ह्युलेट-पॅकार्ड
प्रकार | सार्वजनिक |
---|---|
उद्योग क्षेत्र | संगणक उत्पादक |
स्थापना | १९३९ पालो आल्टो, कॅलिफोर्निया |
संस्थापक | बिल ह्युलेट व डेव्हिड पॅकार्ड |
मुख्यालय | पालो आल्टो, कॅलिफोर्निया, अमेरिका |
महसूली उत्पन्न | ११८.३६ अब्ज डॉलर्स |
एकूण उत्पन्न (कर/व्याज वजावटीपूर्वी) | १०.४७३ अब्ज डॉलर्स |
कर्मचारी | ३,२५,००० |
संकेतस्थळ | ह्युलेट-पॅकार्ड.कॉम |
ह्युलेट-पॅकार्ड कंपनी (किंवा एच.पी.) ही एक संगणक व संगणकाशी निगडित इतर वस्तू उत्पादन करणारी अमेरिकन कंपनी आहे. सध्या डेस्कटॉप व लॅपटॉपचे उत्पादन व विक्रीमध्ये एच.पी.चा जगात पहिला क्रमांक आहे. एच.पी. मुख्यालय कॅलिफोर्निया राज्यातील सिलिकॉन व्हॅलीमधील पालो आल्टो ह्या शहरात आहे. बिल ह्युलेट व डेव्हिड पॅकार्ड ह्या दोघांनी स्टॅनफर्ड विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यानंतर पालो आल्टोतील एका गॅरेजमध्ये ५३८ डॉलर्स एवढ्या भांडवलावर एच.पी.ची १९३९ साली स्थापना केली.