२०२२ आयर्लंड महिला तिरंगी मालिका
२०२२ आयर्लंड महिला तिरंगी मालिका | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
संघ | ||||||||||
ऑस्ट्रेलिया | आयर्लंड | पाकिस्तान | ||||||||
संघनायक | ||||||||||
मेग लॅनिंग | लॉरा डिलेनी | बिस्माह मारूफ | ||||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||||
मेग लॅनिंग (११३) | गॅबी लुईस (५४) | मुनीबा अली (५२) | ||||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||||
अलाना किंग (८) | जॉर्जिना डेम्प्सी (२) लॉरा डिलेनी (२) जेन मॅग्वायर (२) अर्लीन केली (२) | तुबा हसन (२) फातिमा सना (२) निदा दर (२) |
२०२२ आयर्लंड महिला तिरंगी मालिका ही महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी एक तिरंगी मालिका १६ ते २४ जुलै २०२२ दरम्यान आयर्लंडमध्ये झाली. यजमान आयर्लंडसह ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला. सर्व सामने हे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने होते. माघेरमासन मधील ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान येथे सर्व सामने खेळवले गेले. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानने सदर स्पर्धा २०२२ राष्ट्रकुल खेळाच्या तयारीसाठी वापरली.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमधील पहिला सामना पावसामुळे उशीरा सुरू झाला. त्यामुळे सामना प्रत्येकी १९ षटकांचा करण्यात आला. पाकिस्तानला ८ षटकांमध्ये ५६ धावांपर्यंत मजल मारता आली. अलाना किंग हिने एकाच षटकात तीन गडी बाद केले. त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने उर्वरीत सामना वेळेअभावी रद्द करण्यात आला. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान आयर्लंडचा ९ गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलिया १३ षटकांच्या आतच लक्ष्याचा पाठलाग केला आणि अलाना किंग हिने पुन्हा एकदा तीन गडी बाद करून गोलंदाजीचे उत्तम प्रदर्शन केले. तिसऱ्या सामन्यात पुन्हा पावसाचा व्यत्यत आला परंतु निर्धारीत ९७ धावांचा पाठलाग यजमान आयर्लंडला करता आला नाही आणि तिसरा सामना पाकिस्तानने जिंकला.
चौथ्या सामन्यात पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने आयर्लंडवर विजय मिळवला. मेगन शुट हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात १००वा गडी बाद केला. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमधील पाचवा सामना पुन्हा पावसामुळे अर्ध्यातूनच रद्द करावा लागला. पाचव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पावसाचा व्यत्यत यायच्या आधी जर केवळ चार चेंडू अधिक खेळले असते तर डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार ऑस्ट्रेलियाने तो सामना जिंकला असता. मालिकेतील आयर्लंड आणि पाकिस्तानमधील शेवटचा सामना एकही चेंडू न टाकता पावसामुळे रद्द करण्यात आला. १२ गुणांसह अव्वल स्थानी राहत ऑस्ट्रेलियाने तिरंगी मालिका जिंकली.
गुणफलक
संघ | खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती | पात्रता |
---|---|---|---|---|---|---|---|---|
ऑस्ट्रेलिया | ४ | २ | ० | ० | २ | १२ | ३.२३० | विजेता |
पाकिस्तान | ४ | १ | ० | ० | ३ | १० | ०.९२९ | |
आयर्लंड | ४ | ० | ३ | ० | १ | २ | -२.५६१ |
गट फेरी
१ला सामना
२रा सामना
३रा सामना
पाकिस्तान ९२/५ (१४ षटके) | वि | आयर्लंड ८३/६ (१४ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान महिला, फलंदाजी.
- पावसामुळे आयर्लंडला १४ षटकांमध्ये ९७ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
४था सामना
५वा सामना
पाकिस्तान ९४/८ (२० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया २८/० (४.२ षटके) |
अलिसा हीली १२* (१४) |
- नाणेफेक : पाकिस्तान महिला, फलंदाजी.
- पावसामुळे उर्वरीत सामना रद्द.