हिप्पोचा ऑगस्टीन
हिप्पोचा ऑगस्टीन Augustine of Hippo | |
---|---|
जन्म | नोव्हेंबर ३, इ.स. ३५४ अल्जीरिया |
मृत्यू | ऑगस्ट २८, इ.स. ४३० हिप्पो रेजियस, अल्जीरिया |
कारकिर्दीचा काळ | प्राचीन युग |
हिप्पोचा ऑगस्टीन, सेंट ऑगस्टीन, सेंट ऑस्टिन (इंग्लिश: Augustine of Hippo; नोव्हेंबर ३, इ.स. ३५४ - ऑगस्ट २८, इ.स. ४३०) हा उत्तर आफ्रिकेच्या हिप्पो रेजियस प्रदेशातील (आजचा अल्जीरिया) एक रोमन कॅथलिक संत, धर्मगुरू, तत्त्ववेत्ता, शिक्षक व विद्वान होता. त्याच्या लिखाणांचा कॅथलिक धर्मावर मोठा प्रभाव पडला. तसेच मध्य युगातील थॉमस अॅक्विनास ह्या कॅथलिक संतावर देखील ऑगस्टीनच्या विचारांचा पगडा जाणवतो.