हेरंब कुलकर्णी
हेरंब कुलकर्णी हे एक मराठी लेखक आहेत. तॆ वैचारिक आणि विशेषतः शिक्षणविषयक लेखन करतात. ते वात्रटिकाही करतात. हेरंब कुलकर्णी हे इ.स. २००६ च्या वर्षभरात साधना साप्ताहिकाच्या संपादक मंडळात होते.
दारूबंदीसाठी चाललेल्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग आहे. या लढ्याला अभ्यासातून धोरणात्मक पाया देण्याचे काम ते करत आहेत.[१]
हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके[२]
- आमच्या शिक्षणाचं काय?
- कॉमन मॅन (कविता संग्रह)
- जे. कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स
- परीक्षेला पर्याय काय ?
- बखर शिक्षणाची
- शाळा आहे - शिक्षण नाही !
- सहावा वेतन आयोग काय खरे ? काय खोटे?