Jump to content

हुतात्मा उमाजी नाईक हायस्कूल भिवडी

I.B.T.उपक्रम सुरू करताना विद्यार्थ्यांचा सर्वांगिक विकास व्हावा यासाठी अनेक विविध उपक्रम शालेय पातळीवर योजले जातात.परंतु त्याचबरोबर मुलभूत तंत्रज्ञानाची (v१)विषयामध्ये विध्यार्थ्यांना बौद्धिक कौशल्याबरोबरच व्यावहारिक कौशल्याचे शिक्षण मिळते.

विद्यार्थांना होणारे I.B.Tचे फायदे

हा अभ्यासक्रम बहुविध कौशल्याचा असल्याने विध्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील करिअरची दिशा निवडण्यासाठी मदत होते. अनेक कौश्यल्यांची ओळख झाल्याने तो त्याच्या आवडीचे एक क्षेत्र निवडू शकतो. महत्त्वाचे म्हणजे विविध अनुभव मिळाल्याने विध्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळते. विविध शाखांचे ज्ञान मिळाल्याने त्याला विविध मुलभूत तत्त्वे व त्यांचे महत्त्व याची ओळख होते. प्रत्यक्ष व्यवहारात काम करताना आपल्याला अनेक कौशल्याचा वापर करावा लागतो . उदा. शेतकऱ्याला शेतीच्या ज्ञानाबरोबर वीज , मोटार पंप, खाद्य संरक्षण व प्रक्रिया , पशु वैद्यकीय ज्ञान लागते. त्यामुळे अडचणीच्या वेळी तो मार्ग काढू शकतो. एखाद्या फॅब्रिकेशन व्यवसायिकाला जर पोल्ट्री बांधण्याचे काम मिळाले तर त्याला पोल्ट्रीचे मुलभूत ज्ञान हे फायद्याचे ठरू शकते, तो गिऱ्हाईकाला अधिक चांगली सेवा देऊ शकतो , अशा प्रकारचा आंतरशाखीय दृष्टीकोन विकसित होतो.