Jump to content

हौलन

हौलन ही चंगीझ खान याची आई होती. ती मर्किद जमातीच्या चिलेडू नावाच्या योद्ध्याची बायको होती. इ.स. ११६१ मध्ये येसुगेईने तिच्यावर भाळून तिच्या पहिल्या नवऱ्यावर, चिलेडूवर हल्ला केला. आपला जीव वाचवण्यासाठी चिलेडूने निघून जावे अशी विनंती हौलनने त्याला केली. पुढे येसुगेईने हौलनशी लग्न केले. मर्किद जमात ही येसुगेईच्या जमातीपेक्षा वरच्या दर्जाची होती तसेच येसुगेईचे यापूर्वी एक लग्न झालेले होते, यावरून या लग्नात हौलन सुखी नव्हती असा अंदाज काढला जातो.

येसुगेईपासून तिला ४ मुलगे व १ मुलगी झाली. त्यापैकी सर्वात मोठ्या तेमुजीनचा/ चंगीझचा जन्म ११६२ मध्ये झाला.