. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या चेंडूत ९ धावांची आवश्यकता असताना, पंड्याने फक्त एक धाव दिल्यामुळे भारताने सामना ७ धावांनी जिंकला. क्लासेन हा दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता तर पंड्या भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाज ठरला कारण त्याने ३ षटकांत केवळ २० धावा देऊन ३ गडी बाद केले. बुमराह आणि अर्शदीपने प्रत्येकी २ तर अक्षर पटेलने १ गडी बाद केला.[१९][२०][२१]

सामन्याचा तपशील

२९ जून २०२४
१०:३०
धावफलक
भारत Flag of भारत
१७६/७ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१६९/८ (२० षटके)
विराट कोहली ७६ (५९)
केशव महाराज २/२३ (३ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: विराट कोहली (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • दक्षिण आफ्रिका टी२० विश्वचषक अंतिम सामन्यासाठी पहिल्यांदाच पात्र ठरली होती.[२४]
  • हार्दिक पंड्याचा (भा) हा १००व आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.[२५]
  • विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा (भारत) ह्या तिघांचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.[२६][२७]
  • रोहित शर्मा (भारत) हा टी२० विश्वचषक दोनदा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू,[२८] कपिल देव आणि एमएस धोनी नंतर एक मोठी आयसीसी स्पर्धा जिंकणारा भारताचा तिसरा कर्णधार[२९] आणि ५० आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकणारा पहिला कर्णधार ठरला.[३०]
  • अर्शदीप सिंग (भारत) याची टी२० विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक (१७) बळी घेण्याच्या फझलहक फारूखीच्या विक्रमाची बरोबरी केली.
  • २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाने केलेल्या १७२ धावसंख्येला मागे टाकत भारताने टी२- विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सर्वाधिक (१७६) धावा केल्या.[३१]
  • भारताने त्यांचे दुसरे टी२० विश्वचषक विजेतेपद मिळविले, आणि सर्वात जास्त स्पर्धा विजय मिळविणाऱ्या वेस्ट इंडीज आणि इंग्लंडची बरोबरी केली.[३२]
  • ८ सामने न गमावता टी२० विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला संघ बनला.[३३]


सामन्याचा धावफलक

१ला डाव

भारतचा ध्वज भारत डाव
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
रोहित शर्मा (क) झे. क्लासेन गो. महाराज१८०.००
विराट कोहलीझे. रबाडा गो. यान्सिन७६ ५९ १२८.८१
ऋषभ पंत daggerझे. daggerडी कॉक गो. महाराज०.००
सूर्यकुमार यादवझे. क्लासेन गो. रबाडा७५.००
अक्षर पटेलधावचीत (daggerडी कॉक) ४७ ३१ १५१.६१
शिवम दुबेझे. मिलर गो. नॉर्त्ये२७ १६ १६८.७५
हार्दिक पंड्यानाबाद २५०.००
रवींद्र जडेजा झे. महाराज गो. नॉर्त्ये१००.००
इतर धावा (नो. १, वा. ६)
एकूण२० षटके (धावगती: ८.८०)१७६/७१३

फलंदाजी केली नाही: कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह
गडी बाद होण्याचा क्रम: १-२३ (रोहित शर्मा, १.४ ष), २-२३ (ऋषभ पंत, १.६ ष), ३-३४ (सूर्यकुमार यादव, ४.३ ष), ४-१०६ (अक्षर पटेल, १३.३ ष), ५-१६३ (विराट कोहली, १८.५ ष), ६-१७४ (शिवम दुबे, १९.४ ष), ७-१७६ (रवींद्र जडेजा, १९.६ ष)

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी वाईड नो
मार्को यान्सिन४९ १२.२५
केशव महाराज२३ ७.६६
कागिसो रबाडा३६ ९.००
एडन मार्करम१६ ८.००
ॲनरिक नॉर्त्ये२६ ६.५०
तबरेझ शम्सी3 २६ ८.६६

२रा डाव

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका डाव
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
रीझा हेंड्रिक्सगो. बुमराह८०.००
क्विंटन डी कॉक daggerझे. कुलदीप गो. अर्शदीप३९ ३१ १२५.८०
एडन मार्करम (क) झे. daggerपंत गो. अर्शदीप८०.००
ट्रिस्टन स्टब्सगो. पटेल३१ २१ १४७.६१
हाइनरिक क्लासेनझे. daggerपंत गो. पंड्या५२ २७ १९२.५९
डेव्हिड मिलरझे. यादव गो. पंड्या२१ १७ १२३.५२
मार्को यान्सिनगो. बुमराह५०.००
केशव महाराजनाबाद २८.५७
कागिसो रबाडाझे. यादव गो. पंड्या१३३.३३
ॲनरिक नॉर्त्येनाबाद १००.००
इतर धावा (बा. १, ले.बा. ४, नो. १, वा.३)
एकूण२० षटके (धावगती: ८.४५)१६९/८१३

फलंदाजी केली नाही: तबरेझ शम्सी
गडी बाद होण्याचा क्रम: १-७ (रीझा हेंड्रिक्स, १.३ ष), २-१२ (एडन मार्करम, २.३ ष), ३-७० (ट्रिस्टन स्टब्स, ८.५ ष), ४-१०६ (क्विंटन डी कॉक, १२.३ ष), ५-१५१ (हाइनरिक क्लासेन, १६.१ ष), ६-१५६ (मार्को यान्सिन, १७.४ ष), ७-१६१ (डेव्हिड मिलर, १९.१ ष), ८-१६८ ([कागिसो रबाडा, १९.५ ष),

भारतचा ध्वज भारत गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी वाईड नो
अर्शदीप सिंग२० ५.००
जसप्रीत बुमराह१८ ४.५०
अक्षर पटेल४९ १२.२५
कुलदीप यादव४५ ११.२५
हार्दिक पंड्या२० ६.६६
रवींद्र जडेजा १२ १२.००

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "नवीन स्वरूप, नवीन स्थान: २०२४ टी२० विश्वचषक कसा असेल". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २१ नोव्हेंबर २०२२. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २८ जून २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ बद्दल सर्वकाही". www.icc-cricket.com (इंग्रजी भाषेत). 2024-05-21. २८ जून २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ आयसीसी (२७ जून २०२४). "टी२० विश्वचषक २०२४ अंतिम सामन्यासाठी तपशीलांची पुष्टी". www.icc-cricket.com (इंग्रजी भाषेत). २८ जून २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या द्वंद्वयुद्धानंतर भारताचे टी२० विश्वचषकावर शिक्कामोर्तब". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २९ जून २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "टी२० विश्वचषक २०२४ अंतिम सामना, पुरस्कारांची संपूर्ण यादी: कोहली सामनावीर, बुमराह स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू". स्पोर्टस्टार. २९ जून २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "विराट कोहलीच्या पाठोपाठ रोहित शर्माने विश्वचषक जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्तीची घोषणा केली". इंडिया टुडे (इंग्रजी भाषेत). ३० जून २०२४. ३० जून २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ "'लाईक अ स्टेडफास्ट हॉर्स...': रवींद्र जडेजाची आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्तीची घोषणा". टाइम्स ऑफ इंडिया. ३० जून २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ पश्चिमेकडे जात असताना कॅरिबियन, यूएसए स्थळांची पुष्टी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २५ सप्टेंबर २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २२ सप्टेंबर २०२३ रोजी पाहिले.
  9. ^ "बार्बाडोसमध्ये जून २०२४ मधील आयसीसी टी२० विश्वचषकातील अंतिम आणि इतर ८ सामने खेळविण्यात येणार". बार्बाडोस क्रिकेट असोसिएशन. ५ जानेवारी २०२४ रोजी पाहिले.
  10. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ साठी गट, सामने निश्चित". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ५ जानेवारी २०२४. १० मार्च २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २८ जून २०२४ रोजी पाहिले.
  11. ^ "अफगाणिस्तानला पराभूत करून दक्षिण आफ्रिकेचा पुरुष विश्वचषक अंतिम फेरीत प्रवेश". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ जून २०२४ रोजी पाहिले.
  12. ^ "रोहित, फिरकीपटूंच्या कामगिरीच्या जोरावर भारत तिसऱ्यांदा टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत". हिंदुस्थान टाइम्स. २८ जून २०२४ रोजी पाहिले.
  13. ^ "टी२० विश्वचषक २०२४ वेळापत्रक | आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक सामने आणि निकाल". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ जून २०२४ रोजी पाहिले.
  14. ^ "भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमने सामने - टी२० विश्वचषक". स्पोर्ट्स कीडा. २८ मे २०२४ रोजी पाहिले.
  15. ^ "टी३० विश्वचषक २०२४ वेळापत्रक | आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक सामने आणि निकाल". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ जून २०२४ रोजी पाहिले.
  16. ^ स्मिथ, रॉब (३ जून २०२४). "न्यूयॉर्कमध्ये दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव केला: टी२० क्रिकेट विश्वचषक २०२४ – जसे घडले". द गार्डियन. ३ जून २०२४ रोजी पाहिले.
  17. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ अंतिम सामन्यासाठी सामना अधिकाऱ्यांची नावे". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २८ जून २०२४ रोजी पाहिले.
  18. ^ "भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका थेट धावफलक, टी२० विश्वचषक २०२४ अंतिम सामना: रोहित शर्माने नाणेफेक जिंकली, भारत प्रथम फलंदाजी करत आहे". हिंदुस्थान टाइम्स. २९ जून २०२४ रोजी पाहिले.
  19. ^ a b c "भारत वि दक्षिण आफ्रिका थेट अहवाल". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ जून २०२४. २९ जून २०२४ रोजी पाहिले.
  20. ^ a b c स्पोर्टस्टार, संघ (२९ जून २०२४). "भारत वि दक्षिण आफ्रिका थेट धावफलक, टी२० विश्वचषक अंतिम सामना २०२४". स्पोर्टस्टार (इंग्रजी भाषेत). २९ जून २०२४ रोजी पाहिले.
  21. ^ a b c "भारत वि दक्षिण आफ्रिका थेट धावफलक, टी२० विश्वचषक अंतिम सामना". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). २९ जून २०२४. २९ जून २०२४ रोजी पाहिले.
  22. ^ "आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट झेल? | टी२० विश्वचषक फायनलच्या शेवटच्या षटकात स्कायने केलेले अप्रतिम क्षेत्ररक्षण!". स्काय स्पोर्ट्स. २९ जून २०२४ रोजी पाहिले.
  23. ^ "पहा: सूर्यकुमार यादवने टी२० विश्वचषक फायनल जिंकण्यासाठी 'क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट झेल' घेतला". विस्डेन (इंग्रजी भाषेत). ३० जून २०२४ रोजी पाहिले.
  24. ^ "अफगाणिस्तानला पराभूत करून दक्षिण आफ्रिकेचा पुरुष विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ जून २०२४ रोजी पाहिले.
  25. ^ "हार्दिक पंड्याचा १००वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० विश्वचषक २०२४ अंतिम सामन्यादरम्यान पराक्रम | 🏏 LatestLY". LatestLY (इंग्रजी भाषेत). २९ जून २०२४. २९ जून २०२४ रोजी पाहिले.
  26. ^ ""आता नाही तर कधीच नाही": शेवटचा सामना खेळणाऱ्या कोहलीकडून भारताचा विजय साजरा". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २९ जून २०२४ रोजी पाहिले.
  27. ^ "टी२० विश्वचषक विजयानंतर रवींद्र जडेजाची आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्तीची घोषणा". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३० जून २०२४ रोजी पाहिले.
  28. ^ "भारताने टी२० विश्वचषक २०२४ जिंकून रोहित शर्माने इतिहास रचला, ३ विश्वविक्रम मोडले". टाइम्स नाऊ. ३० जून २०२४ रोजी पाहिले.
  29. ^ "भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना २०२४: रोहित शर्मा, कपिल देव आणि एमएस धोनीनंतर आयसीसी विश्वचषक जिंकणारा तिसरा कर्णधार बनला". द इकॉनॉमिक टाइम्स. २९ जून २०२४ रोजी पाहिले.
  30. ^ "टी२० विश्वचषक अंतिम सामना: रोहित शर्मा, ५० आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकणारा पहिला कर्णधार ठरला". स्पोर्ट्स डेस्क. द इंडियन एक्स्प्रेस. ३० जून २०२४.
  31. ^ "टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने सर्वाधिक धावसंख्येची नोंद केली". द टाइम्स ऑफ इंडिया. २९ जून २०२४. ISSN 0971-8257. २९ जून २०२४ रोजी पाहिले.
  32. ^ "भारताने २०२४ चा टी२० विश्वचषक जिंकला, रोमहर्षक अंतिम सामान्यामध्ये बुमराह, हार्दिकच्या पराक्रमावर दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी हरवले". द इंडियन एक्स्प्रेस. २९ जून २०२४ रोजी पाहिले.
  33. ^ "रोहित शर्मा आणि सहकाऱ्यांनी अपराजित राहून भारतासाठी टी२० विश्वचषक २०२४ची ट्रॉफी उचलली". मिंट. ३० जून २०२४ रोजी पाहिले.
  34. ^ "भारत वि दक्षिण आफ्रिका थेट धावफलक – आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४- ब्रिजटाउन येथील अंतिम सामना, २९ जून २०२४". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ जून २०२४ रोजी पाहिले.