Jump to content

हिंडेनबर्ग रिसर्च

Hindenburg Research (it); হিন্ডেনবার্গ রিসার্চ (bn); Hindenburg Research (fr); Hindenburg Research (da); हिंडनबर्ग रिसर्च (hi); हिन्डनबर्ग अनुसन्धान (ne); ਹਿੰਡਨਬਰਗ ਰਿਸਰਚ (pa); हिंडेनबर्ग रिसर्च (mr); Hindenburg Research (de); Hindenburg Research (pt); Hindenburg Research (en); بحوث هيندنبورغ (ar); 興登堡研究 (zh); இண்டன்பர்க் ரிசர்ச் (ta) Short-selling activist firm that publishes reports alleging fraud (en); société d'investissement américaine spécialisée dans les ventes à découvert (fr); amerikansk analysefirma (da); Short-selling activist firm that publishes reports alleging fraud (en); شركة (ar); अमेरिकी निवेश शोध फर्म (hi); நிறுவனங்களின் மோசடிகளைக் கண்டறிந்து குற்றம் சாட்டி அறிக்கைகளை வெளியிடும் நிறுவனம் (ta) Hindenburg Report, Hindenburg Report LLC (en); 興登堡研究公司 (zh); ஹிண்டன்பர்க் ரிசர்ச், ஹிண்டன்பர்க் அறிக்கை, இண்டன்பர்க் அறிக்கை (ta)
हिंडेनबर्ग रिसर्च 
Short-selling activist firm that publishes reports alleging fraud
 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारकंपनी
स्थान अमेरिकेची संयुक्त संस्थाने
संस्थापक
  • Nathan Anderson
स्थापना
  • इ.स. २०१७
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

हिंडेनबर्ग रिसर्च एलएलसी (नामभेद: हिंडनबर्ग) : ही एक न्यू यॉर्क शहरातील गुंतवणूक संशोधन संस्था आहे. हिची स्थापना २०१७ साली अमेरिकन नागरिक नाथन अँडरसन यांनी केली असून, ही संस्था विविध कंपन्यांच्या शॉर्ट-सेलिंगवर लक्ष केंद्रित करते.[][][] १९३७ च्या हिंडेनबर्ग दुर्घटनेरून या संस्थेचे नाव ठेवण्यात आले आहे. ही दुर्घटना मानवनिर्मित असून टाळता येण्याजोगे होती.[] हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी दीर्घ अभ्यास करून तिच्या वेबसाइटद्वारे असा सार्वजनिक अहवाल तयार करत असते, ज्यात कॉर्पोरेट घोटाळा आणि गैरप्रकार केल्याचा आरोप असतो.[] इ.स. २०२३ पर्यंत अदानी उद्योगसमूह, निकोला,[] क्लोव्हर हेल्थ,[] कांडी,[] आणि लॉर्डस्टाउन मोटर्स सह तब्बल सोळा कंपन्या त्यांच्या अहवालाचा शिकार ठरल्या आहेत.[] या अहवालांमध्ये सदरील कंपन्यांच्या शॉर्ट-सेलिंगच्या पद्धतीचा बचाव आणि गुंतवणूकदारांचे संरक्षण यावर देखील विश्लेषण केले जाते.[१०] हा अहवाल काही ठोस अभ्यासावर आधारित असतो, ज्यात (अ)शेअर मार्केटमध्ये काही आर्थिक गैरव्यवहार होत आहे का? (ब) मोठ्या कंपन्या आपल्या स्वतःच्या फायद्याकरता कंपनीच्या खात्यात चुकीच्या नोंदी किंवा गफलत करत आहेत का? (क) एखादी कंपनी स्वतःच्या फायद्याकरता शेअर मार्केटमध्ये चुकीच्या दुसऱ्या कंपन्यांच्या शेअर्सची पूर्वनियोजित बोली लावून कोणाचे हेतुपुरस्सर नुकसान तर करत नाही ना? अशाप्रकारे संशोधन पूर्ण केल्यानंतर 'हिंडेनबर्ग रिसर्च' कंपनी सविस्तर अहवाल प्रसिद्ध करते. अनेक प्रसंगी या कंपनीच्या अहवालाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर दिसून आला आहे.[११]

कर्यशैली

हिंडेनबर्ग रिसर्च ही आपल्या लक्ष्यित कंपनीचा तपास अहवाल सहा किंवा अधिक महिन्यांत तयार करते. यासाठी ही कंपनी सदरील कंपन्यांच्या सार्वजनिक नोंदी, अंतर्गत कॉर्पोरेट दस्तऐवज तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांशी बोलून त्याचे विश्लेषण करते. त्यानंतर हा अहवाल हिंडेनबर्गच्या मर्यादित भागीदारांना प्रसारित केला जातो, जे हिंडेनबर्गसह एकत्रितपणे लक्ष्य कंपनीमध्ये शॉर्ट लिस्टेड असतात. लक्ष्य कंपनीच्या शेअरची किंमत कमी झाल्यानंतर हिंडेनबर्ग आपला नफा कमावते.[१२][१३]

काही उल्लेखनीय संशोधन

निकोला अहवाल

सप्टेंबर २०२० मध्ये, हिंडनबर्ग रिसर्चने निकोला कॉर्पोरेशनवर एक अहवाल प्रकाशित केला होता. ज्यामध्ये कंपनी डझनभर खोट्या गोष्टींवर आधारित एक गुंतागुंतीची फसवणूक करत असल्याचा आरोप केला होता. तसेच या अहवालात असा युक्तिवाद केला होता की त्याचे संस्थापक, ट्रेवर मिल्टन हे यासाठी जबाबदार होते.[] हा अहवाल प्रकाशित होताच, निकोलाचा स्टॉक तब्बल ४०% ने घसरला.[] त्यानंतर युनायटेड स्टेट्स फेडरल सरकारची एक स्वतंत्र एजन्सी असलेल्या 'सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (SEC)' मार्फत निकोला कॉर्पोरेशन चौकशी सुरू झाली.[१४] मिल्टनने सुरुवातीला हे आरोप नाकारले,[१४] परंतु नंतर कार्यकारी अध्यक्ष म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला.[१५] शेवटी यात मिल्टन या चौकशीत दोषी आढळले.[१६] नोव्हेंबर २०२० मध्ये, निकोला तर्फे असे म्हटल्या गेले की "हिंडेनबर्ग अहवालाशी संबंधित नियामक आणि कायदेशीर बाबींचा परिणाम म्हणून त्यांना मोठा खर्च आला आहे."[]

क्लोव्हर हेल्थ रिपोर्ट आणि चामथ पालिहापिटिया

हिंडेनबर्गने फेब्रुवारी २०२१ मध्ये मेडिकेअर ॲडव्हांटेज प्लॅन क्लोव्हर हेल्थ बद्दल एक अहवाल प्रसिद्ध केला, ज्यात असा दावा केला होता की कंपनीने न्याय विभागाची चौकशी सुरू असल्याची माहिती गुंतवणूकदारांना देण्याचे टाळले. या अहवालात हिंडेनबर्ग द्वारे असा दावा देखील करण्यात आला होता की अब्जाधीश स्टॉक-प्रवर्तक आणि उद्योजक चमथ पलिहपिटिया यांनी योग्यते परिश्रम न घेता गुंतवणूकदारांची दिशाभूल केली.[] हिंडेनबर्गने खुलासा केला की क्लोव्हरमध्ये त्यांचे कोणत्याही प्रकारचे छोटे-मोठे हितसंबंध गुंतलेले नाहीत ज्यामुळे त्यांचा काही फायदा होईल.[१७] या अहवालाच्या प्रकाशनानंतर, क्लोव्हर हेल्थने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आणि SEC कडून नोटीस मिळाल्याचे देखील सांगितले.[१८]

अदानी समूहाचा अहवाल

जानेवारी २०२३ मध्ये, हिंडेनबर्गने एक असा अहवाल तयार केला की, भारताच्या अदानी समुहामध्ये त्यांचे शेअर्स आणि काही अधिकार असून त्याद्वारे अदानी कंपनीच्या कर्ज आणि लेखाअहवालात काही अफरातफर असल्याचे माहीत झाले आहे. या अहवालात असा देखील दावा केला आहे की भारतीय अदानी समूह "दशकांच्या कालावधीत निर्लज्ज स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फसवणूक योजनेत गुंतला आहे".[१९] हिंडेनबर्गने आपल्या अहवालात अदानी कंपनीबाबत पुढील तीन प्रमख मोठे आरोप केले आहेत.

  • पहिला आरोप: अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांची किंमत त्याच क्षेत्रात काम करणाऱ्या दुसरी कंपन्यांच्या तुलनेत ८५% जास्त आहे. मुळात, समभाग म्हणजेच शेअरची किंमत त्या कंपनीने मिळवलेल्या नफ्यावरून ठरवली जात असते. कोणत्याही कंपनीच्या नफ्याच्या तुलनेत त्या कंपनीच्या समभागांची किंमत किती असेल याचा अंदाज शेअर बाजार लावत असतो, ज्याला प्राइस अर्निंग रेशो असे म्हणतात. इथे अदानी समूहाच्या कंपन्यांचे प्राइस अर्निंग रेशो इतर कंपन्यांच्या तुलनेने अती आहेत.[११]
  • दुसरा आरोप : अदानी समूहाने शेअर मार्केट मध्ये अफरातफर करून स्वतःच्या कंपनीच्या समभागांचे मूल्य वाढवले आहे. अदानी यांनी प्रथम मॉरिशस आणि इतर काही देशांच्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले. त्यानंतर या कंपन्यांनी अदानी समूहाच्या कंपन्यांचे समभाग विकत घेतले. यामुळे अदानी समूहाच्या समभागांची मागणी वाढली आणि पर्यायाने किंमत देखील वाढली. गौतम अदानी यांचा विनोद अदानी नावाचा एक भाऊ दुबईत असून तो हे काम करतो. हिंडेनबर्ग अहवालात विनोद अदानीशी संबंधित ३८ कंपन्यांचा देखील उल्लेख केला गेला आहे.[११]
  • तिसरा आरोप: अदानी समूहावर २.२० लक्ष कोटींपेक्षा जास्तीचे कर्ज असून समूहाने आपल्या क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेतले आहे. येथे अदानी समूहाच्या बहुतांश कंपन्यांनी आपले समभाग गहाण ठेवून कर्ज घेतलेले आहे. गौतम अदानी यांनी यापूर्वी एसीसी सिमेंट, अंबुजा सिमेंट व इतर कंपन्यांच्या खरेदीसाठी कर्ज घेतलेले असून आता बँकांकडे अदानींच्या समाभगाशिवय वसुली करण्यासाठी इतर काहीही पर्याय नाही.[११]

हा अहवाल जाहीर झाल्यानंतर लगेचच, अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांच्या किमतीत मोठी आणि वेगवान घसरण झाली.[२०][२१][२२] यामुळे गौतम अदानी, जे जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तीपैकी एक होते, ते काहीकाळ ७.५ लाख कोटी रुपये गमावल्याने पहिल्या २० मध्ये देखील राहिले नाही.[२३] परंतु काही काळात अदानी समूहाच्या समभागांची किंमत परत एकदा वाढली. याच सोबत अदानी समूहाची चौकशी करण्याची मागणी भारतातील सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली. या केसची सुरुवात १० फेब्रुवारी रोजी भारताचे सरन्यायाधीश जस्टिस धनंजय चंद्रचूड यांच्या समक्ष झाली.[२४]

इतर अहवाल आणि कार्य

हिंडेनबर्गने ऑनलाइन बेटिंग ऑपरेटर ड्राफ्टकिंग्ज,[२५] जिओथर्मल पॉवर प्लांट्स कंपनी ओरमॅट टेक्नॉलॉजीज,[२६] इलेक्ट्रिक कार कंपनी मुलेन टेक्नॉलॉजीज,[२७] आणि SOS नावाची चीनी ब्लॉकचेन आणि क्रिप्टोमाइनिंग फर्म याविषयी देखील क्रमशः अहवाल जारी केले आहेत.[२८]

ऑक्‍टोबर २०२१ मध्ये, हिंडनबर्गने टेथर क्रिप्टोकरन्सी प्रत्यक्षात अमेरिकन डॉलरमध्ये कशी पाचार मारते याबद्दल आणि टेथरच्या ठेवींच्या माहितीसाठी $1 दशलक्ष बक्षीस जाहीर केले होते.[२९] हिंडेनबर्गने तेव्हा असा खुलासा केला होता की, त्या वेळी, त्यांच्याकडे कोणत्याही क्रिप्टोकरन्सीमध्ये फायदा होईल असे कोणतेही हितसंबंध नव्हते.[३०]

मे २०२२ मध्ये, इलॉन मस्कने ट्विटर च्या अधिग्रहणाच्या घोषणेनंतर हिंडेनबर्गने ट्विटरचा एक लहान भाग विकत घेतला. मस्कने करार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर, हिंडेनबर्गने मस्कच्या विरोधात ट्विटर सट्टेबाजीमध्ये महत्त्वपूर्ण स्थान घेतले.[]

संदर्भ

  1. ^ a b c "Little Big Shorts: How tiny 'activist' firms became sheriffs in the stock market's Wild West". Fortune (इंग्रजी भाषेत). 2021-02-07 रोजी पाहिले.
  2. ^ a b Mandl, Carolina (27 January 2023). "Explainer: Who is behind Hindenburg, the company that is shorting Adani?". Reuters.
  3. ^ Ludlow, Edward; Burton, Katherine (26 January 2023). "Hindenburg vs Adani: The Short Seller Taking on Asia's Richest Person". Bloomberg.com (इंग्रजी भाषेत). 26 January 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "About us". hindenburgresearch.com (इंग्रजी भाषेत). 25 March 2021 रोजी पाहिले. We view LZ 129 Hindenburg, the Hindenburg as the epitome of a totally man-made, totally avoidable disaster. Almost 100 people were loaded onto a rigid airship filled with hydrogen in the universe. This was despite dozens of earlier hydrogen-based aircraft meeting with similar fates.
  5. ^ "'They'd Find Fraud, Fraud, Fraud.'". Institutional Investor (इंग्रजी भाषेत). 2021-02-07 रोजी पाहिले.
  6. ^ a b "Short seller Hindenburg Research renews attack on Nikola (Update)". FreightWaves (इंग्रजी भाषेत). 2020-09-15. 2021-02-07 रोजी पाहिले.
  7. ^ a b "Hindenburg Research Goes After 'Wall Street Celebrity Promoter' Chamath Palihapitiya". Institutional Investor (इंग्रजी भाषेत). 2021-02-07 रोजी पाहिले.
  8. ^ GmbH, finanzen net. "Chinese automaker Kandi plunges nearly 30% after short-seller Hindenburg accused it of fabricating sales to raise $160 million from US investors". markets.businessinsider.com (इंग्रजी भाषेत). 2021-02-07 रोजी पाहिले.
  9. ^ "Lordstown Motors' shares slump after Hindenburg takes short position". www.reuters.com (इंग्रजी भाषेत). 2021-03-12. 2021-03-12 रोजी पाहिले.
  10. ^ "Hindenburg Research Launches Defense of Short Selling". Morning Brew. 2021-02-07 रोजी पाहिले.
  11. ^ a b c d "'हिंडेनबर्ग'ने आधीही अनेक कंपन्यांना कंगाल केले आहे:कोण आहेत याचे मालक? जे आता अदानींच्या मागे लागलेत". दिव्य मराठी. १० फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  12. ^ Rice, Andrew (2022-01-20). "Last Sane Man on Wall Street". Intelligencer (इंग्रजी भाषेत). 2023-01-25 रोजी पाहिले.
  13. ^ Goldstein, Matthew; Kelly, Kate (16 August 2021). "A Skeptical Stock Analyst Wins Big by Seeking Out Frauds". The New York Times. 26 January 2023 रोजी पाहिले.
  14. ^ a b Smith, Howard (2020-11-10). "Nikola Reveals SEC and Justice Department Subpoenas in September". The Motley Fool (इंग्रजी भाषेत). 2021-02-07 रोजी पाहिले.
  15. ^ Boudette, Neal E.; Ewing, Jack (2020-09-21). "Head of Nikola, a G.M. Electric Truck Partner, Quits Amid Fraud Claims". The New York Times (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331. 2021-02-07 रोजी पाहिले.
  16. ^ Rosevear, John. "Nikola founder Trevor Milton found guilty of fraud over statements he made while CEO of the EV company". CNBC (इंग्रजी भाषेत). 2022-10-14 रोजी पाहिले.
  17. ^ Feiner, Lauren (2021-02-04). "Palihapitiya-backed Clover Health shares fall on critical report by short seller Hindenburg Research". CNBC (इंग्रजी भाषेत). 2021-02-07 रोजी पाहिले.
  18. ^ Kovach, Steve (2021-02-05). "Chamath Palihapitiya-backed Clover Health gets notice of SEC investigation". CNBC (इंग्रजी भाषेत). 2021-02-07 रोजी पाहिले.
  19. ^ Hindenburg Research (24 January 2023). "Adani Group: how the world's 3rd richest man is pulling the largest con in corporate history". Hindenburg Research (इंग्रजी भाषेत). New York, USA. 2023-01-27 रोजी पाहिले.
  20. ^ Thomas, Chris; Kalra, Aditya (25 January 2023). "Hindenburg shorts India's Adani citing debt, accounting concerns; shares plunge". Reuters (इंग्रजी भाषेत). 25 January 2023 रोजी पाहिले.
  21. ^ Sorkin, Andrew Ross; Mattu, Ravi; Warner, Bernhard; Kessler, Sarah; Merced, Michael J. de la; Hirsch, Lauren; Livni, Ephrat (25 January 2023). "A Short Seller Takes Aim at an Indian Corporate Giant". The New York Times. 25 January 2023 रोजी पाहिले.
  22. ^ Lockett, Hudson (25 January 2023). "Adani shares take $10.8bn hit after Hindenburg bets against group". Financial Times. 25 January 2023 रोजी पाहिले.
  23. ^ "Adani Group Row : गेल्या 150 दिवसांत गौतम अदानींना दर सेकंदाला झाले 'एवढ्या' लाखांचे नुकसान". दैनिक सकाळ. १० फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  24. ^ "अदाणी-हिंडनबर्ग रिपोर्ट मामला सुप्रीम कोर्ट पहुंचा, आज करेगी CJI बेंच सुनवाई". १० फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  25. ^ Pound, Jesse (2021-06-15). "DraftKings stock falls after Hindenburg Research reveals short position". CNBC (इंग्रजी भाषेत). 2021-06-21 रोजी पाहिले.
  26. ^ "Ormat shares drop after short-seller Hindenburg attacks energy company". Reuters (इंग्रजी भाषेत). 2021-03-01. 2021-03-02 रोजी पाहिले.
  27. ^ "MULN stock falls further after negative Hindenburg report". FXStreet (इंग्रजी भाषेत). 2022-04-27 रोजी पाहिले.
  28. ^ "Short-sellers take aim at Chinese blockchain firm SOS, shares tumble". Yahoo Finance (इंग्रजी भाषेत). 2021-03-02 रोजी पाहिले.
  29. ^ Venkataramakrishnan, Siddharth; Oliver, Joshua; Smith, Robert (2021-10-20). "Short-seller Hindenburg sets $1m 'bounty' for details on Tether's reserves". Financial Times. 2021-10-20 रोजी पाहिले.
  30. ^ "Hindenburg Research Announces $1,000,000 Bounty For Details On Tether's Backing". 2021-10-19.

बाह्य दुवे