Jump to content

१९५० फिफा विश्वचषक

१९५० फिफा विश्वचषक
IV Campeonato Mundial de Futebol
स्पर्धा माहिती
यजमान देशब्राझील ध्वज ब्राझील
तारखा २४ जून – १६ जुलै
संघ संख्या १५
स्थळ ६ (६ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताउरुग्वेचा ध्वज उरुग्वे (२ वेळा)
उपविजेताब्राझीलचा ध्वज ब्राझील
तिसरे स्थानस्वीडनचा ध्वज स्वीडन
चौथे स्थानस्पेनचा ध्वज स्पेन
इतर माहिती
एकूण सामने २२
एकूण गोल ८८ (४ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १०,४३,५०० (४७,४३२ प्रति सामना)

१९५० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची चौथी आवृत्ती ब्राझील देशामध्ये २४ जून ते १६ जुलै १९५० दरम्यान खेळवण्यात आली. दुसऱ्या महायुद्धामुळे १९४२ व १९४६ सालच्या स्पर्धा रद्द केल्या गेल्यामुळे १९३८ च्या विश्वचषकानंतर १२ वर्षांनी ही स्पर्धा भरवली गेली. जगातील ३७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १५ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

उरुग्वेने अंतिम साखळी गटात यजमान ब्राझीलला २–१ असे पराभूत करून दुसरे अजिंक्यपद मिळवले. विजेतेपदासाठी अंतिम फेरीचा सामना न खेळवला गेलेला हा आजवरचा एकमेव विश्वचषक आहे.

पात्र संघ

दुसऱ्या महायुद्धात पराभूत जर्मनीजपानला ह्या स्पर्धेचे आमंत्रण नव्हते. तसेच पूर्व युरोपातील सर्व देशांनी ह्या स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता. आशिया गटामधून बर्मा, फिलिपाईन्स व इंडोनेशियाने असमर्थता दाखल्यामुळे भारत देशाला विश्वचषकात खेळण्याची प्रथमच पात्रता मिळाली.

  • बोलिव्हियाचा ध्वज बोलिव्हिया
  • ब्राझीलचा ध्वज ब्राझील (यजमान)
  • चिलीचा ध्वज चिली
  • इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
  • इटलीचा ध्वज इटली (गतविजेते)
  • मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
  • पेराग्वेचा ध्वज पेराग्वे
  • स्पेनचा ध्वज स्पेन
  • स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
  • स्वीडनचा ध्वज स्वीडन
  • स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
  • Flag of the United States अमेरिका
  • उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
  • फ्रान्सचा ध्वज फ्रान्स (स्पर्धा सुरू होण्यापूर्वी माघार)
  • भारतचा ध्वज भारत (स्पर्धा सुरू होण्यापूर्वी माघार)

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारताने प्रवासखर्च, संघाला सरावाचा अभाव व संघनिवडीच्या समस्या इत्यादी कारणांस्तव ह्या स्पर्धेमधून अंग काढून घेतले. फ्रान्सने देखील प्रवासखर्चाचे कारण दाखवत ह्या स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला. ह्यामुळे केवळ १३ देशांचे संघ ह्या स्पर्धेत खेळले.

यजमान शहरे

ब्राझिलमधील सहा शहरांमध्ये सामने खेळवण्यात आले.

रियो दि जानेरो साओ पाउलोबेलो होरिझोन्ते
माराकान्या Estádio do Pacaembu Estádio Sete de Setembro
26°14′5.27″S 27°58′56.47″E / 26.2347972°S 27.9823528°E / -26.2347972; 27.9823528 (Soccer City)33°54′12.46″S 18°24′40.15″E / 33.9034611°S 18.4111528°E / -33.9034611; 18.4111528 (Cape Town स्टेडियम)29°49′46″S 31°01′49″E / 29.82944°S 31.03028°E / -29.82944; 31.03028 (Moses Mabhida स्टेडियम)
क्षमता: 199,854क्षमता: 60,000क्षमता: 30,000
१९५० फिफा विश्वचषक (ब्राझील)
कुरितिबापोर्तू अलेग्रीरेसिफे
23°55′29″S 29°28′08″E / 23.924689°S 29.468765°E / -23.924689; 29.468765 (Peter Mokaba स्टेडियम)25°27′42″S 30°55′47″E / 25.46172°S 30.929689°E / -25.46172; 30.929689 (Mbombela स्टेडियम)29°07′02.25″S 26°12′31.85″E / 29.1172917°S 26.2088472°E / -29.1172917; 26.2088472 (Free State स्टेडियम)
Estádio Vila Capanema Estádio dos Eucaliptos Estádio Ilha do Retiro
क्षमता: 10,000क्षमता: 20,000क्षमता: 10,000
[ चित्र हवे ]

स्पर्धेचे स्वरूप

ह्या स्पर्धेमध्ये १५ पात्र संघांना ४ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. बाद फेरीऐवजी सर्वोत्तम चार संघांमध्ये पुन्हा एकदा साखळी फेरी खेळवली गेली. ह्या अंतिम साखळीमधील सर्वोत्तम संघाला विजेतेपद देण्यात आले.

अंतिम साखळी फेरी निकाल

संघ साविगोनोंगिविगू
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे 3210755
ब्राझीलचा ध्वज ब्राझील 32011444
स्वीडनचा ध्वज स्वीडन 31026112
स्पेनचा ध्वज स्पेन 30124111

बाह्य दुवे