हॅड्रॉन
[१]कण भौतिकशास्त्रामध्ये (Particle Physicsमध्ये), एक हॅड्रॉन म्हणजे मजबूत शक्तीने एकत्रितपणे दोन किंवा अधिक क्वार्क्सचा बनलेला एक संयुक्त कण. हॅड्रॉनचे दोन गटांमध्ये वर्गीकरण केले जाते. (१) बेरियाॅन्स म्हणजे विषम संख्येच्या क्वार्क्सपासून बनलेले-सामान्यत: तीन क्वार्क्सपासून. आणि (२) मेसॉन्स, सम संख्येच्या क्वार्क्सने बनलेले-सामान्यत: एक क्वार्क आणि एक अँटिक्वार्कपासून. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ही बॅरियॉनची उदाहरणे आहेत; तर पायन्स हे मेसाॅनचे उदाहरण आहे.
यांशिवाय, तीनपेक्षा जास्त व्हॅलेन्स क्वार्क्स असलेले "एक्झॉटिक" हॅड्रॉनही सापडले आहेत.