१३ जुलै २०११ चा मुंबईवरील बॉम्बहल्ला
मुंबईमध्ये १३ जुलै, इ.स. २०११ला सायंकाळी लागोपाठ तीन ठिकाणी बाँबस्फोट झाले. दादर, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस अशा तीनठिकाणी संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी आयईडीच्या मदतीने घडवण्यात आलेल्या या स्फोटांमध्ये प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार१९ लोक ठार व १३०हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे[ संदर्भ हवा ].
१३ जुलै, इ.स. २०११ रोजी भाप्रवेनुसार संध्याकाळी ६.५० ते ७ वाजण्याच्या दरम्यान दादर, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस अशा तीन ठिकाणी आयईडी, अर्थात इंप्रोव्हाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईसेस या स्फोटकांच्या मदतीने हे स्फोट घडवण्यात आलेले आहेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे[ संदर्भ हवा ]. दादर येथील डिसिल्व्हा हायस्कूल आणि गोल हनुमान मंदिराजवळील बेस्ट बस थांब्याच्या मीटर बॉक्समध्ये संध्याकाळी पावणे सात वाजता बाँबस्फोट झाला. झवेरी बाजार येथील खाऊ गल्लीतही संध्याकाळी सातच्या सुमारास मोठा स्फोट झाला. येथे एका छत्रीमध्ये हा बाँब लपवून ठेवण्यात आला होता. हिरे व्यापाराचे मोठे केंद्र असलेल्या ऑपेरा हाऊस येथील प्रसाद चेंबर इमारतीजवळील बसस्टॉपजवळ तिसरा बाँबस्फोट झाला.