Jump to content

हेमगर्भ

हेमगर्भ : हेम-सोने, गर्भ-पोट. ज्या मातेच्या पोटात सोने आहे ती. पारा ४ सोने १ या दोहोंच्या १/१२ गंधक एकजीव खलून, रेशमी फडक्यात पुरुचुंडीसारखे बांधून, लोखंडी वाटीत ती ठेवून पाऱ्याइतकाच तीत गंधक घालून भूधर यंत्रात तिचे पचन करावे. दोनदा पचन केल्याने मिश्रण उपयोगार्ह होते किंवा गंधकात तळल्यानेही वापरासाठी तयार होते.

प्राधान्याने मरणकाल जवळ आला असता नाडी सुटत आली, थंड घाम येऊ लागला, शरीर थंड पडत चालले अशा अंतकाळी ही मात्रा आल्यात उगाळून मध घालून चाटवतात. पुष्कळवेळा शरीरात उष्णता उत्पन्न होते, हृदयाला शक्ती येऊन नाडी सुधारते व मृत्युचे संकट टळते. क्षयादी सर्व रोगांवर ही उपयुक्त असते.

या मात्रेकरिता द्यावयाचा पारा अष्टसंस्कार (स्वेदन, मर्दन, मूर्च्छन, पातन, रोधन, नियमन, दिपन व उत्थापन) केलेला असणेच योग्यआहे. पाऱ्याचा विषारीपणा कमी करण्यासाठी त्यावर संस्कार करणे आवश्यक असते.[]

संदर्भ