Jump to content

२०१६ इंडियन प्रीमियर लीग

२०१६ इंडियन प्रीमियर लीग
व्यवस्थापकबीसीसीआय
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकार दुहेरी साखळी सामने आणि प्ले ऑफ
यजमानभारत ध्वज भारत
विजेतेसनरायझर्स हैदराबाद (१ वेळा)
सहभाग
सामने ६०
मालिकावीरविराट कोहली (बंगळूर)
सर्वात जास्त धावाविराट कोहली (९७३)
सर्वात जास्त बळीभुवनेश्वर कुमार (२३)
अधिकृत संकेतस्थळwww.iplt20.com
२०१५ (आधी)(नंतर) २०१७

इंडियन प्रीमियर लीगचा २०१६ हंगाम हा आयपीएल ९ किंवा विवो आयपीएल २०१६ म्हणूनही ओळखला जातो. बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा नववा हंगाम होता. सदर स्पर्धा ९ एप्रिल ते २९ मे २०१६ दरम्यान खेळवली गेली.

२९ मे २०१६ रोजी एम. चिन्नास्वामी मैदान, चेन्नई येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला पराभूत करून विवो आयपीएल, २०१६ चषक जिंकला. सनरायझर्स हैदराबादचे हे पहिलेच आयपीएल विजेतेपद.

अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार सनरायझर्स हैदराबादच्या बेन कटिंग ह्याला देण्यात आला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या विराट कोहलीला स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू तर सनरायझर्स हैदराबादच्याच, मुस्तफिजूर रहमान याला आयपीएल २०१६चा उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

स्वरूप

ह्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्स ह्या २ वर्षांसाठी वगळण्यात आलेल्या संघांऐवजी पुणे आणि राजकोट हे दोन नवे संघ सहभागी झाले.[].

सदर दोन संघांसाठी १५ डिसेंबर २०१५ रोजी ड्राफ्ट पद्धतीने निवड झालेले खेळाडू खालील प्रमाणे [].
पुणे - महेंद्रसिंग धोणी, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन आश्विन, स्टीव्हन स्मिथ आणि फाफ डू प्लेसी
राजकोट - सुरेश रैना, रविंद्र जडेजा, ब्रॅन्डन मॅककुलम, जेम्स फॉकनर आणि ड्वेन ब्राव्हो

स्पर्धेचे वेळापत्रक १० मार्च २०१६ रोजी जाहीर झाले. स्पर्धेत ५६ साखळी सामने आणि ४ प्ले ऑफ सामने असे एकूण ६० सामने खेळवण्यात आले.[]

२०१६ च्या स्पर्धेत प्रथमच एलईडी यष्ट्या वापरण्यात आल्या. आयपीएल फॅन पार्कांची संख्या १६ वरून वाढवून ३६ करण्यात आली, ज्या मध्ये न्यू जर्सीमधील एका पार्काचा समावेश आहे.[]

पार्श्वभूमी

१४ जुलै २०१५ रोजी, आरएम लोढा समितीने चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सच्या मालकांना २०१३ आयपीएल स्पर्धेतील स्पॉट फिक्सींग आणि बेटींग प्रकरणी दोन वर्षांसाठी निलंबीत केले. त्यामुळे हे दोन संघ आयपीएल २०१६ आणि २०१७ मध्ये खेळू शकणार नाहीत.[] पुढच्या दोन आयपीएल हंगामां मध्ये दोन नवीन संघ त्यांची जागा घेतील असे बीसीसीआयने जाहीर केले.

ऑक्टोबर २०१५ मध्ये, २०१७ मध्य समाप्त होणाऱ्या पाच-वर्षाच्या करारामधून पेप्सिको कंपनीने मुख्य प्रायोजक म्हणून अंग काढून घेतले. त्याऐवजी चीनमधील स्मार्टफोन निर्माते व्हिवो इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला २०१६ आणि २०१७ चे मुख्य प्रायोजक म्हणून पुरस्कृत करण्यात आले.[]

नोव्हेंबर २०१५, मध्ये बीसीसीआयने अज्ञात कारणांमुळे जयपूर (राजस्थान रॉयल्स) आणि कोची (रद्दबातल कोची टस्कर केरळ) या दोन शहरांना वगळून नऊ शहराची नवीन संभाव्य फ्रँचायझीच्या यादीत निवड केली.[] निवड झालेली ९ शहरे पुढीलप्रमाणे: चेन्नई, धरमशाला, इंदूर, नागपूर, पुणे, राजकोट, रांची आणि विशाखापट्टणम्.[] नवीन फ्रँचायझी उलट लिलाव प्रक्रियेने दिल्या गेल्या, ज्या कंपन्यानी लिलाव प्रक्रियेत केंद्रीय महसूलाचा कमीत कमी वापर केला त्याना नवीन संघांचे मालकत्व देण्यात आले.[] ३ डिसेंबरला दिल्या गेलेल्या माहितीनुसार लिलाव प्रक्रियेसाठी १२ कंपन्याच्या निविदा घेतल्या गेल्या होत्या.[]

८ डिसेंबर २०१५ रोजी घोषित केल्यानुसार, न्यू रायझिंग (संजीव गोएंका यांचे प्रतिनिधित्व असलेली कंपनी) आणि इंटेक्स टेक्नॉलॉजिस ह्या कंपन्यांनी नवीन संघाच्या लिलावाचे अधिकार जिंकले. न्यू रायझिंग कंपनीने पुणे स्थित संघ निवडला तर इंटेक्सने राजकोटची निवड केली.[१०] १५ डिसेंबर २०१५ रोजी दोन नवीन फ्रँचायझींनी ड्राफ्ट मधून चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स मधील प्रत्येकी ५ खेळाडूंची निवड केली. प्रत्येक फ्रँचायझीने त्यांचा ड्राफ्ट आणि लिलावामधून संघ विकत घेण्यासाठी ६६ कोटींचे वाटप केले.[]

महाराष्ट्र पाणी संकट

महाराष्ट्रात तीन ठिकाणी होत असलेल्या २० सामन्यांवरून, ६ एप्रिल २०१६ रोजी, 'महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना आयपीएल सामन्यांसाठी पाण्याचा होत असलेला अपव्यय ही "गुन्हेगारी स्वरूपाची" बाब आहे' अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनला फटकारले [११]. मुंबई, नागपूर आणि पुणे येथे खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यांसाठी खेळपट्टी तयार करताना जवळपास ६० लाख लिटर पाणी वापरले जाणार आहे.[११] आयपीएल सामन्यांपेक्षा दुष्काळात होरपळत असलेली जनता जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे हे सामने अन्य राज्यांत का खेळवले जाऊ नयेत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने सर्व संबंधित यंत्रणांना केली.[१२]

८ एप्रिल २०१६ रोजी, 'आयपीएल राज्याबाहेर गेली तरी चालेल, पण क्रिकेट सामन्यांसाठी राज्य सरकार पाणी देणार नाही' अशी भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.[१३] ९ एप्रिल २०१६ रोजी, स्पर्धेच्या पहिल्या सामन्याला काही तास शिल्लक असताना, मुंबई क्रिकेट असोसिएशनने दावा केला की, वानखेडे मैदानासाठी जे पाणी वापरले गेले ते बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून नाही तर खासगी कंपन्यांकडून आणले गेले आहे.[१४]

दरम्यान १३ एप्रिल रोजी संबंधित प्रकरणावर झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने, ३० एप्रिल नंतरचे सामने राज्याबाहेर खेळवा असे आदेश बीसीसीआय आणि आयोजकांना दिले.[१५]. या सामन्यांपैकी, आयपीएलचे चेरमन राजीव शुक्ला व मुंबई, पुण्याच्या फ्रँचाइझींशी झालेल्या बैठकीनंतर २९ मे २०१६ रोजी पुण्यातील एलिमिनेटर आणि पात्रता २ हे सामने कोलकात्याला हलवण्यात आले तर मुंबईतील वानखेडे मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी बंगळूरची निवड करण्यात आली.[१६] परंतु २९ एप्रिल रोजी पुण्याचा सामना झाल्यानंतर लगेचच ३० तारखेला संघ आणि सोबतच्या पथकाला प्रवास करून पुन्हा १ तारखेला सामना खेळावा लागेल आणि प्रचंड ताण येईल, या बीसीसीआयच्या विनंतीमुळे कोर्टाने १ तारखेचा सामना पुण्यातच खेळण्याची अपवादा‍त्मक परवानगी दिली.[१७]

उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांनी मिळून २२ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. खेळपट्टीच्या मशागतीसाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याऐवजी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्यात येत असल्याचे दोन्ही असोसिएशनने आपल्या याचिकेत म्हणले होते. मुंबई इंडियन्सने त्यांच्या सामन्यांसाठी जयपूरचा पर्याय निवडला होता. परंतु राजस्थान सरकारने परवानगी दिल्यानंतर त्याविरोधात तेथील तरुणांच्या गटाने सवाई मानसिंग मैदानाबाहेर निदर्शने केली. राजस्थानातही पाण्याचा तुटवडा असताना राज्य सरकारने क्रिकेट लढतींना होकार देणे तेथील नागरिकांना पटले नाही.[१८] २६ एप्रिल रोजी सदर याचिकेवरील सुनावणी देताना महाराष्ट्रात पाणी टंचाई असताना आयपीएलचे सामने नको, भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे, त्यामुळे सामने महाराष्ट्राबाहेरच खेळवणे योग्य आहे असे सांगून याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.[१९]

२९ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे मुंबई आणि पुण्याचे सर्व साखळी सामने एसीए-व्हिडीसीए मैदान, विशाखापट्टणम् येथे खेळवण्यात येतील. पुण्यात होणारे प्ले-ऑफ सामने (एलिमिनेटर आणि पात्रता२) दिल्लीत फिरोजशाह कोटला मैदानावर आणि नागपूरमध्ये होणारे किग्स XI पंजाबचे साखळी सामने मोहाली येथे होतील.[२०]

उद्घाटन सोहळा

आयपीएल २०१६चा उद्घाटन सोहळा ८ एप्रिल २०१६ रोजी १९:३० वाजता मुंबईमधील सरदार वल्लभभाई पटेल मैदानावर पार पडला.

बॉलीवूड तारेतारकांच्या दिमाखदार नृत्य सादरीकरण, वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होचा चॅम्पियन डान्स अशा नयनरम्य सोहळ्याद्वारे इंडियन प्रीमिअर लीगच्या नवव्या हंगामाचे उद्घाटन झाले. या सोहळ्यात रणवीर सिंग, कतरिना कैफ, यो यो हनी सिंग, जॅकलीन फर्नांडिस यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. बॉलीवूडमधील पार्श्वगायक अंकित तिवारीसह ड्वेन ब्राव्होने चॅम्पियन गाण्यावर उपस्थितांना ठेका धरायला लावला.[२१]

स्थळे

साखळी फेरीतील सामन्यांसाठी १० स्थळे निवडण्यात आली.[२२] बंगलोरकडे पात्रता १ सामन्याचे, पुण्याकडे एलिमिनेटर आणि पात्रता २ आणि मुंबईकडे अंतिम सामन्याचे यजमानपद देण्यात आले होते.[२३] परंतु महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, १३ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रात मे महिन्यात होणारे सर्व सामने राज्याबाहेर खेळवण्याचे आदेश दिले.[१५] त्यानुसार १६ एप्रिल २०१६ रोजी अंतिम सामन्यासाठी बंगळूरची निवड करण्यात आली[१६] आणि पुण्यात होणारे एलिमिनेटर आणि पात्रता २ हे सामने कोलकातामध्ये हलवण्यात आले.

२९ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे एलिमिनेटर आणि पात्रता २ हे सामने पुन्हा दिल्लीमध्ये हलवण्यात आले. आणि महाराष्ट्रातील १ मे नंतरचे मुंबई आणि पुण्याचे सामने विशाखापट्टणम् येथे तर पंजाबचे सामने मोहाली तेथे खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला.

२ मे २०१६ रोजी जाहीर करण्यात आले की, गुजरात लायन्स त्यांचे १९ आणि २१ मे रोजी होणारे सामने कानपूर येथे खेळेल.[२४]

गट फेरी आणि प्लेऑफ मैदाने
बंगलोरदिल्ली
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरदिल्ली डेरडेव्हिल्स
एम. चिन्नास्वामी मैदानफिरोजशाह कोटला मैदान
प्रेक्षकक्षमता: ३५,०००प्रेक्षकक्षमता: ४१,०००
सामने: ९ (पात्रता १ आणि अंतिम)सामने: ७ (पात्रता २ आणि बाद)
गट फेरी मैदाने
हैदराबादकानपूरकोलकाता
सनरायझर्स हैदराबादगुजरात लायन्सकोलकाता नाईट रायडर्स
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान ग्रीन पार्क मैदान इडन गार्डन्स
प्रेक्षकक्षमता: ३३,००० प्रेक्षकक्षमता: ३३,००० प्रेक्षकक्षमता: ६८,०००
सामने: ७ सामने: २ सामने: ७
मोहालीमुंबईपुणे
किंग्स XI पंजाब मुंबई इंडियन्सरायझिंग पुणे सुपरजायंट्स
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान वानखेडे मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान
प्रेक्षकक्षमता: २६,००० प्रेक्षकक्षमता: ३३,००० प्रेक्षकक्षमता: ४२,०००
सामने: ७ सामने: ४ सामने: ४
रायपूरराजकोटविशाखापट्टणम
दिल्ली डेरडेव्हिल्स गुजरात लायन्समुंबई इंडियन्स आणि [[]]
शहीद वीर नारायण सिंग मैदान सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान
प्रेक्षकक्षमता: ५०,००० प्रेक्षकक्षमता: २८,००० प्रेक्षकक्षमता: ३८,०००
सामने: २ सामने: ५ सामने: ६

गुणतक्ता

संघ[२५] सा वि गुण नि.धा.
गुजरात लायन्स१४१८-०.३७४
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर१४१६+०.९३२
सनरायझर्स हैदराबाद१४१६+०.२४५
कोलकाता नाईट रायडर्स१४१६+०.१०६
मुंबई इंडियन्स१४१४-०.१४६
दिल्ली डेरडेव्हिल्स१४१४-०.१५५
रायझिंग पुणे सुपरजायंट्स१४१०+०.०१५
किंग्स XI पंजाब१४१०-०.६४६
  • ४ संघ प्ले ऑफसाठी पात्र
  •      पात्रता १ सामन्यासाठी पात्र
  •      बाद सामन्यासाठी पात्र
  •      स्पर्धेतून बाद

स्पर्धा प्रगती

संघ साखळी सामनेप्ले ऑफ
१० ११ १२ १३ १४ प्लेपा२अं
दिल्ली डेरडेव्हिल्स १०१०१०१२१२१२१४१४
गुजरात लायन्स१०१२१२१२१२१४१४१६१८
किंग्स XI पंजाब
कोलकाता नाईट रायडर्स १०१२१२१४१४१४१६
मुंबई इंडियन्स१०१०१२१२१४१४
रायझिंग पुणे सुपरजायंट्स १०
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर१०१२१४१६वि
सनरायझर्स हैदराबाद१०१२१४१४१६१६१६विविवि
माहिती: सामन्याच्या अंती एकूण गुण
विजय पराभव सामना अणिर्नित
माहिती: सामन्याची माहिती पाहण्यासाठी गुणांवर क्लिक करा.
साखळी सामन्यात संघ बाद.

निकाल

साखळी सामने

पाहुणा संघ → दिल्ली गुजरातपंजाब कोलकाता मुंबईपुणे बंगळूरहैदराबाद
यजमान संघ ↓
दिल्ली डेरडेव्हिल्स गुजरात
१ धाव
दिल्ली
८ गडी
दिल्ली
२७ धावा
दिल्ली
१० धावा
पुणे
७ गडी
बंगळूर
६ गडी
दिल्ली
६ गडी
गुजरात लायन्सदिल्ली
८ गडी
पंजाब
२३ धावा
गुजरात
६ गडी
गुजरात
६ गडी
गुजरात
७ गडी
गुजरात
६ गडी
हैदराबाद
१० गडी
किंग्स XI पंजाब पंजाब
९ धावा
गुजरात
५ गडी
कोलकाता
६ गडी
मुंबई
२५ धावा
पंजाब
६ गडी
बंगळूर
१ धाव
हैदराबाद
७ गडी
कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता
९ गडी
गुजरात
५ गडी
कोलकाता
७ धावा
मुंबई
६ गडी
कोलकाता
८ गडी (ड/लु)
बंगळूर
९ गडी
कोलकाता
२२ धावा
मुंबई इंडियन्समुंबई
८० धावा
गुजरात
३ गडी
पंजाब
७ गडी
मुंबई
६ गडी
पुणे
९ गडी
मुंबई
६ गडी
हैदराबाद
८५ धावा
रायझिंग पुणे सुपरजायंट्स पुणे
१९ धावा (ड/लु)
गुजरात
३ गडी
पुणे
४ गडी
कोलकाता
२ गडी
मुंबई
८ गडी
बंगळूर
१३ धावा
हैदराबाद
४ धावा
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरदिल्ली
७ गडी
बंगळूर
१४४ धावा
बंगळूर
८२ धावा
कोलकाता
५ गडी
मुंबई
६ गडी
बंगळूर
७ गडी
बंगळूर
४५ धावा
सनरायझर्स हैदराबाददिल्ली
७ गडी
हैदराबाद
५ गडी
हैदराबाद
५ गडी
कोलकाता
८ गडी
हैदराबाद
७ गडी
पूणे
३४ धावा (ड/लु)
हैदराबाद
१५ धावा
यजमान संघ विजयी पाहुणा संघ विजयी सामना रद्द
टिप: सामन्याची माहिती पाहण्यासाठी निकालावर क्लिक करा.

प्ले ऑफ सामने

प्राथमिक सामने अंतिम सामना
  २९ मे — एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
२४ मे — एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
गुजरात लायन्स१५८ (२० षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर१५९/६ (१८.२ षटके)रॉयल चॅलेंजर्स बंगलोर२००/७ (२० षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विजयी - ४ गडी  सनरायझर्स हैदराबाद२०८/७ (२० षटके)
सनरायझर्स हैदराबाद विजयी - ८ धावा 
२७ मे — इडन गार्डन्स, कोलकाता
गुजरात लायन्स१६२/७ (२० षटके)
सनरायझर्स हैदराबाद१६३/६ (१९.२ षटके)
सनरायझर्स हैदराबाद विजयी - ४ गडी 
२५ मे — इडन गार्डन्स, कोलकाता
सनरायझर्स हैदराबाद१६२/८ (२० षटके)
कोलकाता नाईट रायडर्स १४०/८ (२० षटके)
सनरायझर्स हैदराबाद विजयी - २२ धावा 

सामने

सर्व वेळा ह्या भारतीय प्रमाणवेळ आहेत (यूटीसी+०५:३०)

साखळी सामने

९ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) मुंबई इंडियन्स
१२१/८ (२० षटके)
वि
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
१२६/१ (१४.४ षटके)
हरभजन सिंग ४५ (३०)
मिचेल मार्श २/२१ (४ षटके)
अजिंक्य रहाणे ६६ (४२)
हरभजन सिंग १/२४ (३ षटके)
पुणे ९ गडी व ३२ चेंडू राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि सी. के. नंदन (भा)
सामनावीर: अजिंक्य रहाणे, पुणे
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी

१० एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स
९८ (१७.४ षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स (य)
९९/१ (१४.१ षटके)
क्विंटन डी कॉक १७ (१०)
ब्रॅड हॉग ३/१९ (४ षटके)
गौतम गंभीर ३८* (४१)
अमित मिश्रा १/११ (२ षटके)
कोलकाता ९ गडी व ३५ चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: एस्.रवी (श्री) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: आंद्रे रसेल, कोलकाता
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी

११ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) किंग्स XI पंजाब
१६१/६ (२० षटके)
वि
गुजरात लायन्स
१६२/५ (१७.४ षटके)
मुरली विजय ४२ (३४)
ड्वेन ब्राव्हो ४/२२ (४ षटके)
अ‍ॅरन फिंच ७४ (४७)
संदिप शर्मा १/२१ (३ षटके)
राजकोट ५ गडी व १४ चेंडू राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ
पंच: अनिल चौधरी (भा) आणि विनीत कुलकर्णी (भा)
सामनावीर: अ‍ॅरन फिंच, राजकोट
  • नाणेफेक : गुजरात लायन्स, गोलंदाजी

१२ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
२२७/४ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१८२/६ (२० षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स ८२ (४२)
मुस्तफिजूर रहमान २/२६ (४ षटके)
डेव्हिड वॉर्नर ५८ (२५)
शेन वॉटसन ५८ (२५)
बंगळूर ४५ धावांनी विजयी
एम चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: ए.बी. डी व्हिलियर्स, बंगळूर
  • नाणेफेक : सनराझर्स हैदराबाद, गोलंदाजी

१३ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) कोलकाता नाईट रायडर्स
१८७/५ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१८८/४ (१९.१ षटके)
गौतम गंभीर ६४ (५२)
मिचेल मॅक्लेनाघन २/२५ (४ षटके)
रोहित शर्मा ८४* (५४)
पियुष चावला १/२९ (३.१ षटके)
मुंबई ६ गडी व ५ चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: नितीन मेनन (भा) आणि एस्. रवी (भा)
सामनावीर: रोहित शर्मा, मुंबई
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी

१४ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
१६३/५ (२० षटके)
वि
गुजरात लायन्स (य)
१६४/३ (१८ षटके)
फाफ डू प्लेसी ६९ (४३)
रविंद्र जडेजा २/१८ (४ षटके)
ॲरन फिंच ५० (३६)
मुरूगन अश्विन २/३१ (४ षटके)
गुजरात ७ गडी व १२ चेंडू राखून विजयी
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि सी. के. नंदन (भा)
सामनावीर: ॲरन फिंच, गुजरात
  • नाणेफेक : रायझिंग पुणे जायंट्स, फलंदाजी

१५ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब
१११/९ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स (य)
११३/२ (१३.३ षटके)
मनन वोहरा ३२ (२४)
अमित मिश्रा ४/११ (३ षटके)
दिल्ली ८ गडी व ३९ चेंडू राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: एस्. रवी (भा) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: अमित मिश्रा, दिल्ली
  • नाणेफेक : दिल्ली डेरडेव्हिल्स, गोलंदाजी

१६ एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
(य) सनरायझर्स हैदराबाद
१४२/७ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१४६/२ (१८.२ षटके)
आयॉन मॉर्गन ५१ (४३)
उमेश यादव ३/२८ (४ षटके)
गौतम गंभीर ९०* (६०)
आशिष रेड्डी १/१४ (२ षटके)
कोलकाता ८ गडी व १० चेंडू राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: अनिल चौधरी (भा) आणि सी. के. नंदन (भा)
सामनावीर: गौतम गंभीर, कोलकाता
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी

१६ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) मुंबई इंडियन्स
१४३/८ (२० षटके)
वि
गुजरात लायन्स
१४७/७ (२० षटके)
पार्थिव पटेल ३४ (२९)
प्रवीण तांबे २/१२ (२ षटके)
ॲरन फिंच ६७* (५४)
मिचेल मॅक्लेनाघन ४/२१ (४ षटके)
गुजरात ३ गडी व ० चेंडू राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: ॲरन फिंच, गुजरात
  • नाणेफेक : गुजरात लायन्स, गोलंदाजी

१७ एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
१५२/७ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब (य)
१५३/४ (१८.४ षटके)
फाफ डू प्लेसी ६७ (५३)
मोहित शर्मा ३/२३ (४ षटके)
मुरली विजय ५३ (४९)
मुरूगन अश्विन ३/३६ (४ षटके)
पंजाब ६ गडी व ८ चेंडू राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ
पंच: एस्. रवी (भा) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: मनन वोहरा, पंजाब
  • नाणेफेक : रायझिंग पुणे सुपरजायंट्स, फलंदाजी

१७ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१९१/५ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१९२/३ (१९.१ षटके)
विराट कोहली ७९ (४८)
मोहम्मद शमी २/३४ (४ षटके)
क्विंटन डी कॉक १०८ (५१)
शेन वॉटसन २/२६ (४ षटके)
दिल्ली ७ गडी व ५ चेंडू राखून विजयी
एम चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि नंद किशोर (भा)
सामनावीर: क्विंटन डी कॉक, दिल्ली
  • नाणेफेक : दिल्ली डेरडेव्हिल्स, गोलंदाजी

१८ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१४२/६ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद (य)
१४५/३ (१७.३ षटके)
अंबाती रायडू ५४ (४९)
बरिंदर स्रान ३/२८ (४ षटके)
डेव्हिड वॉर्नर ९०* (५९)
टीम साऊथी ३/२४ (४ षटके)
हैदराबाद ७ गडी व १५ चेंडू राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर, हैदराबाद
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, गोलंदाजी

१९ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) किंग्स XI पंजाब
१३८/८ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१४१/४ (१७.१ षटके)
शॉन मार्श ५६* (४१)
सुनील नारायण २/२२ (४ षटके)
रॉबिन उथप्पा ५३ (२८)
परदीप साहू २/१८ (४ षटके)
कोलकाता ६ गडी व १७ चेंडू राखून विजयी.
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ
पंच: एस्. रवी (भा) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: रॉबिन उथप्पा, कोलकाता
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी

२० एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स (य)
१७१/४ (१८ षटके)
मुंबई ६ गडी व १२ चेंडू राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि सी. के. नंदन (भा)
सामनावीर: रोहित शर्मा, मुंबई
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी

२१ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) गुजरात लायन्स
१३५/८ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१३६/० (१४.५ षटके)
डेव्हिड वॉर्नर ७४ (४८)
रविंद्र जडेजा ०/२० (२.५ षटके)
हैदराबाद १० गडी व ३१ चेंडू राखून विजयी
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि क्रिष्णाम्माचारी भारतन (भा)
सामनावीर: भुवनेश्वर कुमार, हैदराबाद
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, गोलंदाजी.

२२ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
वि
रायझिंग पुणे सुपरजायंट्स (य)
१७२/८ (२० षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स ८३ (४६)
थिसारा परेरा ३/४३ (४ षटके)
बंगळूर १३ धावांनी विजयी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, पुणे
पंच: ख्रिस गाफने (न्यू) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: ए.बी. डी व्हिलियर्स, बंगळूर
  • नाणेफेक : रायझिंग पुणे सुपरजायंट्स, गोलंदाजी

२३ एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
(य) दिल्ली डेरडेव्हिल्स
१६४/४ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१५४/७ (२० षटके)
संजू सॅमसन ६० (४८)
मिचेल मॅक्लेनाघन २/३१ (४ षटके)
रोहित शर्मा ६५ (४८)
अमित मिश्रा २/२४ (४ षटके)
दिल्ली १० धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: एस्.रवी (भा) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: संजू सॅमसन, दिल्ली
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी

२३ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब
१४३/६ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद (य)
१४६/५ (१७.५ षटके)
शॉन मार्श ४० (३४)
मुस्तफिजूर रहमान २/९ (४ षटके)
हैदराबाद ५ गडी व १३ चेंडू राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: अनिल चौधरी (भारत) आणि सी. के. नंदन (भा)
सामनावीर: मुस्तफिजूर रहमान, हैदराबाद
  • नाणेफेक : सनराझर्स हैदराबाद, गोलंदाजी

२४ एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
वि
गुजरात लायन्स (य)
१८२/४ (१९.३ षटके)
विराट कोहली १००* (६३)
प्रविण तांबे ३/२४ (४ षटके)
दिनेश कार्तिक ५०* (३९)
तबरैझ शाम्सी १/२१ (४ षटके)
गुजरात ६ गडी व ३ चेंडू राखून विजयी
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट
पंच: क्रिष्णाम्माचारी भारतन (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: विराट कोहली, बंगळूर
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, फलंदाजी

२४ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) रायझिंग पुणे सुपरजायंट्स
१६०/५ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१६२/८ (१९.३ षटके)
अजिंक्य रहाणे ६७ (५२)
शकिब अल हसन १/१४ (३ षटके)
सूर्यकुमार यादव ६० (४९)
रजत भाटीया २/१९ (४ षटके)
कोलकाता ६ गडी व ३ चेंडू राखून विजयी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, पुणे
पंच: ख्रिस गाफने (न्यू) आणि नंद किशोर (भा)
सामनावीर: सूर्यकुमार यादव, कोलकाता
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी

२५ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१८९/६ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब (य)
१६४/७ (२० षटके)
पार्थिव पटेल ८१ (५८)
मोहित शर्मा ३/३८ (४ षटके)
मुंबई २५ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ
पंच: नितीन मेनन (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: पार्थिव पटेल, मुंबई
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी

२६ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) सनरायझर्स हैदराबाद
११८/८ (२० षटके)
वि
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
९४/३ (११ षटके)
शिखर धवन ५६* (५३)
अशोक दिंडा ३/२३ (४ षटके)
स्टीव्ह स्मिथ ४६* (३६)
मोझेस हेन्रीक्स १/१६ (२ षटके)
पुणे ३४ धावांनी विजयी (डकवर्थ-लुईस पद्धत)
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: अनिल दांडेकर (भा) आणि सी. के. नंदन (भा)
सामनावीर: अशोक दिंडा, पुणे
  • नाणेफेक : रायझिंग पुणे सुपरजायंट्स, गोलंदाजी
  • पावसामुळे खेळ उशिरा सुरू करण्यात आला, परंतू षटके कमी केली गेली नाहीत.
  • पुण्याच्या डावाच्या ११ षटकांनंतर पुन्हा आलेल्या पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार पुण्याला विजयासाठी ११ षटकांमध्ये ३ बाद ६० धावांची गरज होती.

२७ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
गुजरात लायन्स
१७२/६ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स (य)
१७१/५ (२० षटके)
ब्रॅन्डन मॅककुलम ६० (३६)
ख्रिस मॉरिस २/३५ (४ षटके)
ख्रिस मॉरिस ८२ (३२)
धवल कुलकर्णी ३/१९ (४ षटके)
गुजरात १ धावेने विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: अनिल चौधरी (भा) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: ख्रिस मॉरिस, दिल्ली
  • नाणेफेक : दिल्ली डेरडेव्हिल्स, गोलंदाजी
  • रिषभ पंतचे दिल्ली डेरडेव्हिल्सकडून ट्वेंटी२० पदार्पण.

२८ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स
१७४/५ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स (य)
१७८/४ (१८ षटके)
गौतम गंभीर ५९ (४५)
टीम साऊथी २/३८ (४ षटके)
रोहित शर्मा ६८ (४९)
सुनील नारायण ४/२२ (४ षटके)
मुंबई ६ गडी व १२ चेंडू राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: रोहित शर्मा, मुंबई
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाी

२९ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
गुजरात लायन्स
१९५/३ (२० षटके)
वि
रायझिंग पुणे सुपरजायंट्स (य)
१९६/७ (२० षटके)
स्टीव्हन स्मिथ १०१ (५४)
ड्वेन ब्राव्हो १/४० (४ षटके)
ड्वेन स्मिथ ६३ (३७)
अशोक दिंडा २/४० (४ षटके)
गुजरात ३ गडी व ० चेंडू राखून विजयी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, पुणे
पंच: ख्रिस गाफने (न्यू) व ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: ड्वेन स्मिथ, गुजरात
  • नाणेफेक : गुजरात लायन्स, गोलंदाजी

३० एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
(य) दिल्ली डेरडेव्हिल्स
१८६/८ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१५९ (१८.३ षटके)
करुण नायर ६८ (५०)
आंद्रे रसेल ३/२६ (४ षटके)
रॉबिन उथप्पा ७२ (५२)
झहीर खान ३/२१ (३.३ षटके)
दिल्ली २७ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: के.एन. अनंतापद्मनाभन (भा) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: कार्लोस ब्राथवेट, दिल्ली
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी

३० एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) सनरायझर्स हैदराबाद
१९४/५ (२० षटके)
वि
लोकेश राहुल ५१ (२८)
आशिष नेहरा १/३२ (४ षटके)
हैदराबाद १५ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: अनिल चौधरी (भा) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर, हैदराबाद
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी

१ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब
१५४ (१९.५ षटके)
वि
गुजरात लायन्स (य)
१३१/९ (२० षटके)
मुरली विजय ५५ (४१)
शिवील कौशिक ३/२० (४ षटके)
जेम्स फॉकनर ३२ (२७)
अक्षर पटेल ४/२१ (४ षटके)
पंजाब २३ धावांनी विजयी
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: अक्षर पटेल, पंजाब
  • नाणेफेक : गुजरात लायन्स, गोलंदाजी

१ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) रायझिंग पुणे सुपरजायंट्स
१५९/५ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१६१/२ (१८.३ षटके)
रोहित शर्मा ८५* (६०)
रविचंद्रन अश्विन १/२१ (३ षटके)
मुंबई ८ गडी व ९ चेंडू राखून विजयी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, पुणे
पंच: अनिल दांडेकर (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: रोहित शर्मा, मुंबई
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी

२ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१८५/७ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१८९/५ (१९.१ षटके)
लोकेश राहुल ५२ (३२)
मॉर्ने मॉर्केल २/२८ (४ षटके)
युसूफ पठाण ६० (२९)
युझवेंद्र चहल २/२७ (४ षटके)
कोलकाता ५ गडी व ५ चेंडू राखून विजयी
एम चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: एस्.रवी (भा) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: आंद्रे रसेल, कोलकाता
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी

३ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) गुजरात लायन्स
१४९/७ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१५०/२ (१७.२ षटके)
दिनेश कार्तिक ५३ (४३)
शाहबाझ नदीम २/२३ (४ षटके)
रिषभ पंत ६९ (४०)
रविंद्र जडेजा १/२१ (२.२ षटके)
दिल्ली ८ गडी व १६ चेंडू राखून विजयी
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट
पंच: ख्रिस गाफने (न्यू) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: रिषभ पंत, दिल्ली
  • नाणेफेक : दिल्ली डेरडेव्हिल्स, गोलंदाजी

४ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) कोलकाता नाईट रायडर्स
१६४/३ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१५७/९ (२० षटके)
रॉबिन उथप्पा ७० (४९)
अक्षर पटेल ०/२४ (४ षटके)
कोलकाता ७ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अनिल चौधरी (भा) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: आंद्रे रसेल, कोलकाता
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी

५ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) दिल्ली डेरडेव्हिल्स
१६२/७ (२० षटके)
वि
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
१६६/३ (१९.१ षटके)
जेपी ड्यूमिनी ३४ (३२)
रजत भाटीया २/२२ (४ षटके)
अजिंक्य रहाणे ६३* (४८)
इम्रान ताहिर २/२६ (४ षटके)
पुणे ७ गडी व ५ चेंडू राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: अजिंक्य रहाणे, पुणे
  • नाणेफेक : रायझिंग पुणे सुपरजायंट्स, गोलंदाजी

६ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
गुजरात लायन्स
१२६/६ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद (य)
१२९/५ (१९ षटके)
अ‍ॅरन फिंच ५१* (४२)
मुस्तफिजूर रहमान २/१७ (४ षटके)
शिखर धवन ४७* (४०)
ड्वेन ब्राव्हो २/१४ (३ षटके)
हैदराबाद ५ गडी व ६ चेंडू राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि एस्. रवी (भा)
सामनावीर: भुवनेश्वर कुमार, हैदराबाद
  • नाणेफेक : सनराझर्स हैदराबाद, गोलंदाजी

७ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
१९१/६ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (य)
१९५/३ (१९.३ षटके)
अजिंक्य रहाणे ७४ (४८)
शेन वॉटसन ३/२४ (४ षटके)
विराट कोहली १०८* (५८)
ॲडम झाम्पा २/३५ (४ षटके)
बंगळूर ७ गडी व ३ चेंडू राखून विजयी
एम चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: ख्रिस गाफने (न्यू) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: विराट कोहली, बंगळूर
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी

७ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) किंग्स XI पंजाब
१८१/५ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१७२/५ (२० षटके)
वृद्धिमान साहा ५२ (३३)
ख्रिस मॉरिस २/३० (४ षटके)
पंजाब ९ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि सी. के. नंदन (भा)
सामनावीर: मार्कस स्टोइनिस, पंजाब
  • नाणेफेक : दिल्ली डेरडेव्हिल्स, गोलंदाजी

८ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१७७/३ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स (य)
९२ (१६.३ षटके)
शिखर धवन ८२* (५७)
हरभजन सिंग २/२९ (४ षटके)
हरभजन सिंग २१* (२२)
आशिष नेहरा ३/१५ (३ षटके)
हैदराबाद ८५ धावांनी विजयी
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम्
पंच: चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा) आणि एस्. रवी (भा)
सामनावीर: आशिष नेहरा, हैदराबाद
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी

८ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) कोलकाता नाईट रायडर्स
१५८/४ (२० षटके)
वि
गुजरात लायन्स
१६४/५ (१८ षटके)
शकिब अल हसन ६६* (४९)
प्रवीण कुमार २/१९ (४ षटके)
दिनेश कार्तिक ५१ (२९)
ब्रॅड हॉग १/१९ (२ षटके)
गुजरात ५ गडी व १२ चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: प्रवीण कुमार, गुजरात
  • नाणेफेक : गुजरात लायन्स, गोलंदाजी

९ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
वि
किंग्स XI पंजाब (य)
१७४/४ (२० षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स ६४ (३५)
केसी करिअप्पा २/१६ (३ षटके)
मुरली विजय ८९ (५७)
शेन वॉटसन २/२२ (४ षटके)
बंगळूर १ धावेने विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: अनिल चौधरी (भा) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: शेन वॉटसन, बंगलोर
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी

१० मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१३७/८ (२० षटके)
वि
रायझिंग पुणे सुपरजायंट्स (य)
१३३/८ (२० षटके)
शिखर धवन ३३ (२७)
ॲडम झाम्पा ६/१९ (४ षटके)
जॉर्ज बेली ३४ (४०)
आशिष नेहरा ३/२९ (४ षटके)
हैदराबाद ४ धावांनी विजयी
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम्
पंच: ख्रिस गाफने (न्यू) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: ॲडम झाम्पा, पुणे
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी

११ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१५१/४ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१५३/४ (१८.४ षटके)
लोकेश राहुल ६८* (५३)
कृणाल पंड्या १/१५ (४ षटके)
अंबाती रायडू ४४ (४७)
वरूण अ‍ॅरन २/३७ (४ षटके)
मुंबई ६ गडी व ८ चेंडू राखून विजयी
एम चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा) आणि अनिल दांडेकर (भा)
सामनावीर: कृणाल पंड्या, मुंबई
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी

१२ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) सनरायझर्स हैदराबाद
१४६/८ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१५०/३ (१८.१ षटके)
डेव्हिड वॉर्नर ४६ (३०)
अमित मिश्रा २/१९ (३ षटके)
क्विंटन डी कॉक ४४ (३१)
मोझेस हेन्रीक्स २/१९ (३ षटके)
दिल्ली ७ गडी व ११ चेंडू राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: क्रिष्णाम्माचारी भारतन (भा) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: ख्रिस मॉरिस, दिल्ली
  • नाणेफेक : दिल्ली डेरडेव्हिल्स, गोलंदाजी

१३ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) मुंबई इंडियन्स
१२४/९ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१२७/३ (१७ षटके)
किरॉन पोलार्ड २७ (२०)
मार्कस स्टोइनिस ४/१५ (४ षटके)
वृद्धिमान साहा ५६ (४०)
मिचेल मॅक्लेनाघन २/२४ (३ षटके)
किंग्स XI पंजाब ७ गडी व १८ चेंडू राखून विजयी
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम्
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि सी. के. नंदन (भा)
सामनावीर: मार्कस स्टोइनिस, पंजाब
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी

१४ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
(य) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
२४८/३ (२० षटके)
वि
गुजरात लायन्स
१०४ (१८.४ षटके)
ए.बी. डी व्हिलीयर्स १२९* (५२)
प्रवीण कुमार २/४५ (४ षटके)
अ‍ॅरन फिंच ३७ (३८)
ख्रिस जॉर्डन ४/११ (३ षटके)
बंगलोर १४४ धावांनी विजयी
एम चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: अनिल दांडेकर (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: ए.बी. डी व्हिलीयर्स, बंगळूर
  • नाणेफेक : गुजरात लायन्स, गोलंदाजी

१४ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
१०३/६ (१७.४ षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स (य)
६६/२ (५ षटके)
जॉर्ज बेली ३३ (२७)
पियुष चावला २/२१ (४ षटके)
युसूफ पठाण ३७* (१८)
रविचंद्रन अश्विन २/३० (२ षटके)
कोलकाता ८ गडी व २४ चेंडू राखून विजयी (ड/लु पद्धथ)
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: नंद किशोर (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: युसूफ पठाण, कोलकाता
  • नाणेफेक : रायझिंग पुणे सुपरजायंट्स, फलंदाजी
  • पुण्याच्या डावा दरम्यान आलेल्या पावसामुळे कोलकाता समोर विजयासाठी ९ षटकांत ६६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
  • या सामन्याच्या निकालामुळे रायझिंग पुणे सुपरजायंट्स स्पर्धेतून बाद.[२६]

१५ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
(य) किंग्स XI पंजाब
१७९/४ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१८०/३ (१९.४ षटके)
हाशिम आमला ९६ (५६)
भुवनेश्वर कुमार २/३२ (४ षटके)
डेव्हिड वॉर्नर ५२ (४१)
अक्षर पटेल १/२६ (४ षटके)
हैदराबाद ७ गडी व २ चेंडू राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: के.एन. अनंतापद्मनाभन (भा) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: हाशिम आमला, पंजाब
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, फलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे किंग्स XI पंजाब स्पर्धेतून बाद.[२७]

१५ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) मुंबई इंडियन्स
२०६/४ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१२६ (१९.१ षटके)
कृणाल पंड्या ८६ (३७)
ख्रिस मॉरिस २/३४ (४ षटके)
मुंबई ८० धावांनी विजयी
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम्
पंच: नितीन मेनन (भा) आणि सी. के. नंदन (भा)
सामनावीर: कृणाल पंड्या, मुंबई
  • नाणेफेक : दिल्ली डेरडेव्हिल्स, गोलंदाजी

१६ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) कोलकाता नाईट रायडर्स
१८३/५ (२० षटके)
वि
गौतम गंभीर ५१ (३४)
श्रीनाथ अरविंद २/४१ (४ षटके)
विराट कोहली ७५* (५१)
सुनील नारायण १/३४ (४ षटके)
बंगलोर ९ गडी व ८ चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: ख्रिस गाफने (न्यू) आणि नंद किशोर (भा)
सामनावीर: विराट कोहली, बंगळूर
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी

१७ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स
१२१/६ (२० षटके)
वि
रायझिंग पुणे सुपरजायंट्स (य)
७६/१ (११ षटके)
करूण नायर ४१ (४३)
अशोक दिंडा ३/२० (४ षटके)
अजिंक्य रहाणे ४२ (३६)
ख्रिस मॉरिस १/१२ (२ षटके)
पुणे १९ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम्
पंच: नितीन मेनन (भा) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: अशोक दिंडा, पुणे
  • नाणेफेक : रायझिंग पुणे सुपरजायंट्स, गोलंदाजी
  • पुण्याच्या डावादरम्यान ८.२ षटकांनंतर आलेल्या पावसामुळे सामना सुमारे ५५ मिनीटे थांबवला गेला, परंतू षटके कमी करण्यात आली नाहीत.
  • पुण्याच्या डावादरम्यान ११व्या षटकांनंतर आलेल्या पावसामुळे पुढचा खेळ रद्द करण्यात आला आणि डकवर्थ-लुईस नियमानुसार पुण्यापुढे ११ षटकांत ५८ धावांचे नवे लक्ष्य होते.

१८ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
२११/३ (१५ षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१२०/९ (१४ षटके)
विराट कोहली ११३ (५०)
संदिप शर्मा १/२९ (३ षटके)
वृद्धिमान साहा २४ (१०)
युझवेंद्र चहल ४/२५ (४ षटके)
बंगळूर ८२ धावांनी विजयी (ड/ल पद्धत)
एम चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: के.एन. अनंतापद्मनाभन (भा) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: विराट कोहली, बंगळूर
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी
  • पावसामुळे सामना सुमारे २ तास उशीरा सुरू झाला आणि प्रत्येकी १५ षटकांचा खेळवण्यात आला.
  • पंजाबच्या डावादरम्यान १४ व्या षटकांनंतर पुन्हा पाऊस आल्याने सामना तेथेच थांबवण्यात आला, त्यावेळी डकवर्थ-लुईस नियमानुसार पंजाबला १४ षटकांत २०३ धावा करणे गरजेचे होते.

१९ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स
१२४/८ (२० षटके)
वि
गुजरात लायन्स (य)
१२५/४ (१३.३ षटके)
युसूफ पठाण ३६ (३६)
ड्वेन स्मिथ ४/८ (४ षटके)
सुरेश रैना ५३* (३६)
सुनील नारायण १/३० (४ षटके)
गुजरात ६ गडी व ३९ चेंडू राखून विजयी
ग्रीन पार्क मैदान, कानपूर
पंच: अनिल चौधरी (भा) व सी. के. नंदन (भा)
सामनावीर: ड्वेन स्मिथ, गुजरात
  • नाणेफेक : गुजरात लायन्स, गोलंदाजी

२० मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१५८/७ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स (य)
१६१/४ (२० षटके)
डेव्हिड वॉर्नर ७३ (५६)
कार्लोस ब्रेथवेट २/२७ (४ षटके)
करूण नायर ८३* (५९)
बरिंदर स्रान २/३४ (४ षटके)
दिल्ली ६ गडी आणि ० चेंडू राखून विजयी
रायपूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, रायपूर
पंच: नंद किशोर (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: करूण नायर, दिल्ली
  • नाणेफेक : दिल्ली डेरडेव्हिल्स, गोलंदाजी

२१ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब
१७२/७ (२० षटके)
वि
रायझिंग पुणे सुपरजायंट्स (य)
१७३/६ (२० षटके)
मुरली विजय ५९ (४१)
महेंद्रसिंग धोणी ६४* (३२)
रविचंद्रन अश्विन ४/३४ (४ षटके)
गुरकिरत सिंग २/१५ (२ षटके)
पुणे ४ गडी आणि ० चेंडू राखून विजयी
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम्
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी, पुणे
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, फलंदाजी

२१ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१७२/८ (२० षटके)
वि
गुजरात लायन्स (य)
१७३/४ (१७.५ षटके)
नितीश राणा ७० (३६)
ड्वेन ब्राव्हो २/२२ (४ षटके)
सुरेश रैना ५८ (३६)
विनय कुमार २/१७ (३ षटके)
गुजरात ६ गडी १३ चेंडू राखून विजयी
ग्रीन पार्क मैदान, कानपूर
पंच: अनिल चौधरी (भा) आणि सी. के. नंदन (भा)
सामनावीर: सुरेश रैना, गुजरात
  • नाणेफेक : गुजरात लायन्स, गोलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे गुजरात प्ले ऑफ फेरीसाठी पात्र.[२८]

२२ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
(य) कोलकाता नाईट रायडर्स
१७१/६ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१४९/८ (२० षटके)
युसूफ पठाण ५२* (३४)
दीपक हुडा २/१६ (२ षटके)
शिखर धवन ५१ (३०)
सुनील नारायण ३/२६ (४ षटके)
कोलकाता २२ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: के.एन. अनंतापद्मनाभन (भा) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: युसूफ पठाण, कोलकाता
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, गोलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे कोलकाता आणि हैदराबाद प्ले ऑफ फेरीसाठी पात्र[२९] आणि मुंबई स्पर्धेतून बाद.

२२ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) दिल्ली डेरडेव्हिल्स
१३८/८ (२० षटके)
वि
क्विंटन डी कॉक ६० (५२)
युझवेंद्र चहल ३/३२ (४ षटके)
विराट कोहली ५४* (४५)
कार्लोस ब्रेथवेट १/१८ (३.१ षटके)
बंगलोर ६ गडी व ११ चेंडू राखून विजयी
रायपूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, रायपूर
पंच: नंद किशोर (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: विराट कोहली, बंगलोर
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे बंगलोर प्ले ऑफ फेरीसाठी पात्र[३०] आणि दिल्ली स्पर्धेतून बाद.


प्ले ऑफ सामने

प्राथमिक सामने

पात्रता १
२४ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
गुजरात लायन्स
१५८ (२० षटके)
वि
ड्वेन स्मिथ ७३ (४१)
शेन वॉटसन ४/२९ (४ षटके)
बंगलोर ४ गडी व १० चेंडू राखून विजयी
एम चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: अनिल चौधरी (भा) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: ए.बी. डी व्हिलियर्स, बंगलोर
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी

बाद
२५ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१६२/८ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१४०/८ (२० षटके)
युवराजसिंग ४४ (३०)
कुलदीप यादव ३/३५ (४ षटके)
हैदराबाद २२ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: मॅट हेन्रीक्स, हैदराबाद
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी

पात्रता २
२७ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
गुजरात लायन्स
१६२/७ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१६३/३ (१९.२ षटके)
ॲरन फिंच ५० (३२)
बेन कटिंग २/२० (३ षटके)
डेव्हिड वॉर्नर ९३* (५८)
शिविल कौशिक २/२२ (४ षटके)
हैदराबाद ४ गडी व ४ चेंडू राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि सी. के. नंदन (भा)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर, हैदराबाद
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, गोलंदाजी

अंतिम सामना

२९ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
२०८/७ (२० षटके)
वि
डेव्हिड वॉर्नर ६९ (३८)
ख्रिस जॉर्डन ३/४५ (४ षटके)
ख्रिस गेल ७६ (३८)
बेन कटिंग २/३५ (४ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ८ धावांनी विजयी
एम चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: बेन कटिंग, हैदराबाद
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी
  • सनरायझर्स हैदराबादचे पहिले आयपीएल विजेतेपद.


आकडेवारी

सर्वाधिक धावा

फलंदाजसंघसामनेडावधावासरासरी स्ट्रा रे सर्वोच्च१००५०चौकारषट्कार
भारत विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बंगलोर१६१६९७३८१.०८१५२.०३११३८३३८
ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नरसनरायझर्स हैदराबाद१७१७८४८६०.५७१५१.४२९३*८८३१
दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्सरॉयल चॅलेंजर्स बंगलोर१६१६६८७५२.८४१६८.७९१२९*५७३७
भारत गौतम गंभीरकोलकाता नाईट रायडर्स१५१५५०१३८.५३१२१.८९९०*५४
भारत शिखर धवनसनरायझर्स हैदराबाद१७१७५०१३८.५३११६.७८८२*५१
  •      स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप पुरस्कार.
  • संदर्भ: क्रिकइन्फो[३१]

सर्वाधिक बळी

गोलंदाजसंघसामनेडावबळीसरासरीइकॉनॉमीसर्वोत्कृष्ट स्ट्रारे ४ब ५ब
भारत भुवनेश्वर कुमारसनरायझर्स हैदराबाद१७१७२३२१.३०७.४२&0000000000000001050000४/२९१७.२०
भारत युझवेंद्र चहल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर१३१३२११९.०९८.१५&0000000000000001050000४/२५१४.००
ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन रॉयल चॅलेंजर्स बंगलोर१६१६२०२४.२५८.५८&0000000000000001050000४/२९१६.९०
भारत धवल कुलकर्णीगुजरात लायन्स१४१४१८२०.२२७.४२&0000000000000001050000४/१४१६.३०
बांगलादेश मुस्तफिजूर रहमान सनरायझर्स हैदराबाद१६१६१७२४.७६६.९०&0000000000000001050000३/१६२१.५०
  •      स्पर्धेमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप पुरस्कार.
  • संदर्भ: क्रिकइनफो[३२]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "चेन्नई व राजस्थानवर आयपीएल स्पर्धांमध्ये खेळण्यास दोन वर्षांची बंदी". 2016-04-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-12-07 रोजी पाहिले.
  2. ^ "पुण्याचा धोणी, राजकोटचा रैना". 2016-03-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-12-16 रोजी पाहिले.
  3. ^ "इंडियन प्रीमियर लीग : विवो आयपीएल २०१६". 2016-04-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-04-11 रोजी पाहिले.
  4. ^ आयपीएल २०१६ उद्घाटन समारंभ: वेस्ट इंडीजच्या खेळाडूंचे सादरीकरण – संजीव शुक्ला
  5. ^ "चेन्नई आणि राजस्थानचे मालक दोन वर्षांसाठी निलंबित" (इंग्रजी भाषेत).
  6. ^ "व्हिवो मोबाईल आयपीएलचे नवे प्रायोजक" (इंग्रजी भाषेत).
  7. ^ a b "डिसेंबर ८ पर्यंतर दोन नवीन आयपीएल संघ घोषित होणार" (इंग्रजी भाषेत).
  8. ^ "भारत-पाकिस्तान मालिकेसाठी शशांक मनोहर सकारात्मक" (इंग्रजी भाषेत).
  9. ^ a b "आयपीएलची जादू कायम: नवीन संघांसाठी मोठ्या कंपन्या रिंगणात" (इंग्रजी भाषेत).
  10. ^ C, Aprameya. "आयपीएल मधील पुणे आणि राजकोट या २ नवीन संघांची घोषणा" (इंग्रजी भाषेत).
  11. ^ a b "IPL सामने अन्यत्र का हलवू नयेत?". 2016-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-04-11 रोजी पाहिले.
  12. ^ "IPL: मुंबई Vs. पुणे वानखेडेवरच; पण..." 2016-04-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-04-11 रोजी पाहिले.
  13. ^ "…तर महाराष्ट्राचे १०० कोटींचे नुकसान". 2016-04-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-04-11 रोजी पाहिले.
  14. ^ "आयपीएल २०१६: वानखेडे मैदानासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनद्वारे खासगी कंपन्यांकडून पाणी" (इंग्रजी भाषेत).
  15. ^ a b "IPLचे ३० एप्रिलनंतरचे सामने राज्याबाहेर खेळवा". 2016-04-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-04-18 रोजी पाहिले.
  16. ^ a b "आयपीएल फायनल बेंगळुरूत". 2016-04-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-04-18 रोजी पाहिले.
  17. ^ "आयपीएल १ मेचा सामना पुण्यातच". 2016-04-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-04-21 रोजी पाहिले.
  18. ^ "एमसीए सर्वोच्च न्यायालयात".[permanent dead link]
  19. ^ "आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेरच होणार!". 2016-04-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-04-28 रोजी पाहिले.
  20. ^ "मुंबई, पुण्याचे बस्तान विशाखापट्टणममध्ये".[permanent dead link]
  21. ^ "बॉलीवूड सादरीकरणासह आयपीएलच्या नवव्या हंगामाचे उद्घाटन".
  22. ^ "२०१६ आयपीएल स्थळे" (इंग्रजी भाषेत). क्रिकबझ्झ.
  23. ^ "२०१६ आयपीएल प्ले ऑफ फेरी वेळापत्रक" (इंग्रजी भाषेत). क्रिकबझ्झ.
  24. ^ "गुजरात लायन्सच्या सामन्यासाठी कानपूरच्या मैदानावर शिक्कामोर्तब" (इंग्रजी भाषेत).
  25. ^ www.espncricinfo.com वरती गुणतक्ता पहा
  26. ^ पुणे आयपीलमधून बाद (इंग्रजी मजकूर)
  27. ^ सनरायझर्स प्लेऑफ फेरीत दाखल (इंग्रजी मजकूर)
  28. ^ "...तर मुंबई 'प्ले ऑफ' मध्ये". 2016-05-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-05-23 रोजी पाहिले.
  29. ^ "कोलकाता प्लेऑफमध्ये". 2016-05-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-05-23 रोजी पाहिले.
  30. ^ "कोहलीच्या अर्धशतकामुळे बंगलोर दुसर्‍या स्थानावर" (इंग्रजी भाषेत).
  31. ^ "इंडियन प्रीमियर लीग, २०१६ / नोंदी / सर्वाधिक धावा". १३ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
  32. ^ "इंडियन प्रीमियर लीग, २०१६ / नोंदी / सर्वाधिक बळी". १३ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.