२०१५ नेपाळ भूकंप
२५ एप्रिल २०१५ रोजी नेपाळमध्ये मोठा भूकंप झाला. नेपाळची राजधानी काठमांडूपासून वायव्येला असलेल्या गोरखा भागात झालेल्या भूकंपात ८,९६४ व्यक्ती मृत्यू पावल्या आणि २१,९५२ लोक जखमी झाले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ इतकी होती आणि केंद्रबिंदू जमिनीपासून ८.२ किमी खोल होता.