हिंदु सेल्व्स इन अ मॉडर्न वर्ल्ड (पुस्तक)
हिंदू सेल्व्स इन अ मॉर्डन वर्ल्ड: गुरू फेथ इन द माता अमरीतानंदमयी मिशन[१] हे माया वारियर[२] द्वारे लिखित व रुतलेज कर्झन साउथ एशियन रीलीजियस सिरीज प्रकाशनाद्वारे २००४ मध्ये प्रकाशित पुस्तक आहे. या पुस्तकात माता अमरीतानंदमयी मिशन (MAM)[३] याच्या अभ्यासाद्वारे लेखिका एका बाजूला हिंदुत्वामधील अलीकडील व नाटयमय रूपात 'अवतार गुरू' या विकासावर भाष्य करते व त्याद्वारे समकालीन विश्वातील घडणाऱ्या घटनांचा परामर्श घेऊ पाहते.
माता अमरितानंदमयी मिशन
माता अमरितानंदमयी मिशन ही माता अमरितानंदमयी ज्यांना जनमानसात 'अम्मा'[४] या नावाने संबोधले जाते, द्वारे चालवली जाणारी गुरूच्या श्रद्धेवर आधारित संस्था आहे. 'अम्मा' या मुळच्या केरळातील असून खालच्या जातीतील आहेत. आज घडीला त्यांच्याकडे शहरी मध्यम वर्गीय भारतीय मोठ्या प्रमाणात आकर्षिले गेलेले आहेत. तसेच त्यांचे आंतरराष्ट्रीय अनुयायी सुद्धा आहेत.
मुख्य युक्तिवाद
आधुनिकता या पुस्तकातील मुख्य विषय आहे. माया वारियरच्या मते 'अवतार गुरूंचे' उदय हे पर्यायी आधुनिकतेचा एक प्रकार आहे. या पुस्तकात त्या सदरच्या गुरू परंपरेत 'आधुनिकता' व 'आधुनिक स्व' सोबत कसा संवाद साधला जातो हे उलगडून दाखवतात.
योगदान
स्टीफेन जेकॉब आपल्या आध्व्यात या पुस्तकाला माता अमरितानंदमयी मिशन वरील 'आकर्षक अभ्यास' म्हणून संबोधतात.[५]
संदर्भ सुची
- ^ ISBN-10: 041533988X
- ^ "संग्रहित प्रत". 2016-07-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-04-28 रोजी पाहिले.
- ^ http://www.amritapuri.org/
- ^ http://www.amritapuri.org/
- ^ Jacobs, S. (2008). Book Review. Fieldwork in Religion , Equinox Publishing Ltd.( ISSN 1743-0623)