हिंदू देवांची वाहने
हिंदुधर्मात ३३ कोटी देव मानले गेले आहेत. काहींच्या मते ३३ कोटी म्हणजे ३३ प्रकारचे देव. या ३३ कोटी देवांपैकी बहुसंख्य देव इकडून तिकडे हिंडत नसले तरी या देवांना स्वतःची वाहने आहेत. इतर प्राण्यांसह गाढव, खेकडा, विंचू, घोरपड, शेळी ही देखील काही देवतांची वाहने आहेत. खालील यादीत यांपैकी काही देवांची वाहने दिली आहेत.
- अग्नी - बकरा
- इंद्र - ऐरावत (आठ सोंडा असलेला हत्ती); उच्चैःश्रवा नावाच्या घोड्याने ओढलेला रथ
- इंद्राणी (सप्तमातृकांतील एक) - हत्ती
- इक्षुमती - मगर
- कामदेव - पोपट
- कामाख्या - साप
- कार्तिकस्वामी - मोर
- कुबेर - मनुष्य
- केतू - गिधाड
- कौमारी (सप्तमातृकांतील एक) - मोर
- गंगा - मगर
- गणपती - उंदीर(मूषक)
- चामुंडा (सप्तमातृकांतील एक) - प्रेत; किंवा शृगाल, कुत्रा वा घुबड.
- तारिणी देवी - बदक
- दुर्गा - वाघ; सिंह; हत्ती
- नर्मदा - मगर
- पार्वती - शिवाजवळ असताना कमळ; स्वतंत्र मूर्तीत असताना गोधा (घोरपड) (आधार - ‘रूपमंडन’ ग्रंथ)
- बहुचरा देवी - कोंबडा
- ब्रह्मदेव - हंस
- ब्राह्मी (सप्तमातृकांतील एक) - हंस
- भ्रामरंबा - कीटक
- भल्लुका - अस्वल (भल्लुक म्हणजे अस्वल!)
- माहेश्वरी ((सप्तमातृकांतील एक) - बैल
- यम - रेडा
- यमुना - कासव
- योगिनी कारकरी - खेकडा
- योगिनी गौरी - घोरपड
- योगिनी जलकामिनी - बेडूक
- रती - कबुतर
- रुद्रकाली देवी - कावळा
- रेणुका देवी - सिंह
- लक्ष्मी - कमळ, घुबड, पांढरा हत्ती
- वरुण - सुसर
- वायु - हरीण
- वाराही (सप्तमातृकांतील एक) - रेडा, क्वचित वराह (डुक्कर)
- विष्णू - गरुड
- वैष्णवी (सप्तमातृकांतील एक) - गरुड
- शंकर - नंदी (बैल)
- शनिदेव - कावळा
- शीतलादेवी - गाढव
- सरस्वती - हंस किंवा मोर
- सरस्वती नदी - कमळ
- सूर्य - सात घोड्यांचा रथ
देवांनी पाळलेले प्राणी
- कुबेर - मुंगूस
- दत्त - गाय आणि चार कुत्री
- धन्वंतरी - जळू
- भैरव - कुत्रा
देवांची आयुधे
- इंद्र - वज्र
- श्रीकृष्ण - सुदर्शन चक्र
- खंडोबा - खंडा
- दुर्गा ( महिषासुरमर्दिनी) - अंकुश, अक्षमाळा, चक्र, ढाल, तलवार, त्रिशूळ, दंड, धनुष्य, पद्म, परशू., बाण, मुंड, शंख.,
- परशुराम - परशू
- बलराम - नांगर
- ब्रह्मदेव - ब्रह्मास्त्र
- मारुती - गदा
- राम - धनुष्यबाण
- विष्णू - शंख, चक्र, गदा
- शंकर - तिसरा डोळा, त्रिशूळ