Jump to content

१९९० युरोप महिला क्रिकेट चषक

१९९० युरोप महिला क्रिकेट चषक
तारीख १८ – २२ जुलै १९९०
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (५५ षटके)
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि अंतिम सामना
यजमानइंग्लंड इंग्लंड
विजेतेइंग्लंडचा ध्वज इंग्लंड (२ वेळा)
सहभाग
सामने
सर्वात जास्त धावाइंग्लंड वेंडी वॉट्सन (२२९)
सर्वात जास्त बळीआयर्लंडचे प्रजासत्ताक सुझॅन ब्रे (८)
१९८९ (आधी)(नंतर) १९९१

१९९० युरोप महिला क्रिकेट चषक ही एक महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १८-२२ जुलै १९९० दरम्यान इंग्लंडमध्ये आयोजित केली गेली होती. युरोपियन क्रिकेट संघटनेद्वारे सुरू केलेल्या युरोप महिला क्रिकेट चषक स्पर्धेची ही दुसरी आवृत्ती होती. सर्व सामन्यांना हे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा होता. यजमान इंग्लंडसह डेन्मार्क, आयर्लंड आणि नेदरलँड्स या चार देशांच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघांनी सदर स्पर्धेत भाग घेतला.

स्पर्धा गट फेरी आणि अंतिम सामना या पद्धतीने खेळवलि गेली. सर्व संघांनी एकमेकांशी एक सामना खेळला. गुणफलकात इंग्लंड अव्वल राहत अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. आयर्लंड महिलांनी दुसरे स्थान मिळवत इंग्लंडविरुद्ध अंतिम सामना खेळला. अंतिम सामन्यात इंग्लंड महिलांनी आयर्लंडवर ६५ धावांनी विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा युरोप महिला क्रिकेट चषक जिंकला. इंग्लंडची वेंडी वॉट्सन ही सलग दुसऱ्यावर्षीसुद्धा स्पर्धेत सर्वाधिक २२९ धावा करत आघाडीची खेळाडू ठरली. तर आयर्लंडची सुझॅन ब्रे स्पर्धेत सर्वाधिक ८ गडी मिळवत आघाडीची गोलंदाज ठरली.

गुणफलक

संघ
खेविगुणरनरेट नोट्स
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड४.३१२अंतिम सामन्यासाठी पात्र
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड३.८२८
Flag of the Netherlands नेदरलँड्स२.५८८
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क२.८४८

गट फेरी

१८ जुलै १९९०
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
५७ (३३ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
५८/२ (१९.५ षटके)
आयरेन स्कोफ १४ (७०)
कॅरोलाइन बार्स ३/१ (४ षटके)
कॅरॉल हॉज २५* (५७)
इनग्रीड केइझर १/८ (४ षटके)
इंग्लंड महिला ८ गडी राखून विजयी.
आईलस्टोन रोड मैदान, लेस्टर
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.
  • ५५ षटकांचा सामना.
  • इंग्लंडच्या भूमीवर नेदरलँड्सचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • ॲलिसन एल्डर (इं) आणि पॉलिन टी बीस्ट (ने) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

१८ जुलै १९९०
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
२३४/४ (५५ षटके)
वि
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
१८५/८ (५५ षटके)
मेरी-पॅट मूर ९९ (१५२)
लेन हॅन्सेन ३/४७ (११ षटके)
जेन जेन्सन ४९ (७४)
सुझॅन ब्रे ५/२७ (११ षटके)
आयर्लंड महिला ४९ धावांनी विजयी.
इव्हानहो क्रिकेट क्लब मैदान, कर्बी मक्सलो
  • नाणेफेक : डेन्मार्क महिला, क्षेत्ररक्षण.
  • ५५ षटकांचा सामना.
  • इंग्लंडच्या भूमीवर आयर्लंड आणि डेन्मार्कचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • हेदी जेन्सन, जेन जेन्सन, मेटे फ्रॉस्ट (डे) आणि जुडीथ हर्बीसन (आ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

१९ जुलै १९९०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२७०/५ (५४ षटके)
वि
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
६४ (२४.३ षटके)
जेन पॉवेल ९८* (१०३)
शार्लोट स्मिथ २/५१ (८ षटके)
जानी जॉनसन २० (३८)
गिलियन स्मिथ ५/१५ (५.३ षटके)
इंग्लंड महिला २०६ धावांनी विजयी.
जॉन प्लेयर मैदान, नॉटिंगहॅम
  • नाणेफेक : डेन्मार्क महिला, क्षेत्ररक्षण.
  • ५५ षटकांचा सामना. परंतु ५४ षटकांचा खेळवण्यात आला.
  • लिंडा सोरेन्सन (डे) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

१९ जुलै १९९०
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१९८/४ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१७२/९ (५० षटके)
स्टेल्ला ओवेन्स ८४* (८८)
इनग्रीड केइझर २/२० (९ षटके)
निकोला पेन ४७ (६०)
सुझॅन ब्रे ३/३२ (११ षटके)
आयर्लंड महिला २६ धावांनी विजयी.
जॉन प्लेयर मैदान, नॉटिंगहॅम
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.
  • ५५ षटकांचा सामना. परंतु ५० षटकांचा खेळवण्यात आला.

२० जुलै १९९०
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१२३/७ (५३ षटके)
वि
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
८९ (३९.१ षटके)
जिस्का हॉवर्ड २९ (९०)
सुझॅन नील्सन ३/२७ (११ षटके)
मेटे फ्रॉस्ट ३५ (८०)
इनग्रीड केइझर ४/१४ (११ षटके)
नेदरलँड्स महिला ३४ धावांनी विजयी.
आईलस्टोन रोड मैदान, लेस्टर
  • नाणेफेक : डेन्मार्क महिला, क्षेत्ररक्षण.
  • ५५ षटकांचा सामना. परंतु ५३ षटकांचा खेळवण्यात आला.
  • नेदरलँड्स महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात डेन्मार्कवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • मेटे ग्रेगरसेन, हेदी किजर (डे) आणि जिस्का हॉवर्ड (ने) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२० जुलै १९९०
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१६९/९ (५२ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७०/१ (४१.४ षटके)
इंग्लंड महिला ९ गडी राखून विजयी.
इव्हानहो क्रिकेट क्लब मैदान, कर्बी मक्सलो
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • ५५ षटकांचा सामना. परंतु ५३ षटकांचा खेळवण्यात आला.
  • गिलियन मॅककॉल, सैब यंग आणि टेरी बेनेट (आ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

अंतिम सामना

२२ जुलै १९९०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२२४/३ (५५ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१५९/८ (५५ षटके)
वेंडी वॉट्सन १०७* (१६८)
अ‍ॅनी लाईहान १/३१ (५ षटके)
मेरी-पॅट मूर ४४ (१२५)
क्लेर टेलर २/७ (८ षटके)
इंग्लंड महिला ६५ धावांनी विजयी.
ग्रेट ओक्ले क्रिकेट क्लब मैदान, नॉरदॅम्प्टनशायर
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • ५५ षटकांचा सामना.