२जी स्पेक्ट्रम घोटाळा
२जी स्पेक्ट्रम घोटाळा भारतातील केंद्रीय मंत्री व अधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीजाळ्यांच्या स्पेक्ट्रम[मराठी शब्द सुचवा] हक्कांच्या वितरणात केलेला कथित भ्रष्टाचार आहे.
भारतीय प्रसारण राज्यमंत्री ए. राजा यांच्या सूचनेनुसार भारतीय सरकारने हे स्पेक्ट्रम हक्क अनेक कंपन्यांना बाजारभावापेक्षा कमी किमतीस विकले. हा फरक अंदाजे १७६ अब्ज रुपये (३९ अब्ज अमेरिकन डॉलर) आहे. २००८मध्येच झालेला हा घोटाळा आयकर विभागाच्या राडिया ध्वनीमुद्रणांच्या अन्वेषणा दरम्यान उघडकीस आला.
केंद्र सरकारने सुरुवातीस काहीच चुकलेले नसल्याचा दावा केला परंतु विरोधी पक्ष व प्रसारमाध्यमांच्या दबावामुळे राज्यमंत्री ए. राजा यांनी राजीनामा दिला.