Jump to content

हिंदू तत्त्वज्ञान


हे पान अनाथ आहे.
जानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.


भारतीय उपखंडाच्या इतिहासात वैदिक संस्कृतीच्या स्थापनेनंतर दोन सहस्र वर्षांच्या काळातील धार्मिक व तात्त्वज्ञानिक विचारांच्या विकासानंतर आस्तिक हिंदू तत्त्वज्ञानाचे सहा विचारप्रवाह अस्तित्वात आले. हे सहा विचारप्रवाह नंतर हिंदू धर्माचे आधारस्तंभ बनले.

दर्शने

ज्या शास्त्राच्या योगे लौकिक व अलौकिक तत्त्वांचे यथार्थ ज्ञान होते त्याला दर्शन असे म्हणले जाते. दर्शन या शब्दाचा संबंध आत्मविद्येशी आहे.

  • हिंदू तत्त्वज्ञानाच्या या सहा विचारप्रवाहांना "दर्शने" असे म्हणतात. ती खालीलप्रमाणे आहेत :

सांख्य

सांख्य दर्शनाचे रचयिता कपिल मुनी आहेत. यामध्ये सत्कार्यवाद याचे विश्लेषण केले आहे. सत्याची निर्मिती ही सत्यातूनच होते. सांख्य दर्शनात सृष्टिरचना आणि संहार क्रमाला विशेष स्थान आहे. या दर्शना मध्ये पुरुष व प्रकृतीला मानले गेले आहे. प्रकृती सर्व पदार्थांचे कारण आहे, परंतु प्रकृतीला कोणतेही कारण नाही. पुरुष एक चेतन तत्त्व आहे, तर प्रकृती अचेतन आहे. पुरुष हा प्रकृतीचा भोक्ता आहे. प्रकृती स्वतः भोक्ती नाही.

योग

या दर्शनाचे रचयिता महर्षी पतंजली आहेत. पातंजल योगसूत्र मध्ये ईश्वर जीवात्मा आणि प्रकृती यांच्या स्पष्ट रूपाचे वर्णन केले आहे. याव्यतिरिक्त योग म्हणजे काय? जीव बंधनाचे काय कारण आहे? योगिक क्रिया कोणत्या? या सर्वांचे वर्णनही केले गेले आहे. परमात्म्याचे ध्यान हे आंतरिक आहे, तर इंद्रिये ही बहिर्गामी आहेत. जोपर्यंत आपली इंद्रिये अंतर्गामी होत नाहीत तोपर्यंत ध्यान अवस्था साध्य होत नाही. त्यासाठी परमात्म्याचे मुख्य नाव म्हणजे प्रणव जप करून किंवा इतर नामातून परमात्म्याची स्तुती करणे, उपासना करून आनंदी जीवन व्यतीत करण्याचे उपाय सांगितले आहेत.

न्याय

वैशेषिक

पूर्वमीमांसा

उत्तरमीमांसा (वेदान्त)

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  • भारतीय संस्कृती कोश खंड ४

बाह्य दुवे