हीना गावित
डॉ. हीना गावित ह्या एक भारतीय राजकारणी आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सदस्य असलेल्या गावित ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये नंदुरबार मतदारसंघामधून काँग्रेसचे विद्यमान खासदार माणिकराव गावित ह्यांचा १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.
२६ वर्षे वय असलेल्या व पेशाने वैद्यकीय डॉक्टर असणाऱ्या गावित ह्या १६व्या लोकसभेमधील सर्वात तरुण खासदार होत्या.