Jump to content

२००३ नोम पेन्ह दंगली

२९ जानेवारी, २००३मध्ये अंगकोरवाटच्या मालकीबद्दलच्या वादावरून कंबोडियाची राजधानी नोम पेन्हमध्ये दंगली झाल्या होत्या

जानेवारी २००३ मध्ये कंबोडियन वृत्तपत्राच्या एका लेखात खोटे आरोप झाले की थाई अभिनेत्री सुवनंत काँगींगने दावा केला की अंगकोर वाट हे थायलंडचे आहे.[] ही बातमी इतर कंबोडियन प्रिंट आणि रेडिओ मीडियाने प्रसिद्ध केली आणि त्यामुळे राष्ट्रवादी भावनांना उत्तेजन मिळून २९ जानेवारी रोजी फ्नॉम पेनमध्ये दंगली झाल्या, जेथे थाई दूतावास जळाला. दंगलीमुळे थायलंड आणि कंबोडिया मधे असणाऱ्या संवेदनशील आणि ऐतिहासिक संबंधाचे दर्शन घडते.[][]

पार्श्वभूमी

ऐतिहासिक

ऐतिहासिकदृष्ट्या, सियाम (आधुनिक थायलंड) आणि कंबोडिया यांच्यातील संबंध अत्यंत अस्थिर आणि संवेदनशील होते, ज्यामुळे देशाचे राज्यामधे विभाजन होण्याऐवेजी शहरांचे राज्यांमध्ये झालेले विभाजन पाहायला मिळते. १४ व्या शतकात थाई शक्तीचे केंद्र सुखोथाय येथून दक्षिणेकडे अयथ्यापर्यंत गेले, जो खमेर साम्राज्याचा भाग बनला होता. अयथ्याकडून अंगकोरपर्यंत येणारा धोका वाढल्यामुळे १५ व्या शतकात अंगकोर हा भाग साम्राज्यातून काढून टाकण्यात आला. आगामी शतकांमध्ये सियामने असंख्य आक्रमणे केली. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात, अंगकोरसह उत्तर कंबोडिया सियामवर राज्य करत होता. १९०७ मधे सियाम ने उत्तर कंबोडिया हा प्रांत फ्रान्सला दिला. या पराभवाच्या आधारे १९३० मध्ये राष्ट्रवादी हा भाग थायलंडचा असल्याचे सांगितले. १९४१ मध्ये फ्रान्ससोबत झालेल्या युद्धानंतर थायलंडने या क्षेत्रात आपला हक्क पुन्हा प्राप्त केला जो कि थायलंडला १९५० पर्यंत कायम ठेवता आला.

सांस्कृतिक

कंबोडियाच्या तुलनेत, थायलंडची लोकसंख्या खूप मोठी आहे आणि त्यामुळे तेथे पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव अधिक जाणवत असे, त्यामुळेच याचा प्रभाव कंबोडियन संगीत आणि दूरदर्शनवर एजाणवतो. बरेच कंबोडियन असा विचार करतात की थाई लोक त्यांच्या शेजारील लोकांना हीन वागणूक देतात आणि वर्णभेद देखील करतात. खमेर आणि थाई यांच्यात विवाद आणि गैरसमज याबाबातचा एक मोठा इतिहास आहे. थायलंड आणि कंबोडियाची संस्कृती जवळजवळ सारखीच असली तरीसुद्धा दोन्ही प्रांतातील विवाद आणि एकमेकांवरील दाव्यांमुळे लोकांच्या मनामधे असंतोषाची भावना होती. दक्षिणपूर्व आशियामध्ये अन्य कोणत्याही देशाची संस्कृती थायलंड आणि कंबोडियासारखी नाही.

थाई लोकांमद्धे पसरलेल्या असंतोषाचे कारण म्हणजे खमेर साम्राज्य स्थापन झाल्यापासून थाई लोकांच्या प्रति झालेल्या द्वेषभावनेत वाढ, तसेच समजूतदारपणाची कमतरता शिक्षित थाई लोक आणि सत्तारूढ शासक वर्ग या सदस्यांच्या विचारसरणीत आढळून येते, त्यामुळे जे लोक खोम आणि खमेर यांच्यात फरक करतात, त्यांना दोन विभिन्न जातीय गट समजले जाई. थाई या गोष्टींवर ठाम होते कि "हे खोम होते खमेर नव्हे" ज्यांनी अंकोर वाट आणि अंगकोर थॉम येथे राजसी मंदिरे बांधली जे कि खरोखर महान प्राचीन साम्राज्यांपैकी एक मानले जाते. जागतिक पातळीवर सर्वसामान्यपणे या प्रदेशात व साम्राज्यावर राज्य करणाऱ्या काही संस्कृती खमेरे संस्कृतीमधून बाहेर पडल्या जे कि खमेर लोकांसाठी अपमानास्पद मानले जाते. १९ व्या शतकात "खमेर साम्राज्या शेजारील दोन बलाढ्य देश थायलंड आणि व्हिएतनाम पासून गिळंकृत होता होता वाचले". यामुळे यावेळेसपासुन खमेर मधील लोकांच्या मनामधे अशी भीती निर्माण झाली कि त्यांच्या शेजारील देश खमेर प्रांत जिंकून खमेरची ओळख संपवून टाकु इच्छितात.[]

दंगलींचे कारण

दंगीलाच्या कारणाचा शोध घेतला असता जानेवारी १८, २००३ रोजी, कंबोडियन वृत्तपत्र, रामाई अंगकोर (अंगकोरचा प्रकाश) मद्धे प्रकाशित झालेल्या एका बातमीमुळे प्रेरित होऊन दंगे झाले, ज्यामध्ये असे लिहिले होते की थाई अभिनेत्री शुभांत कांगींग यांनी सांगितले की कंबोडिया ने अंगकोरवाट चोरला आहे आणि ती तोपर्यंत परत येणार नाही जोपर्यंत कंबोडिया परत अंगकोरवाट वापस करणार नाही. वृत्तपत्राच्या संपादकांनी बातमीचा स्रोत असा दिला कि खमेर राष्ट्रवाद्यांच्या एका गटाने टेलिव्हिजनवर थाई अभिनेत्री शुभांत कांगींगला पहिले आहे. परंतु वृत्तपत्रांच्या दाव्याचे समर्थन करणारे कोणतेही पुरावे कधीही उदयाला आले नाहीत आणि सदरील वृत्त अभिनेत्री शुभांत कांगींगच्या वर्णनाबद्दलच्या गैरसमजांमधून समोर आले.[][]

खमेर रेडिओ आणि प्रिंट मीडियाद्वारे हा अहवाल काढण्यात आला, आणि अंगकोर लेखाची प्रत शाळांमध्ये वितरीत केली गेली. 28 जानेवारी रोजी कंबोडिया सरकारने नंतर देशातील सर्व थाई टीव्ही कार्यक्रमांवर बंदी घातली. दंगलीच्या मागे राष्ट्राप्रतीचा आदर आणि प्रेम ही भावना होती यात शंका नाही. राजकीय हितसंबंध जपण्यासाठी दोन्ही देशांच्या राजकीय नेत्यांनी देशाचे बऱ्याच वर्षांपासून शोषण केले.[][]

दंगे

२९ जानेवारीला दंगलींनी फ्नॉम पेनमध्ये थाई दूतावासाची इमारत नष्ट केली. त्याच वेळी, थाई एअरवेज इंटरनॅशनल, सीन कॉर्पोरेशनने थाई मालकीच्या व्यवसायावर हल्ला केला, ज्याची थाई पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांच्या कुटुंबाची मालकी होती. आदरणीय राजा भुमुबोल अदुल्यादेजचे जळणारे छायाचित्र हातात घेणाऱ्या कंबोडिया माणसाच्या छायाचित्राने थाई लोकांचा राग अधिक वाढला. थाई सरकारने थाई नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कंबोडियाला लष्करी विमान पाठवले, तर थाई लोक बँकॉकमधील कंबोडियन दूतावासाबाहेर निदर्शनास आले. दंगलींची जबाबदारी विवादित होती: हुन सेन यांनी सरकारवर होणारा अकार्यक्षमतेचा आरोप टाळण्यासाठी "अतिरेक्यांनी" दंगली घडवून आणल्याचे सांगितले. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष प्रिन्स नोरोम रानारिध यांनी दावा केला की विरोधी पक्षनेते सॅम रेन्सी यांनी हल्ले घडवून आणले होते. तर रॅन्सी यांनी असे विधान केले की त्यांनी हिंसा टाळण्याचा प्रयत्न केला.[][][][१०]

दंगलीनंतरचे पडसाद

थायलंडने दंगलीनंतर कंबोडियासह देशाची सीमा बंद केली, परंतु ती केवळ थाई आणि कंबोडियन नागरिकांसाठी. परदेशी किंवा पाश्चात्य पर्यटकांना कधीही सीमेचे बंधन नव्हते. २१ मार्च २००३ रोजी थाई दूतावासाच्या कंबोडियन सरकारच्या 6 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या भरपाईची परतफेड झाल्यानंतर सीमा पुन्हा उघडली गेली.[११][१२]

संदर्भ

  1. ^ a b c "Rumor of Thai Actress' Words Salted a Wound". latimes (इंग्रजी भाषेत). 2018-12-04 रोजी पाहिले.
  2. ^ Aglionby, John (2003-01-31). "Thais cut links with Cambodia after riots". the Guardian (इंग्रजी भाषेत). 2018-12-04 रोजी पाहिले.
  3. ^ "Thais flee Phnom Penh after night of rioting". The Irish Times (इंग्रजी भाषेत). 2018-12-04 रोजी पाहिले.
  4. ^ Press, The Associated. "Cambodia Apologizes To Thailand Over Riot" (इंग्रजी भाषेत). 2018-12-04 रोजी पाहिले.
  5. ^ Malloy, Daniel. "Before Facebook Even Existed, Fake News Almost Sent This City Up in Flames". OZY (इंग्रजी भाषेत). 2018-12-04 रोजी पाहिले.
  6. ^ "Whose Angkor Wat?". The Economist (इंग्रजी भाषेत). 2018-12-04 रोजी पाहिले.
  7. ^ "CNN.com – Thais flee Phnom Penh after night of riots – Jan. 30, 2003". edition.cnn.com. 2018-12-04 रोजी पाहिले.
  8. ^ "CNN.com – Cambodian 'incompetence' in anti-Thai riots – Feb. 3, 2003". edition.cnn.com. 2018-12-04 रोजी पाहिले.
  9. ^ ppp_webadmin (2003-01-31). "Mobs go berserk in anti-Thai frenzy Thai embassy torched; businesses gutted". Phnom Penh Post (इंग्रजी भाषेत). 2018-12-04 रोजी पाहिले.
  10. ^ "Cambodian rioters burn Thai embassy". The Independent (इंग्रजी भाषेत). 2018-12-04 रोजी पाहिले.
  11. ^ "BBC NEWS | Asia-Pacific | Cambodia apologises to Thais". news.bbc.co.uk. 2018-12-04 रोजी पाहिले.
  12. ^ "THAILAND-CAMBODIA: Mending Fences after the Riots Far from Easy | Inter Press Service". www.ipsnews.net. 2018-12-04 रोजी पाहिले.