Jump to content

२०२१ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक

२०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
चित्र:Logo of ICC World T20.svg
अधिकृत लोगो
तारीख १७ ऑक्टोबर – १४ नोव्हेंबर २०२१
व्यवस्थापकआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
यजमानसंयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
ओमान ओमान
विजेतेऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (१ वेळा)
सहभाग १६
सामने ४५
मालिकावीरऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नर
सर्वात जास्त धावापाकिस्तान बाबर आझम (३०३)
सर्वात जास्त बळीश्रीलंका वनिंदु हसरंगा (१६)
← २०१६ (आधी)(नंतर) २०२२ →

२०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक ही क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने प्रकारातल्या आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषकातली सातवी आवृत्ती आहे. सदर स्पर्धा संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या दोन देशांमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२१ दरम्यान खेळवली जाईल. या स्पर्धेत अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, आयर्लंड, भारत, नामिबिया, नेदरलँड्स, न्यू झीलँड, ओमान, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज हे सोळा देश भाग घेतील. यांपैकी नामिबिया आणि पापुआ न्यू गिनी या दोन देशांनी ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पदार्पण केले. मागील स्पर्धेचे विजेते वेस्ट इंडीज होते.

स्पर्धेची ही आवृत्ती मूलतः २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया खेळली जाणार होती. २०२० आणि २०२१ असे लागोपाठ दोन ट्वेंटी२० विश्वचषकांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु जुलै २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने विश्वभर फैलावला गेलेला कोरोनाव्हायरस या साथरोगाच्या संक्रमणामुळे २०२०चा विश्वचषक दोन वर्षांनी पुढे ढकलला. त्यामुळे भारतात २०२२ साली होणारा विश्वचषक २०२१ साली होईल आणि २०२० साली ऑस्ट्रेलियात होणारा विश्वचषक २०२२ साली होईल असे जाहीर झाले. पण भारतामध्ये मे २०२१ दरम्यान कोरोनाव्हायरसची दुसरी लाट आल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने विश्वचषक भारतातून संयुक्त अरब अमिराती आणि ओमान स्थानांतरित केल्याची घोषणा ऑगस्ट २०२१ मध्ये केली. दोन दिवसांनंतर मैदाने आणि सामन्यांचे वेळापत्रक जारी करण्यात आले.

१५ ऑगस्ट २०२१ रोजी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर हल्ला चढवून शहर व देश ताब्यात घेतल्यानंतर अस्थिर झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे विश्वचषकात अफगाणिस्तानच्या सहभागाबद्दल शंका निर्माण झाल्या. परंतु राजकीय परिस्थिती कशीही असली तरी विश्वचषकात अफगाणिस्तान सहभाग घेणार असल्याचे अफगाण क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले. अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असघर अफगाण आणि वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो या दोघांनी विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

उपांत्य फेरीसाठी सुपर १२ च्या अ गटामधून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड तर ब गटामधून पाकिस्तान आणि न्यू झीलंड हे संघ पात्र ठरले. पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडचा ५ गडी राखून पराभव करत न्यू झीलंड अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा पराभव करीत ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात न्यू झीलंडचा ८ गडी राखून विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पहिल्यांदा जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. पाकिस्तानचा बाबर आझम याने सर्वाधिक ३०३ धावा केल्या तर श्रीलंकेचा वनिंदु हसरंगा याने सर्वाधिक १६ गडी बाद करत विश्वचषकात आघाडीचा गोलंदाज ठरला.

पार्श्वभूमी

एप्रिल २०२० मध्ये आयसीसीने कोव्हिड-१९ची साथ जगभर असताही स्पर्धा ठरल्याप्रमाणे खेळली जाईल. तथापि, पुढील महिन्यात आयसीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की २०२० मध्ये या स्पर्धेचे आयोजन करणे हा "खूप मोठा धोका" आहे, आयसीसीने असेही म्हणले होते की स्पर्धा पुढे ढकलण्याचे अहवाल चुकीचे होते आणि या स्पर्धेची आयोजन वेळापत्रकानुसार करण्यासाठी अनेक योजनांवर विचार केला जात होता. १० जून २०२० रोजी होणाऱ्या आयसीसीच्या सर्वसाधारण बैठकीपर्यंत स्पर्धेचा बेत स्थगित करण्यात आला आणि पुढील निर्णय जुलै २०२० मध्ये घेतला जाण्याचे संकेत देण्यात आले. जून २०२०मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष अर्ल एडिंग्स यांनी सांगितले की, ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात नियोजित वेळेनुसार होण्याची शक्यता नव्हती. एडिंग्सने असेही सुचवले की ऑक्टोबर २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया या स्पर्धेचे आयोजन करू शकते आणि भारत एक वर्षानंतर २०२२ मध्ये स्पर्धा आयोजित करेल. आयसीसीने ही स्पर्धा पुढील महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या आसपास खेळवण्याचा विचार केला, जी मूलतः न्यू झीलंडमध्ये फेब्रुवारी २०२१ मध्ये होणार होती.

स्पर्धा अधिकृतपणे स्थगित होण्याच्या एक महिना आधी ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन मंत्री सायमन बर्मिंगहॅम यांनी घोषणा केली की ऑस्ट्रेलियन सरकारने देशाच्या सीमा २०२१पर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी बंद केल्या आहेत. त्याच महिन्यात आयसीसीने सांगितले की श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरातीला स्पर्धेसाठी पर्यायी यजमान असतील. एप्रिल २०२१ मध्ये आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योफ अलार्डिस यांनी सांगितले की कोव्हिडच्या साथीमुळे स्पर्धेचे आयोजन करण्यास भारत असमर्थ असेल तर पर्यायी योजना आयसीसीकडे आहेत. त्याच महिन्याच्या शेवटी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) धीरज मल्होत्रा ​​यांनी सांगितली जर भारतातील कोव्हिड वाढत गेले तर स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवली जाईल. बीसीसीआयने या स्पर्धेचे संभाव्य सह-यजमान म्हणून ओमानशी देखील चर्चा केली. १ जून, २०२१ रोजी आयसीसीने बीसीसीआयला २८ जून २०२१ पर्यंत स्पर्धेचे स्थळ ठरविण्यासाठीची अंतिम मुदत दिली. नंतर, आयसीसीने स्पर्धा संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये हलवण्यात असल्याचे जाहीर केले. संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या दोन्ही देशांसाठी आयसीसीच्या जागतिक स्पर्धेचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ होती आणि क्रिकेट विश्वचषक पूर्णपणे उच्चभ्रू कसोटी खेळणाऱ्या देशांबाहेर आयोजित केला जात होता.

सहभागी देश

३१ डिसेंबर २०१८ च्या नियमाप्रमाणे जागतिक क्रमवारीतील प्रथम ९ देश आणि यजमान भारतासह विश्वचषकासाठी आपोआप पात्र ठरले. पात्र झालेल्या १० देशांपैकी अव्वल ८ देश सुपर १२ साठी पात्र ठरले तर बांगलादेश आणि श्रीलंका हे प्रथम फेरीसाठी पात्र ठरले. या दोन संघांना २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रतामधून आलेले ६ संघ मिळतील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर १२ फेरी खेळतील.

देश/संघ पात्रतेचा मार्ग सद्य धरून एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
ओमानचा ध्वज ओमान यजमान, २०२० ट्वेंटी२० विश्वचषक पात्रता फेरी २०१६ प्रथम फेरी (२०१६)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३१ डिसेंबर २०१८ रोजीची ट्वेंटी२० क्रमवारी २०१६ उपविजेते (२०१०)
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०१६ सुपर १० (२०१६)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०१६ सुपर १० (२०१६)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२०१६ विजेते (२०१०)
भारतचा ध्वज भारत २०१६ विजेते (२००७)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २०१६ उपांत्य फेरी (२००७, २०१६)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २०१६ विजेते (२००९)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २०१६ उपांत्य फेरी (२००९, २०१४)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २०१६ विजेते (२०१४)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २०१६ विजेते (२०१२, २०१६)
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड२०२० ट्वेंटी२० विश्वचषक पात्रता फेरी २०१६ सुपर ८ (२००९)
नामिबियाचा ध्वज नामिबिया पदार्पण पदार्पण पदार्पण
Flag of the Netherlands नेदरलँड्स २०१६ सुपर १० (२०१४)
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी पदार्पण पदार्पण पदार्पण
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड २०१६ प्रथम फेरी (२००७, २००९, २०१६)

सामन्यांची ठिकाणे

संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती ओमान ओमान
दुबईशारजाह अबुधाबी मस्कत
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमशारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमशेख झायेद क्रिकेट स्टेडियमअल् अमारत क्रिकेट मैदान
क्षमता: २५,००० क्षमता: २७,००० क्षमता: २०,००० क्षमता: ३,०००

संघ

१० ऑक्टोबर २०२१ पूर्वी प्रत्येक संघाने १५ जणांचे पथक जाहीर केले. कोव्हिड-१९ मुळे प्रत्येक संघाला पथकामध्ये आधिक सात राखीव खेळाडू घेण्याची मुभा होती. १० ऑगस्ट २०२१ रोजी पथक जाहीर करणारा न्यू झीलंड पहिला संघ ठरला.

बक्षिस रक्कम

  • विजेत्या संघाला १.६ दशलक्ष अमेरिकन डॉलर
  • उपविजेत्या संघाला $८००,०००
  • उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी $४००,०००
  • प्रथम फेरीच्या प्रत्येक सामन्याच्या विजयी संघाला प्रत्येक सामन्यासाठी $४०,०००
  • प्रथम फेरीतून बाद झालेल्या प्रत्येक संघांना $४०,०००
  • सुपर १२ फेरीच्या प्रत्येक सामन्याच्या विजयी संघाला प्रत्येक सामन्यासाठी $४०,०००
  • सुपर १२ फेरीतून बाद झालेल्या प्रत्येक संघांना $७०,०००

सामनाधिकारी

७ ऑक्टोबर २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने स्पर्धेसाठी सामनाधिकारी आणि पंचांची घोषणा केली.

सामनाधिकारी

पंच

झिम्बाब्वे ː
* झिम्बाब्वेलँग्टन रुसेरे

सराव सामने

प्रथम फेरी

गट अ

संघ
खेविगुणधावगतीपात्र
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३.७५४सुपर १२ मध्ये बढती
नामिबियाचा ध्वज नामिबिया -०.५२३
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड-०.८५३बाद
Flag of the Netherlands नेदरलँड्स -२.४६०
१८ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१०६ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१०७/३ (१५.१ षटके)

१८ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
९६ (१९.३ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१००/३ (१३.३ षटके)

२० ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१६४/४ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१६६/४ (१९ षटके)

२० ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१७१/७ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१०१ (१८.३ षटके)

२२ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१२५/८ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१२६/२ (१८.३ षटके)

२२ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
४४ (१० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
४५/२ (७.१ षटके)


गट ब

संघ
खेविगुणधावगतीपात्र
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ०.७७५सुपर १२ मध्ये बढती
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १.७३३
ओमानचा ध्वज ओमान -०.०२५बाद
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी -२.६५५
१७ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१२९/९ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१३१/० (१३.४ षटके)
ओमान १० गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत

१७ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१४०/९ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१३४/७ (२० षटके)
स्कॉटलंड ६ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत

१९ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१६५/९ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१४८ (१९.३ षटके)
स्कॉटलंड १७ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत

१९ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१५३ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१२७/९ (२० षटके)
बांगलादेश २६ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत

२१ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१८१/७ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
९७ (१९.३ षटके)
बांगलादेश ८४ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत

२१ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
ओमान Flag of ओमान
१२२ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१२३/२ (१७ षटके)
स्कॉटलंड ८ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत


सुपर १२

गट अ

संघ
खेविगुणधावगतीपात्र
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२.४६४उपांत्य फेरीत मध्ये बढती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १.२१६
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ०.७३९बाद
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका -०.२६९
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज -१.६४१
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश -२.३८३
२३ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
११८/९ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२१/५ (१९.४ षटके)

२३ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
५५ (१४.२ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
५६/४ (८.२ षटके)

२४ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१७१/४ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१७२/५ (१८.५ षटके)

२६ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१४३/८ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१४४/२ (१८.२ षटके)

२७ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१२४/९ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२६/२ (१४.१ षटके)

२८ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१५४/६ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५५/३ (१७ षटके)

२९ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१४२/७ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१३९/५ (२० षटके)

३० ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१४२ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१४६/६ (१९.५ षटके)

३० ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१२५ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२६/२ (११.४ षटके)

१ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१६३/४ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१३७ (१९ षटके)

२ नोव्हेंबर २०२१
१४:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
८४ (१८.२ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
८६/४ (१३.३ षटके)

४ नोव्हेंबर २०२१
१४:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
७३ (१५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७८/२ (६.२ षटके)

४ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१८९/३ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६९/८ (२० षटके)

६ नोव्हेंबर २०२१
१४:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१५७/७ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६१/२ (१६.२ षटके)

६ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१८९/२ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७९/८ (२० षटके)


गट ब

संघ
खेविगुणधावगतीपात्र
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १०१.५८३उपांत्य फेरीत बढती
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १.१६२
भारतचा ध्वज भारत १.७४७बाद
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १.०५३
नामिबियाचा ध्वज नामिबिया -१.८९०
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड -३.५४३
२४ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१५१/७ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१५२/० (१७.५ षटके)

२५ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१९०/४ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
६० (१०.२ षटके)

२६ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१३४/८ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३५/५ (१८.४ षटके)

२७ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१०९/८ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
११५/६ (१९.१ षटके)

२९ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१४७/६ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४८/५ (१९ षटके)

३१ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१६०/५ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
९८/९ (२० षटके)

३१ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
११०/७ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१११/२ (१४.३ षटके)

२ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१८९/२ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१४४/५ (२० षटके)

३ नोव्हेंबर २०२१
१४:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१७२/५ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१५६/५ (२० षटके)

३ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२१०/२ (२० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१४४/७ (२० षटके)

५ नोव्हेंबर २०२१
१४:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१६३/४ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१११/७ (२० षटके)

५ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
८५ (१७.४ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
८९/२ (६.३ षटके)

७ नोव्हेंबर २०२१
१४:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१२४/८ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१२५/२ (१८.१ षटके)

७ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१८९/४ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
११७/६ (२० षटके)

८ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१३२/८ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१३६/१ (१५.२ षटके)


बाद फेरी

  उपांत्य सामने अंतिम सामना
                 
अ१  इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१६६/४ (२० षटके)  
ब२  न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड१६७/५ (१९ षटके) 
    ब२  न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड१७२/४ (२० षटके)
  अ२  ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१७३/२ (१८.५ षटके)
ब१  पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान१७६/४ (२० षटके)
अ२  ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१७७/५ (१९ षटके) 

उपांत्य फेरी

उपांत्य फेरीचे दोन सामने १० आणि ११ नोव्हेंबर २०२१ रोजी खेळविण्यात आले.

१ला उपांत्य सामना

पहिला उपांत्य सामना अबुधाबी मध्ये खेळवण्यात आला. इंग्लंड आणि न्यू झीलंड हे दोन्ही संघ ट्वेंटी२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पुन्हा आमनेसामने आले. न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. संयुक्त अरब अमिरातीमधील कोरड्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करत असूनसुद्धा इंग्लंडने २० षटकांमध्ये १६६ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडच्या मोईन अली याने इंग्लंडतर्फे डावात सर्वाधिक नाबाद ५१ धावा केल्या. न्यू झीलंडकडून टिम साउदी, ॲडम मिल्ने, इश सोधी आणि जेम्स नीशम यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले. १६७ धावांचा पाठलाग करताना न्यू झीलंडची सुरुवात खराब झाली. पॉवरप्लेमध्ये २ गडी बाद झाल्याने न्यू झीलंडचे मनोबल ढासळले. शेवटच्या चार षटकांमध्ये ५७ धावांची गरज असताना २०१६ च्या ट्वेंटी२० विश्वचषकाच्या इंग्लंड विरुद्ध न्यू झीलंड उपांत्य सामन्याची पुनरावृत्ती होणार असे वाटू लागले. परंतु डॅरियेल मिचेल याच्या उत्तुंग नाबाद ७२ धावांच्या जोरावर न्यू झीलंडने ते अशक्य वाटणारे लक्ष्य ६ चेंडू शेष ठेवून गाठले. न्यू झीलंडने उपांत्य सामना जिंकत आपल्या पहिल्या वहिल्या ट्वेंटी२० क्रिकेटविश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.

१० नोव्हेंबर २०२१ (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१६६/४ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१६७/५ (१९ षटके)


२रा उपांत्य सामना

दुसरा उपांत्य सामना दुबई मध्ये खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सुपर १२ गट फेरीचे सर्व सामने जिंकून आत्मविश्वासाने पाकिस्तानी फलंदाजांनी डावाची चांगली सुरुवात केली. अनुभवी फलंदाज मोहम्मद रिझवान याच्या संयमी ६७ धावांच्या खेळीने पाकिस्तानने २० षटकांमध्ये ४ गड्यांच्या मोबदल्यात १७६ या आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल स्टार्क याने सर्वाधिक २ गडी बाद केले. १७६ या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाज खेळपट्टीवर सुरुवातीस तग धरू शकले नाहीत. शेवटच्या १० षटकांमध्ये ८७ धावांची गरज असताना डेव्हिड वॉर्नर ४९ धावांची उपयुक्त खेळी करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या मॅथ्यू वेड याने किल्ला लढवत ठेवला. अखेरच्या ९ चेंडूंमध्ये १८ धावांची गरज असताना मॅथ्यू वेड याने सलग तीन षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाला १७६ धावांचे आव्हान पार करून दिले. ऑस्ट्रेलिया २०१० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक नंतर प्रथमच अंतिम सामन्यात पात्र ठरला.

११ नोव्हेंबर २०२१ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१७६/४ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७७/५ (१९ षटके)


अंतिम सामना

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून अपेक्षेप्रमाणे प्रथम क्षेत्ररक्षण करण्याच्या निर्णय घेतला. कर्णधार केन विल्यमसनच्या ८५ धावांच्या मदतीने न्यू झीलंडने १७२ धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांच्या उत्तम खेळीच्या जोरावर १७३ धावांचे लक्ष्य ८ गडी आणि ७ चेंडू शेष ठेवून लिलयापणे साध्य केले आणि पहिला वहिला ट्वेंटी२० विश्वचषक आपल्या नावावर केला.

१४ नोव्हेंबर २०२१ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१७२/४ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७३/२ (१८.५ षटके)


आकडेवारी

सर्वाधिक धावा

खेळाडूसामनेडावधावासरासरीस्ट्रा.रे.सर्वो. धावा१००५०चौकारषटकार
पाकिस्तान बाबर आझम३०३६०.६०१२६.२५७०२८
ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नर२८९४८.१६१४६.७०८९*३२१०
पाकिस्तान मोहम्मद रिझवान २८१७०.२५१२७.७२७०*२३१२
इंग्लंड जोस बटलर२६९८९.६६१५१.१२१०१*२२१३
श्रीलंका चरिथ असलंका२३१४६.२०१४७.१३८०*२३

सर्वाधिक बळी

खेळाडूसामनेडावबळीषटकेइकॉ.सरासरीसर्वो. गोलंदाजीस्ट्रा.रे.४ गडी५ गडी
श्रीलंका वनिंदु हसरंगा१६३०५.२०९.७५३/९११.२
ऑस्ट्रेलिया ॲडम झम्पा १३२७५.८११२.०७५/१९१२.४
न्यूझीलंड ट्रेंट बोल्ट१३२७.४६.२५१३.३०३/१७१२.७
बांगलादेश शाकिब अल हसन११२२५.५९११.१८४/९१२.०
ऑस्ट्रेलिया जोश हेझलवूड ११२४७.२९१५.९०४/३९१३.०