१७२९ (संख्या)
१७२९ ही १७२८ नंतरची आणि १७३० च्या अगोदरची नैसर्गिक संख्या आहे. ही दोन वेगवेगळ्या घनांच्या बेरजेने येणारी सगळ्यात लहान संख्या आहे. या संख्येला रामानुजन संख्या म्हणले जाते. [१] गणितज्ञ हार्डी ज्या गाडीने आजारी रामनुजनला भेटायला गेले होते, त्या गाडीचा 1729 हा काहीसा नीरस नंबर होता. तसे रामानुजनला सांगितल्यावर त्यांनी तत्काळ हा नंबर किती खास आहे हे सांगितले. म्हणून ही संख्या रामानुजन संख्या म्हणून प्रसिद्ध आहे.
१२३ + १३ = १७२९
आणि
१०३ + ९३ = १७२९.
- अशीच एक दुसरी संख्या :
४३ + ३३ = ९१
आणि
६३ + (-५)३ = ९१,किंवा
६३ - ५३ = ९१
आणि विशेष म्हणजे ९१ × १९ = १७२९