Jump to content

हिरवी मनोली (पक्षी)

हिरवी मनोली (इंग्लिश:Green Munia) हा एक पक्षी आहे.


हिरवी मनोली आकाराने चिमणीपेक्षा लहान असते.परंतु दिसायला लाल मनोलीसारखी असते .मात्र वरील भागाचा रंग हिरवा. व खालील भागाचा रंग पिवळा असतो.खुब्यावर हिरवट तपकिरी आणि पांढरे पट्टे असतातव शेपटी काळी असते.मादी दिसायला नरासारखी असते.मात्र ती अधिक पिवळसर असते.

वितरण

हिरवी मनोली स्थायिक स्थलांतर करणारा पक्षी आहे.अबूच्या पहाडापासून ग्वाल्हेर,झाशी,सुरगुजा,यांच्या सीमारेषा असलेला मध्यभारत व दक्षिणेकडे महाबळेश्वर या भगत दिसून येतो.

हिरवी मनोली

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली