हिमालयीन एव्हिएशन
स्थापना | १९४५ |
---|---|
बंद | १९५३ इंडियन एअरलाइन्स मध्ये विलीन |
मुख्यालय | कोलकाता, भारत |
हिमालयीन एव्हिएशन ही भारतातील एक विमान कंपनी होती जी राष्ट्रीयकरण होईपर्यंत भारतीय उपखंडातील उत्तरेकडील भागात कार्यरत होती आणि १९५३ मध्ये इंडियन एरलाइन्स कंपनीत विलीन झाली.
घटना
- २० फेब्रुवारी १९५० रोजी हिमालयन एव्हिएशन ने नेपाळहून गौचर (नेपाळ) ते कलकत्ता (सध्या कोलकाता) (भारत) पर्यंतची पहिली आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा सुरू केले.[१]
- ७ डिसेंबर १९५१ रोजी कराचीच्या स्टॉपओव्हर पॉईंटवर पाकिस्तानने अहमदाबादहून काबुल, अफगाणिस्तानकडे जाणाऱ्या हिमालयन एव्हिएशनच्या विमानाला स्थानबद्ध केले. पाकिस्तानने यापूर्वी उत्तर-पश्चिम फ्रंटियर प्रांत ओलांडणाऱ्या दिल्ली-काबुल थेट हवाई मार्गाचा वापर नाकारला होता. भारत आणि पाकिस्तानने पर्यायी अहमदाबाद-कराची- जाहेदान (इराण)-काबूल हा मार्ग ठरविला होता.[२]
सेवा
हिमालयीन एव्हिएशनची सनदी (चार्टर्ड) उड्डाणसेवे पासून सुरुवात झाली.[३] कालांतराने, ही सेवा नाईट-मेल सेवा आणि अनुसूचित प्रवासी उड्डाणां मध्ये विस्तारित झाले. जास्तीत जास्त महसूल मिळविण्यासाठी, त्यांनी त्यांच्या रात्रीच्या विमानातील उड्डाणांवरही प्रवाश्यांना नेण्यास सुरुवात केली.[४]
ताफा
ताफ्यात बहुधा डग्लस डीसी ३ विमानांचा समावेश होता.
संदर्भ
- ^ COVER STORY (Spotlight Weekly), 14th Dec. 2001
- ^ "Miscellaneous : dated 7 December 1951: Pak. halts Indian plane to Kabul". The Hindu. 7 December 2001. 26 July 2018 रोजी पाहिले.
- ^ Roy R. Roadcap (1992). World Airline Record. Roy R. Roadcap & Associates.
- ^ Kalka Prasad Bhatnagar (1951). Transport in Modern India. Kishore Publishing House, Kanpur.