Jump to content

हिरोजी फर्जंद

हिरोजी फर्जंद हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरदार होते. शिवरायांची आग्र्याहून सुटका झाली तेव्हा हिरोजी फर्जंद महाराजांच्या जागी झोपले होते. नंतरच्या काळात शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर अनाजी दत्तो यांच्या सांगण्यावरून संभाजी राजांच्या विरुद्ध कट कारस्थाने केल्याचा इतिहासात उल्लेख आहे. त्यावरूनच संभाजी महाराजांनी त्यांना शिक्षा केली होती. फर्जंदचा मुळ खरा अर्थ. फर्जंदचा सरळ सोपा अर्थ आहे जो फर्ज अदा करतो तो निभवतो असा. आजही फर्ज या शब्दाचा अर्थ कर्तव्य किवा बंधन असाच होतो. शिवकाळात पारशी भाषा प्रचारात होती आणि पारसी मधूनच हा शब्द आला ज्यांनी फर्ज निभावले असे आहेत ते सर्व फर्जंद. हिरोजीनी आग्र्याहून सुटका होताना निभावलेला फर्ज असो की कोंढाजीनी मुठभर मावळे घेऊन पन्हाळा घेतला तो फर्ज. थोडक्यात काय तर ज्यांनी निष्ठेने कर्तव्य पालन केल्याने (फर्ज) पड़नाव कीवा पदनाम मिळाले ते फर्जंद.