२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पहिली फेरी गट ब
२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिली फेरी गट बचे सामने इथे नोंदीत आहेत. पहिल्या फेरीच्या ब गटात बांगलादेश, ओमान, पापुआ न्यू गिनी आणि स्कॉटलंड हे चार संघ होते. ब गटात पहिल्या स्थानी राहिलेला संघ सुपर १२ मध्ये ब गटात तर दुसऱ्या स्थानी राहिलेला संघ सुपर १२ मध्ये अ गटात पात्र ठरतील.
पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडने कसोटी देश असलेल्या बांगलादेशवर आश्चर्यकारक विजय मिळवून क्रिकेट विश्वाला अचंबित करून सोडले.
गुणफलक
संघ | खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती | पात्र |
---|---|---|---|---|---|---|---|---|
स्कॉटलंड | ३ | ३ | ० | ० | ० | ६ | ०.७७५ | सुपर १२ मध्ये बढती |
बांगलादेश | ३ | २ | १ | ० | ० | ४ | १.७३३ | |
ओमान | ३ | १ | २ | ० | ० | २ | -०.०२५ | बाद |
पापुआ न्यू गिनी | ३ | ० | ३ | ० | ० | ० | -२.६५५ |
सामने
ओमान वि पापुआ न्यू गिनी
पापुआ न्यू गिनी १२९/९ (२० षटके) | वि | ओमान १३१/० (१३.४ षटके) |
जतिंदर सिंग ७३* (४२) |
- नाणेफेक : ओमान, फलंदाजी.
- ओमान आणि पापुआ न्यू गिनी मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- पापुआ न्यू गिनीचा ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकातील पहिला वहिला सामना.
- पापुआ न्यू गिनीने ओमानमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- ओमानने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात ओमानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- आयान खान आणि कश्यप प्रजापती (ओ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
बांगलादेश वि स्कॉटलंड
स्कॉटलंड १४०/९ (२० षटके) | वि | बांगलादेश १३४/७ (२० षटके) |
क्रिस ग्रीव्ह्स ४५ (२८) महेदी हसन ३/१९ (४ षटके) |
- बांगलादेशने ओमानमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
स्कॉटलंड वि पापुआ न्यू गिनी
स्कॉटलंड १६५/९ (२० षटके) | वि | पापुआ न्यू गिनी १४८ (१९.३ षटके) |
- नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.
ओमान वि बांगलादेश
बांगलादेश १५३ (२० षटके) | वि | ओमान १२७/९ (२० षटके) |
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
बांगलादेश वि पापुआ न्यू गिनी
बांगलादेश १८१/७ (२० षटके) | वि | पापुआ न्यू गिनी ९७ (१९.३ षटके) |
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
- बांगलादेश आणि पापुआ न्यू गिनी मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- बांगलादेशने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात पापुआ न्यू गिनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- या सामन्याच्या निकालानंतर या सामन्याच्या निकालामुळे पापुआ न्यू गिनी स्पर्धेतून बाद तर बांगलादेश सुपर १२ साठी पात्र ठरला.
- ह्या विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीत पोचल्यामुळे बांगलादेश २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक साठी देखील पात्र ठरला.
ओमान वि स्कॉटलंड
ओमान १२२ (२० षटके) | वि | स्कॉटलंड १२३/२ (१७ षटके) |
- नाणेफेक : ओमान, फलंदाजी.
- या सामन्याच्या निकालानंतर या सामन्याच्या निकालामुळे ओमान स्पर्धेतून बाद तर स्कॉटलंड सुपर १२ साठी पात्र ठरला.
- ह्या विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीत पोचल्यामुळे स्कॉटलंड २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक साठी देखील पात्र ठरला.