हिंदुस्तान
हिंदुस्थान (इंग्लिश: Hindustan, Hindi: हिन्दोस्ताँ, हिन्दुस्तान, Urdu: ہندوستان,) हा शब्द सिंधुस्थान या शब्दाचा अपभ्रंश आहे. हिंदुस्थान हे भारताचे चिरपरिचित असे नाव आहे. भारत देशाला हिंद असेही म्हणतात. देशाच्या इतर नावांसाठी पहा :
एक स्थान अनेक नावे.
व्युत्पत्ति
इ.स.पू. ३०० सालच्या सुमारास इराणचा सम्राट दरायस याने सिंधू नदी (इंडस्)च्या काठी वसलेल्या समाजव्यवस्थेला सिंधु संस्कृती या नावाने पुकारण्यास सुरुवात केली. याच सिंधु शब्दाचा अपभ्रंश होऊन हिंदू हा शब्द उदयास आला व सिंधू नदीपलीकडील भूमी म्हणून त्या प्रदेशाला हिंदुस्तान असे संबोधले जाऊ लागले. मोगलांच्या शासनकाळामधे हा शब्द जास्त प्रचलित झाल. मोगलांच्या दिल्ली हे केंद्र (राजधानी?) असलेल्या अधिराज्याचा, म्हणजे उत्तरी भारताच्या विशाल प्रदेशाचा नामोल्लेख हिंदुस्तान असा केला जाई. हिंदुस्तान या शब्दावरून त्या प्रदेशातील वैदिक धर्माला हिंदू धर्म हे नाव पडले.
- पुनर्निर्देशन दक्षिण आशिया