२०२२ स्पेन तिरंगी मालिका
२०२२ स्पेन तिरंगी मालिका | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||
संघ | ||||||||
गर्न्सी | नॉर्वे | स्पेन | ||||||
संघनायक | ||||||||
जॉश बटलर | खिझर अहमद | क्रिस्चियन मुनोज-मिल्स (१ सामना) लॉर्ने बर्न्स (३ सामने) | ||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||
जॉश बटलर (९३) | शेर शहाक (९९) | जॉश ट्रेमबीथ मोरो (९३) | ||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||
ल्युक बिचर्ड (७) | वहिदुल्लाह शहाक (४) | लॉर्ने बर्न्स (९) |
२०२२ स्पेन तिरंगी मालिका ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी एक तिरंगी मालिका २९ एप्रिल ते १ मे २०२२ दरम्यान स्पेनमध्ये झाली. यजमान स्पेनसह गर्न्सी आणि नॉर्वे या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने होते. अल्मेरिया मधील डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान येथे सर्व सामने खेळवले गेले. सर्व संघांनी सदर स्पर्धा जून आणि जुलै २०२२ दरम्यान होणाऱ्या २०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी वापरली.
स्पेनने चारपैकी तीन सामने जिंकून ६ गुणांसह अव्वल स्थानी राहत तिरंगी मालिका जिंकली. गर्न्सीने द्वितीय स्थान पटकावले. तर नॉर्वेला एकच सामना जिंकता आला.
गुणफलक
प्रत्येक संघाने इतर संघाशी दोन सामने खेळले.
संघ | खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती | स्थिती |
---|---|---|---|---|---|---|---|---|
स्पेन | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | १.५९७ | विजेता |
गर्न्सी | ४ | २ | २ | ० | ० | ४ | -०.६७८ | |
नॉर्वे | ४ | ० | ४ | ० | ० | ० | -०.९१६ |
गट फेरी
१ला सामना
नॉर्वे १३७/७ (२० षटके) | वि | गर्न्सी १००/७ (२० षटके) |
शेर शहाक ७०* (२९) ल्युक बिचर्ड २/१४ (४ षटके) | जॉश बटलर १७ (२८) रझा इक्बाल २/१८ (४ षटके) |
- नाणेफेक : नॉर्वे, फलंदाजी.
- नॉर्वे आणि गर्न्सी या दोन्ही देशांनी स्पेनमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- नॉर्वेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये गर्न्सीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- डेक्लन मार्टल, ऑलिव्हर नाइटँगल (ग) आणि अली सलीम (नॉ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
स्पेन १२९/५ (२० षटके) | वि | नॉर्वे ७८/९ (२० षटके) |
यासिर अली ४४ (३९) विनय रवी २/१० (४ षटके) | वालिद घौरी २३ (२८) यासिर अली २/१२ (३ षटके) |
- नाणेफेक : स्पेन, फलंदाजी.
- स्पेन आणि नॉर्वे या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- स्पेनने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये नॉर्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- लॉर्ने बर्न्स, डॅनियेल डॉईल-केल, मोहम्मद कामरान आणि जॉश ट्रेमबीथ-मोरो (स्पे) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
नॉर्वे १२०/७ (२० षटके) | वि | गर्न्सी १२६/२ (१८ षटके) |
खिझर अहमद ३७ (३६) ल्युक बिचर्ड ३/२८ (४ षटके) | टॉम नाइटँगल ४६* (४८) अब्दुल्लाह शेख १/१९ (४ षटके) |
- नाणेफेक : नॉर्वे, फलंदाजी.
- अमिनुल्लाह तन्हा (नॉ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
४था सामना
गर्न्सी ७८ (१८ षटके) | वि | स्पेन ८०/२ (१२.२ षटके) |
जॉश बटलर १६ (१९) लॉर्ने बर्न्स ५/११ (४ षटके) | अवैस अहमद ४२ (२९) मॅथ्यू स्टोक्स १/९ (२ षटके) |
- नाणेफेक : गर्न्सी, फलंदाजी.
- स्पेन आणि गर्न्सी या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- स्पेनने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये गर्न्सीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- बेन वेंटझेल (ग) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
५वा सामना
स्पेन १०७ (२० षटके) | वि | गर्न्सी १११/२ (१८ षटके) |
जॉश ट्रेमबीथ-मोरो २८ (२९) ल्युक बिचर्ड २/१४ (३ षटके) | आयझॅक डामारेल ३८* (४५) राजा अदील १/१२ (३ षटके) |
- नाणेफेक : स्पेन, फलंदाजी.
- गर्न्सीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये स्पेनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
६वा सामना
स्पेन १२५/८ (२० षटके) | वि | नॉर्वे ८४ (१८.५ षटके) |
डॅनियेल डॉईल-केल ३८ (३४) बिलाल साफदार ३/१७ (४ षटके) | अली सलीम १९ (२२) यासिर अली ३/१८ (२.५ षटके) |
- नाणेफेक : स्पेन, फलंदाजी.