फर्नांदो अलोन्सो, १३४ गुणांसोबत २००६ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.मिखाएल शुमाखर, १२१ गुणांसोबत २००६ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.फिलिपे मास्सा, ८० गुणांसोबत २००६ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.
२००६ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए.फॉर्म्युला वन शर्यतीचा ६०वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १८ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २३ चालकांनी सहभाग घेतला. १२ मार्च २००६ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर २२ ऑक्टोबर रोजी ब्राझील मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.
संघ आणि चालक
२००६ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००६ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००६ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००६ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.
‡ सर्व इंजिन फॉर्म्युला वनच्या २.४ लिटर व्हि.८ इंजिनच्या नियमाप्रमाणे आहेत. हा नियम २००६ फॉर्म्युला वन हंगामात अमलात आणला गेला होता.
हंगामाचे वेळपत्रक
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री तिच्या अधिक्रुत वेळपत्रिकेतील ठरवलेल्या तारखेच्या नंतर घेण्यात आली, कारण त्याच वेळेत "२००६ कॉमनवेल्थ गेम्स" सुद्धा घेण्यात येणार होते. बहरैन ग्रांप्री ही बहरैन मधील पहीली ग्रांप्री होती व जपानी ग्रांप्री आणि चिनी ग्रांप्री या शर्यतींच्या तारखांमध्ये अदला-बदल करण्यात आला.