२०१२ अटलांटिक हरिकेन मोसम
२०१२ अटलांटिक हरिकेन मोसम हा अटलांटिक महासागरात सुरू होणाऱ्या चक्रीवादळांचा मोसम होता. हा मोसम अधिकृतरीत्या १ जून ते ३० नोव्हेंबर दरम्यान होता. यात एकूण १९ चक्रीवादळे झाली त्यातील १० वादळांचे हरिकेनमध्ये रूपांतर झाले व दोन हरिकेन मोठी हरिकेन गणली गेली. २०१० आणि २०११ या दोन अतिव्यस्त मोसमांनंतरचा हा तिसरा लागोपाठचा अतिव्यस्त मोसम होता.
या मोसमातील हरिकेन सँडीने कॅरिबियन बेटे, अमेरिका व कॅनडामध्ये मिळून ७० अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त नुकसान केले.
मागील: २०११ अटलांटिक हरिकेन मोसम | अटलांटिक हरिकेन मोसम १९ मे, इ.स. २०१२ – २९ ऑक्टोबर, इ.स. २०१२ | पुढील: २०१३ अटलांटिक हरिकेन मोसम |