२०१९ आल्बेनिया भूकंप
अल्बेनियाचा नकाशा. तारांकित भुकंपकेन्द्र. | |
Durrës Kodër-Thumanë Tirana | |
UTC time | 2019-11-26 02:54:12 Needs 'yyyy-mm-dd hh:mm' |
---|---|
ISC event | साचा:Eq-isc-link |
USGS-ANSS | ComCat |
Local date | नोव्हेंबर २६, इ.स. २०१९ |
Local time | 03:54:12 CET (UTC+1) |
Magnitude | 6.4 {{w}} |
Depth | २०.० किमी (१२.४ मैल) |
Epicenter | 41°31′16″N 19°33′32″E / 41.521°N 19.559°Eगुणक: 41°31′16″N 19°33′32″E / 41.521°N 19.559°E |
प्रकार | Thrust |
कमाल तीव्रता | VIII (Severe) |
अत्युच्च प्रवेग | 0.469 g |
अत्युच्च वेग | 39.99 cm/s |
सुनामी | नाही |
भूस्खलन | नाही |
Aftershocks | |
Casualties | ५१ ठार, ३००० जखमी |
२६ नोव्हेंबर २०१९ रोजी वायव्य आल्बेनिया क्षेत्रात ६.४ रिश्टर तिव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप ०३:५४ मध्य युरोपीय प्रमाणवेळला (सीईटी) ममुर्रसच्या १२ किलोमीटर (७.५ मैल) दूर येथे झाला जे भुकंपकेन्द्र होते. हा भूकंप अल्बेनियाची राजधानी तिराना येथे देखील जाणवला. भूकंपात कमीतकमी ५१ लोक ठार झाले आणि ३००० जखमी झाले.[१][२] आल्बेनिया ४० वर्षात येणारा हा सर्वात भयंकर भूकंप होता.[३] १ एप्रिल १९७९ रोजी ६.९ रिश्टर]] तिव्रतेचा भूकंप झाला होता. २०१९ मधील आल्बेनियामधील हा तिसरा भूकंप आहे. यापूर्वीचे दोन भूकंप १ जून आणि २१ सप्टेंबर रोजी झाले आहेत.
भूकंप
भूकंपानंतर २७ नोव्हेंबर पर्यंत शेकडो आफ्टरशॉक झाले आहेत, त्यापैकी चार एम 5.0 पेक्षा मोठे आहेत आणि पुढील सहा एम 4 ते 5 दरम्यान आहेत. सर्वात मोठा आफ्टर शॉक ०७:०८ सीईटी येथे आला, जो मुख्य भूकंपाच्या चार तासांपेक्षा कमी वेळेत आहे व एम 5.4 च्या तीव्रतेसह होता. यामुळे तीव्रता VII (खूप मजबूत) चे थरथराट जाणवले.
नुकसान
भूकंपाच्या केंद्राजवळ असलेल्या दुरिस व कोदर-थुमाने या मोठ्या बंदरांमध्ये नुकसान फार गंभीर होते. दुरिसमध्ये दोन हॉटेल आणि दोन अपार्टमेंट ब्लॉक्स कोसळले. कोदर-थुमाने येथे पाच मजली अपार्टमेंट सह चार इमारती कोसळल्या. अनेक लोक उद्ध्वस्त झालेल्या इमारतींच्या अवशेषात अडकले होते. विशेष सैन्याने बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू ठेवला. भूकंपामुळे २,५०० लोक विस्थापित झाले आहेत आणि त्यांना दुरिस फुटबॉल स्टेडियममध्ये तंबू किंवा हॉटेलमध्ये तात्पुरते सामावून घेण्यात आले होते.
आल्बेनिया आणि शेजारच्या कोसोव्हो येथे राष्ट्रीय शोक दिन जाहीर करण्यात आला. कोसोवो देशात आल्बेनियन बहुसंख्य लोकसंख्या आहे आणि दोन बळी याच देशातील आहेत. दुरिस आणि टिरानासाठी आपत्कालीन स्थिती जाहीर केली गेली.
आंतरराष्ट्रीय सहाय्य
बल्गेरियाच्या सरकारने आल्बानियाला मानवतावादी मदतीसाठी १००,००० युरोचे वाटप केले. आंतरिक मंत्रालयाच्या नागरी संरक्षणासाठी संचालनालयाच्या १५ सदस्यांचे आणि शोध आणि बचाव कुत्र्यांचा समावेश असलेले शोध कार्यसंघ, तसेच दोन लष्करी हेलिकॉप्टर क्रोएशियामधून पाठविण्यात आले. फ्रान्स, ग्रीस, इटली, कोसोव्हो, मॉन्टेनेग्रो, उत्तर मॅसेडोनिया, रोमानिया, सर्बिया, स्वित्झर्लंड, तुर्की आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यासारख्या अनेक देशांनी सहाय्य करून अशीच आर्थिक मदत केली. विविध शेजारी देशांनी निधी उभारणीचे कार्यक्रमदेखील सुरू केले ज्याद्वारे नागरिकांनीही हातभार लावला. कोसोव्होच्या नागरिकांनी मदतीसाठी ३.५ दशलक्ष युरोपेक्षा जास्त योगदान दिले. अन्न आणि वैद्यकीय मदत देखील पुरविली गेली.
संदर्भ
- ^ Vila, Janula (29 December 2019). "Shuarja e 51 jetëve, orët e ankthit dhe shpresa për t'i gjetur gjallë, historitë tronditëse të 26 nëntorit, lëkundjet që shuan shumë ëndërra". Dosja. 31 January 2020 रोजी पाहिले.
- ^ "EU Leads International Help to Albania Quake Recovery". Voice of America (VOA). 2 December 2019. 2 December 2019 रोजी पाहिले.
- ^ Razak, R.; Prifti, A.; Westcott, B.; Picheta, R. (26 November 2019). "At least 23 killed, 325 injured, as 6.4-magnitude earthquake strikes Albania". CNN World.