होम मिनिस्टर हा झी मराठी या वाहिनीवरील एक कार्यक्रम आहे. ह्या रिॲलिटी शोमध्ये पूर्वी आदेश बांदेकर प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन यायचे. ह्या स्पर्धा २ वहिनींमध्ये असायच्या. प्रत्येक एपिसोडमध्ये जिंकणाऱ्या वहिनींना एक पैठणी देण्यात येत असे. लॉकडाऊनदरम्यान घरच्या घरी या विशेष पर्वामध्ये व्हिडीओ कॉलद्वारे कार्यक्रमाचं शूटिंग सुरू करण्यात आलं होतं.
टीआरपी
आठवडा | वर्ष | TRP | संदर्भ |
---|
TVT | क्रमांक |
---|
आठवडा ४१ | २०१७ | १.९ | ४ | |
आठवडा ४४ | २०१७ | २.१ | ५ | |
२६ नोव्हेंबर २०१७ | १ तासाचा विशेष भाग | ३.१ | ५ | |
आठवडा ४९ | २०१७ | २.३ | ४ | [१] |
नवे पर्व
- नववधू नं.१ (१४ सप्टेंबर २००९)
- जाऊबाई जोरात (१४ जानेवारी २०११)
- स्वप्न गृहलक्ष्मीचं (१६ मे २०११)
- मानाची पैठणी (२१ मे २०१२)
- होणार सून मी ह्या घरची (३१ मार्च २०१४)
- गोवा स्पेशल (२५ एप्रिल २०१६)
- काहे दिया परदेस (१५ मे २०१६)
- चूकभूल द्यावी घ्यावी (१३ फेब्रुवारी २०१७)
- लागिरं झालं जी (०१ मे २०१७)
- अग्गंबाई सासूबाई (१९ ऑगस्ट २०१९)
- भारत दौरा (०१ जानेवारी २०२०)
- घरच्या घरी (०८ जून २०२०)
- कोव्हिड योद्धा विशेष (२७ जुलै २०२०)
- माझा बबड्या (०७ सप्टेंबर २०२०)
- सासूबाई माझ्या लयभारी (१२ ऑक्टोबर २०२०)
- पैठणी माहेरच्या अंगणी (०४ जानेवारी २०२१)
- लिटील चॅम्प्स (२६ जुलै २०२१)
- खेळ सख्यांचा, चारचौघींचा (२७ जून २०२२)
इतर पर्वे
- महाराष्ट्राची महामिनिस्टर
- दिल्या घरी तू सुखी रहा
- उत्सव नात्यांचा, मैत्रीचा आणि आपल्या माणसांचा
- नांदा सौख्य भरे
- पंढरीची वारी विशेष (दरवर्षी जुलै महिन्यात)
नवीन वेळ
क्र. | दिनांक | वार | वेळ |
---|
१ | १३ सप्टेंबर २००४ - १९ मे २००६ | सोम-शुक्र | संध्या. ७.३० |
२ | २२ मे २००६ - २९ जून २००७ | संध्या. ६.३० |
३ | २ जुलै २००७ - २५ जुलै २००९ | सोम-शनि |
४ | २७ जुलै - १२ सप्टेंबर २००९ | संध्या. ६ |
५ | १४ सप्टेंबर २००९ - १ मे २०१० | संध्या. ६.३० |
६ | १४ जानेवारी - १४ मे २०११ | संध्या. ६ |
७ | १६ मे २०११ - १९ ऑक्टोबर २०१९ | सोम-शनि (कधीतरी रवि) | संध्या. ६.३० |
८ | २१ ऑक्टोबर २०१९ - २१ मार्च २०२० | संध्या. ६ |
९ | ८ जून - ३१ ऑक्टोबर २०२० | संध्या. ६.३० |
१० | २ नोव्हेंबर २०२० - २४ एप्रिल २०२१ | संध्या. ६ |
११ | २७ एप्रिल - १५ मे २०२१ | संध्या. ७ |
१२ | १७ मे - १४ ऑगस्ट २०२१ | संध्या. ६.३० |
१३ | १६ ऑगस्ट २०२१ - ९ एप्रिल २०२२ | संध्या. ६ |
१४ | २७ जून - १७ सप्टेंबर २०२२ | संध्या. ६.३० |
१५ | १९ सप्टेंबर २०२२ - ६ मे २०२३ | संध्या. ६ |
१६ | ८ मे - १९ ऑगस्ट २०२३ | संध्या. ५.३० |
१७ | २१ ऑगस्ट २०२३ - १३ जानेवारी २०२४ | संध्या. ६ |
१८ | १५ जानेवारी - ३० मार्च २०२४ | संध्या. ६.३० |
१९ | १ एप्रिल - ५ जुलै २०२४ | सोम-शुक्र |
२० | ८ जुलै २०२४ - चालू | संध्या. ६ |
विशेष भाग
- पैठणीच्या खेळात रंगणार जुई आणि मल्लिकाची जुगलबंदी. (१३ ऑगस्ट २०१७)
- कोण ठरणार महाराष्ट्राची सुपरवहिनी? (१७ सप्टेंबर २०१७)
- सावित्रीला भावोजींचा सलाम. (२६ नोव्हेंबर २०१७)
- विनोदाचा डॉक्टर अवतरणार होम मिनिस्टरच्या मंचावर. (१ मार्च २०१८)
- अभिमान स्त्रियांचा, सन्मान पहिल्या महिला डॉक्टरच्या संघर्षाचा. (८ मार्च २०१८)
- भावोजींकडे आली तक्रार वहिनींची, मिस्टरांचा गळा दाबण्याची. (१६ जुलै २०१८)
- माऊलींची ओढ लागता, भावोजी निघाले वारीला. (२३ जुलै २०१८)
- वारीची वाट चालता, भावोजी आले पंढरपूरला. (२ सप्टेंबर २०१८)
- शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या शौर्याने प्रेरित त्यांच्या वीरपत्नीच्या जिद्दीची कहाणी. (२१ ऑक्टोबर २०१८)
- आता एकटी नाही खेळणार सूनबाई, स्पर्धक बनून समोर उभ्या राहणार सासूबाई. (१० फेब्रुवारी २०१९)
- आता पैठणीचा खेळ रंगणार स्वतः आदेश भावोजींच्या घरी. (१२ जुलै २०१९)
- लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने भावोजी उलगडणार आसावरी-अभिजीतची गोष्ट. (१५ ऑगस्ट २०१९)
- घेऊन येतोय महाराष्ट्राची लाडकी पैठणी संपूर्ण भारतातल्या वहिनींसाठी. (१३ सप्टेंबर २०१९)
- होम मिनिस्टरची स्वारी पोहोचणार आता नवी दिल्ली, बंगळूर, अहमदाबाद, इंदूर, गोवा, जयपूर, हैदराबाद, वाराणसी, कोलकाता, चंदीगढ आणि चेन्नईमध्ये. (२७ ऑक्टोबर २०१९)
- वहिनी म्हणे मिस्टरांना, माझा होशील ना. (१ जानेवारी २०२०)
- इतके दिवस काढत होतातना भावोजींच्या आठवणी, म्हणूनच ते येत आहेत घेऊन ऑनलाईन पैठणी. (८ जून २०२०)
- प्रत्यक्षात ज्यांनी केले संकटांशी दोन हात, अशाच कोव्हिड योद्धांचा भावोजी करणार सन्मान. (१ जुलै २०२०)
- सासू आणि सून आता पैठणीसाठी भिडणार, पण ह्यात मात्र त्यांचा बबड्या अडकणार. (२७ जुलै २०२०)
- पैठणी कोणाला मिळणार हा प्रश्न सगळ्यांना पडला, भावोजींना उत्तर देताना बबड्या अडचणीत सापडला. (७ सप्टेंबर २०२०)
- बबड्या कोणाचा हा प्रश्न सासू-सुनेला पडलाय, पण बबड्या मात्र लांबच ऐकत बसलाय. (४ जानेवारी २०२१)
- बबड्या आहे फारच हट्टी, त्यामुळे सासू-सुनेची होईल का गट्टी? (७ फेब्रुवारी २०२१)
- आता रंगतील माहेरच्या आठवणी, कारण पैठणीचा डाव रंगणार माहेरच्या अंगणी. (२४ एप्रिल २०२१)
- मी येतोय तुमच्या माहेरच्या अंगणी, पण वहिनी तुमची आहे का तयारी? (२६ एप्रिल २०२१)
- प्रत्येक कुटुंबासाठी इम्युनिटी बूस्टर, होम मिनिस्टर. (५ मे २०२१)
- माऊलीच्या भक्तीची ओढच न्यारी, कार्तिकीच्या संगे अनुभवू पंढरीची वारी. (१४ मे २०२१)
- घरचे लिटील चॅम्प्स ठरवणार पैठणीची मानकरी, नवे पर्व लिटील चॅम्प्ससंगे. (१७ मे २०२१)
- घरच्या लिटील चॅम्पने शोधली नाण्याची तिसरी बाजू. (२४ जून २०२१)
- आईचा मार चुकवतो, हा लिटील चॅम्प शाळेतच का रमतो? (१८ जुलै २०२१)
- मिस्टरांची सोशल भटकंती, वहिनींना मिळेल का शांती? (२६ जुलै २०२१)
- आता आली घरच्या लिटील चॅम्प्सची पाळी, मोठ्यांची झाली अळीमिळी गुपचिळी. (२८ जुलै २०२१)
- रात्री दोन वाजता ते घरात आले आणि भांडी बाहेर, असं का झालं? (३० जुलै २०२१)
- लिटील चॅम्प्सच्या खेळात पाटील कुटुंबाची नाती रंगणार, जाऊ की नणंद कोण सरस ठरणार? (२ ऑगस्ट २०२१)
- जेव्हा वहिनींनी मिस्टरांना गात विचारलं 'माझा होशील ना', तेव्हा सुरू झाली सुरेल लव्हस्टोरी. (४ ऑगस्ट २०२१)
- सिमकार्ड प्रेमकथा. (६ ऑगस्ट २०२१)
- जाऊबाई, मिस्टर आणि वहिनी तिघेही घसरून कसे काय पडले? (९ ऑगस्ट २०२१)
- पानाच्या गादीवर पानाबरोबर कशी रंगली लव्हस्टोरी? (११ ऑगस्ट २०२१)
- सर्वात वरच्या थरावर चढून विक्रम रचणाऱ्या या लिटील चॅम्पला का म्हणतात सोळा पाव? (१३ ऑगस्ट २०२१)
- वहिनींना पैठणी द्यायला आणि लिटील चॅम्प्सबरोबर मस्ती करायला आता भावोजी येणार नवीन वेळेत. (१६ ऑगस्ट २०२१)
- सासरेबुवा असं काय म्हणाले ज्यामुळे वहिनींच्या डोळ्यात अश्रू दाटून आले? (१८ ऑगस्ट २०२१)
- मिस्टरांनी काढला ठाणे-पुणे रेल्वेपास, प्रेमाचा प्रवास की प्रवासावर प्रेम? (२० ऑगस्ट २०२१)
- नऊवारी धुवायला कंटाळलेल्या सुनांना काय म्हणाल्या सासूबाई? (२३ ऑगस्ट २०२१)
- लिटील चॅम्प्स रिपोर्टर होणार, मोठ्यांच्या ब्रेकिंग न्यूझ भावोजींना सांगणार. (२५ ऑगस्ट २०२१)
- वय छोटं पण टॅलेंट मोठं, लिटील चॅम्प श्रुतीच्या मेलोडिका वादनाची झलक. (२७ ऑगस्ट २०२१)
- गोंधळी कुटुंबाच्या कलेला सोहमने दिली साथ, त्याच्या संबळ वादनाचा प्रवास. (३० ऑगस्ट २०२१)
- मेंडोलिनचा सूर उत्तम लावणाऱ्या तन्वीचा बहिणीसोबतचा सूर का बिघडतो? (१ सप्टेंबर २०२१)
- संतूर वादक सोहमचा लिटील चॅम्प्सपर्यंतचा प्रवास. (३ सप्टेंबर २०२१)
- बॅंड आणि ऑर्केस्ट्रामध्ये काम करणाऱ्या बाबांच्या मुलाचा लिटील चॅम्प्सपर्यंतचा प्रवास. (६ सप्टेंबर २०२१)
- इतक्या वर्षानंतरही वहिनी कसं करतात मिस्टरांचं स्वागत? (८ सप्टेंबर २०२१)
- लिटील चॅम्प्स साजरा करणार गणेशोत्सव भावोजींसोबत. (१० सप्टेंबर २०२१)
- अपघातानंतरही साथ सोडली नाही, वहिनी आणि मिस्टरांची काय आहे प्रेमकहाणी? (१३ सप्टेंबर २०२१)
- मुलीला लेकीप्रमाणे सांभाळणारी सासू. (१५ सप्टेंबर २०२१)
- सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा म्हणून कशा नांदतात एकत्र कुटुंबात? (१७ सप्टेंबर २०२१)
- एक नणंद दोन जावा नांदतील का आनंदाने? (२० सप्टेंबर २०२१)
- माहेरी रमण्यापेक्षा सासरी का रमतात वहिनी? (२२ सप्टेंबर २०२१)
- कठीण काळातही विद्या वहिनींनी घेतला मुलींच्या शिक्षणाचा वसा. (२४ सप्टेंबर २०२१)
- चार घरांची काम करत माऊलींनी सांभाळलं आपल्या मुलींना. (२७ सप्टेंबर २०२१)
- हेल्प मिनिस्टरने जोडलं नात्यापलीकडचं नातं. (२९ सप्टेंबर २०२१)
- होम मिनिस्टरच्या स्टेडियममध्ये रंगणार पद्मश्री डॉक्टर लहानेंची शेतावरची क्रिकेट मॅच. (१ ऑक्टोबर २०२१)
- लोकांना दृष्टी देणाऱ्या देवदूत पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सोबत रंगणार होम मिनिस्टर. (५ नोव्हेंबर २०२१)
- टाइमपास गप्पांमधून रंगणार रवी जाधवची खरी लव्हस्टोरी होम मिनिस्टरमध्ये. (८ नोव्हेंबर २०२१)
- संतोष पवारच्या स्ट्रगलला शलाकाने कशी दिली मोलाची साथ? (१० नोव्हेंबर २०२१)
- भेटूया केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी यांच्या गृहमंत्री पत्नीला. (१२ नोव्हेंबर २०२१)
- स्वप्नील-लीनाची 'प्यारवाली लव्हस्टोरी' होम मिनिस्टरमध्ये. (१५ नोव्हेंबर २०२१)
- तार सप्तकामधून नभाला भिडणारा डॉक्टर चंदनशिवे यांचा आवाज संसारात कसा असतो? (१७ नोव्हेंबर २०२१)
- रंगणार अशोक हांडे यांच्या संसाराची मंगलगाणी. (१९ नोव्हेंबर २०२१)
- हास्याचा सम्राट कवी अशोक नायगावकर येणार होम मिनिस्टरमध्ये. (२२ नोव्हेंबर २०२१)
- संझगिरी वहिनींच्या हातच्या चवीसमोर सचिन तेंडुलकरसुद्धा होतो क्लीन बोल्ड. (२४ नोव्हेंबर २०२१)
- जे करतात बाहुल्यांनाही बोलकं, त्या रामदास पाध्येंचा संसार किती असेल बोलका? (२६ नोव्हेंबर २०२१)
- भेटूया पद्मश्री वामन केंद्रे कुटुंबाच्या केंद्रबिंदू गौरी वहिनींना. (२९ नोव्हेंबर २०२१)
- विजू मानेच्या संसाराची पटकथा नेमकी आहे कोणाच्या हातात? (२७ जून २०२२)
- वेगवेगळ्या मंडळांचा, चॅटिंगच्या ग्रुपचा भावोजींसोबत रंगणार खेळ सख्यांचा, चारचौघींचा. (१५ जानेवारी २०२३)
- आता पैठणीचा खेळ खेळा अर्धा तास आधी. (८ मे २०२३)
- पैठणीचा खेळ आता नवीन वेळेत रंगणार. (१५ जानेवारी २०२४)
- स्वामींच्या आशीर्वादाने पार पडणार पारू विशेष भाग. (२७ मे २०२४)
संदर्भ
बाह्य दुवे