Jump to content

होमी भाभा

होमी जहांगीर भाभा

पूर्ण नावहोमी जहांगीर भाभा
जन्मऑक्टोबर ३०, इ.स. १९०९
मुंबई, महाराष्ट्र, भारत
मृत्यूजानेवारी २४, इ.स. १९६६
माँत ब्यांको, इटली
निवासस्थानभारत
नागरिकत्वभारतीय
राष्ट्रीयत्वभारतीय
धर्मपारशी
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्रज्ञ
कार्यसंस्थाकॅव्हेंडिश लॅबोरेटरी,
टाटा मूलभूत संशोधन संस्था,
भारतीय अणुऊर्जा आयोग
प्रशिक्षणकेंब्रिज विद्यापीठ
डॉक्टरेटचे मार्गदर्शकपॉल डिरॅक
ख्यातीभारतीय अणू संशोधन
पुरस्कारपद्मभूषण(इ.स. १९५४)
वडीलजहांगीर होरमजी भाभा
आईमेहेरबाई

डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील जहांगीर भाभा हे बॅरिस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणे आवड निर्माण झाली. या शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता.[ संदर्भ हवा ] अतिशय सुंदर, देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेले होमी भाभा उत्तम व्यक्ती होते.

त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरिंगची पदवी प्राप्‍त करण्याची अट घालून दिली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रिज विद्यापीठातून इ.स. १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. कॅव्हेंडिश लॅबोरेटरीत न्यूक्लिअर फिजिक्सचा अभ्यास करून इ.स. १९३३ साली त्यांनी डॉक्टरेट मिळवली.[] त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली. त्यांनी अन्वीकक्षास्त्र निर्माण केले.[ संदर्भ हवा ]

इ.स. १९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा हे टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले.[ संदर्भ हवा ] भारताच्या स्वातंत्र्यानंतर इ.स. १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे ते संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणु भट्टीची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक.[ संदर्भ हवा ] डॉ. होमी भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा वीज निर्मितीसाठी उपयोग केला. तसेच १८ मे, इ.स. १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.[ संदर्भ हवा ]

भाभांवरील पुस्तके

  • भारताची अणुगाथा - आल्हाद आपटे. भारतातील अणुसंशोधन आणि.......[ संदर्भ हवा ]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ सुनीत पोतनीस. Loksatta (Marathi भाषेत) https://www.loksatta.com/navneet-news/dr-homi-bhabha-1662507/. 13-04-2018 रोजी पाहिले. होमींचे वडील आणि काका दोराबजी टाटा यांनी ठरवलं होतं की होमींनी मेकॅनिकल इंजिनीअर होऊन जमशेदपूरच्या टाटा स्टील कंपनीची तांत्रिक बाजू सांभाळावी. Unknown parameter |शीर्षकtitle= ignored (सहाय्य); |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)