हॅपी न्यू इयर
हॅपी न्यू इयर | |
---|---|
दिग्दर्शन | फराह खान |
निर्मिती | गौरी खान |
कथा | फराह खान |
प्रमुख कलाकार | शाहरुख खान दीपिका पडुकोण सोनू सूद अभिषेक बच्चन बोम्मन इराणी विवान शाह |
संगीत | विशाल-शेखर |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २४ ऑक्टोबर २०१४ |
वितरक | यश राज फिल्म्स |
निर्मिती खर्च | १५० कोटी |
एकूण उत्पन्न | ३०० कोटी |
हॅपी न्यू इयर हा २०१४ साली एक हिंदी चित्रपट आहे. फराह खानने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान, दीपिका पडुकोण, सोनू सूद, अभिषेक बच्चन, बोम्मन इराणी, विवान शाह व जॅकी श्रॉफ ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मैं हूं ना व ओम शांती ओम नंतर हा फराह खान दिग्दर्शित व शाहरुख खानची भूमिका असलेला तिसरा चित्रपट आहे.
दुबईच्या अटलांटिस ह्या प्रतिष्ठित हॉटेलमध्ये प्रामुख्याने चित्रित करण्यात आलेला हॅपी न्यू इयर २४ ऑक्टोबर २०१४ रोजी दिवाळीदरम्यान प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ह्या चित्रपटाने भारतात ४० कोटी रुपयांची कमाई केली.
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील हॅपी न्यू इयर चे पान (इंग्लिश मजकूर)
- संकेतस्थळ Archived 2023-06-06 at the Wayback Machine.